
Japan Halong Typhoon : सध्या जगात नैसर्गिक आपत्तीच्या अनेक घटना घडल्या आहेत. कुठे भूस्खलन तर कुठे चक्रीवादळामुळे अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे. भविष्यातही अशा काही घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या एका भीषण वादळाची सगळीकडे चर्चा होत आहे. या वादळामुळे मोठा पाऊस, भूस्खलन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आहे. त्यामुळेच आता लोकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या वादळाचा वेग 252 किमी प्रतितास आहे. हे वादळ अतिशय शक्तीशाली असल्याचे बोलले जात आहे.
या वादळाचे नाव हेलाँग असे असून या वादळाचा जपानला मोठा धोका निर्माण झाला आहे. जपानाच्या हवामान विभागाने या वादळासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. या अंदाजानुसार बुधवारी सकाळी 9 वाजता प्रशांत महासागरात सक्रिय होते. आता हे वादळ उत्तर दिशेने 15 किमी प्रतितास वेगाने पुढे चालले आहे. या वादळाला नंबर 22असे नाव देण्यात आले आहे. या वादळाचा केंद्रीय वायूदाब 935 हेक्टोपास्कल असे आहे. तर या वादळाची कमाल गती 252 किमी प्रतितास आहे. त्यामुळेच हे वादळ सक्तिशाली असल्याचे बोलले जात आहे.
जपानच्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार या वादळाची तीव्रता कायम राहणार आहे. हेलाँग या वादळाला अतिशय शक्तिशाली वादळाच्या श्रेणीत ठेवण्यात आलेले आहे. हे वादळ जपानच्या दक्षिणी समुद्रातून उत्तरेकडे सरकत आहेत. आज रात्री हे वादळ इजू बेटसमुहांच्या जवळ पोहोचेल. 9 ऑक्टोबर रोजी हे वादळ हाचीजोजिमा तता आओगाशिमा यासारख्या द्वीपसमुहांवर धडकू शकते. या वादळामुळे वादळी वारे तसेच मोठ्या पावसाचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. हेलाँग वादळामुळे ईजू बेटांवर 80 मिलिमटर प्रतितास पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पूर, भूस्खलन यासारख्या घटनाही होऊ शकतात. दरम्यान, या वादळादरम्यान लोकांनी योग्य काळजी घ्यावी, गरज असेल तरच बाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.