AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिसर्‍या महायुद्धाची नांदी?…नाही तर मरणाला तयार राहा, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, मध्य-पूर्वेत पुन्हा युद्धाचा भडका?

Donald Trump Big Threat : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका धमकीने जग चिंतेत सापडले आहे. मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षात ट्रम्प कार्ड बाहेर आले आहे. इस्त्रायलच्या नागरिकांना ओलीस ठेवण्यात आले आहे. इराण-हिजबुल्लाह-हमास या आघाडीविरोधात इस्त्रायल मैदानात उतरलेला आहे.

तिसर्‍या महायुद्धाची नांदी?...नाही तर मरणाला तयार राहा, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, मध्य-पूर्वेत पुन्हा युद्धाचा भडका?
ट्रम्प तात्यांची दहशतवाद्यांना धमकी
| Updated on: Dec 03, 2024 | 9:16 AM
Share

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे मध्य-पूर्वेसंबंधात अमेरिकेची कणखर भूमिका पहिल्यांदाच समोर आली आहे. यापूर्वीच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्त्रायलला बाहेरून मदतीचा ओघ सुरू ठेवला. पण ट्रम्प यांनी थेट मैदानात उतरण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे जग तिसऱ्या महायुद्धाची ही नांदी तर नाही ना? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. 20 जानेवारी 2025 रोजी डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहे. त्यापूर्वीच त्यांनी गाझा पट्टीमधील हमास या दहशतवादी संघटनेला मोठा इशारा दिला आहे.

काय आहे धमकी?

“गाझा पट्टीत ओलीस ठेवलेल्या इस्त्रायल नागरिकांना 20 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या शपथविधीपूर्वी सोडा, नाहीतर मध्य-पूर्वेत विध्वंस करेल.” अशी धमकी नवीन राष्ट्राध्यक्षांनी दिली आहे. या धमकीमुळे मध्य-पूर्वेत पुन्हा युद्ध भडकण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीच्या बायडेन सरकारने इस्त्रायलला मदतीचा ओघ सुरू ठेवला होता. पण त्याचे लक्ष्य युक्रेन-रशिया युद्धावर अधिक होते. ट्रम्प यांचे धोरण रशियाला अनुकूल मानण्यात येत आहे.

“या ओलिसांना 20 जानेवारीपूर्वी मुक्त करा. तसे केले नाही तर मध्य-पूर्वेत विध्वंस करेल. जे माणुसकी सोडून सर्वसामान्य नागरिकांवर अत्याचार करत आहेत. त्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल. अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी शिक्षा असेल. जर त्यांनी या काळात योग्य कार्यवाही केली नाही. तर अमेरिका अशी शिक्षा देईल, जी आजपर्यंत कोणालाही मिळाली नाही.” असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

इस्त्रायली नागरिकांना ठेवले ओलीस

गेल्या वर्षी पॅलेस्टाईनमधील हमास या दहशतवादी संघटनेने इस्त्रायलच्या सीमावर्ती भागात हल्ला चढवला होता. त्यावेळी त्यांनी अनेक निरपराध नागरिकांना मारले. तर अनेकांना ओलीस ठेवले. इस्त्रायलने त्यांच्याविरोधात युद्धा पुकारल्यानंतर त्यातील काही नागरिकांची, विशेषतः महिलांची सुटका करण्यात आली होती. तरीही 250 पेक्षा अधिक नागरीक अजूनही हमासच्या ताब्यात असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामध्ये गाझा पट्टीत 101 परदेशी नागरीक आणि इस्त्रायल नागरीक ओलीस असल्याची माहिती समोर येत आहे.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....