
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनमधील 31 व्या एससीओ शिखर संमेलनात सहभागी झाले आहेत. यावेळी बैठकीसाठी नरेंद्र मोदी आणि पुतिन हे दोघेच एकाच गाडीमध्ये रवाना झाले. या फोटोने जगात मोठी खळबळ उडालीये. रशियाकडून भारताने तेल खरेदी करू नये, याकरिता अमेरिका सतत दबाव टाकत असताना पुतिन आणि मोदी यांनी एकाच गाडीतून थेट प्रवास केला. या संमेलनातून पाकिस्तानवरही निशाणा साधताना थेट नरेंद्र मोदी हे दिसले आहेत. दहशतवादाबद्दल बोलताना ते दिसले.
संमेलनात नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानबद्दल परखड मत मांडले. नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, जेव्हा एखाद्या देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन होते तेव्हा एखादे नाते जोडणे याचा अर्थ आणि विश्वासार्हता कमी होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी CPEC चे नाव घेणे टाळले. मात्र, त्यांच्या निशाण्यावर CPEC च होती. मुळात म्हणजे आता एससीओ संमेलनात काही समीकरणे बदलताना दिसली आहेत. सुरूवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगामवरील हल्ल्याबाबत भाष्य केले तर दुसरीकडे दहशतवाद्याच्याविरोधात कडक आणि रणनीती आखण्यासाठी घोषणा पत्र दिले.
त्यांनी पहलगाममधील हल्ल्याचा कडक शब्दात निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, मी सर्वात अगोदर सर्व मित्र देशांचे धन्यवाद देतो की, ज्यांनी पहलगाम हल्ल्यानंतर त्याचा विरोध केला आणि आमच्या वाईट काळात सोबत उभे राहिले. एक प्रश्न आहे की, काही लोक थेट पणे दहशतवादाचे समर्थन करत आहेत, त्याचा आपण स्वीकार करतो? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की, दहशतवादाच्या विरोधात आपण सर्वांनीच एकत्र यायला पाहिजे.
जर आपण दहशतवादाला प्रोत्साहन दिले तर कोणताही देश आणि समाज सुरक्षित राहू शकत नाही. यासोबतच त्यांनी चीनला संदेश देत स्पष्ट केले की, दहशतवादावर ते दुटप्पी भूमिका घेऊ शकत नाहीत. कारण दहशतवादावर भारताबद्दल चीनचे वागणे दरवेळी वेगळे असते. यामुळे विश्वास उडतो, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. थेट चीनच्या भूमीवर जाऊन त्यांना सुनावताना नरेंद्र मोदी हे दिसले आहेत.