AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांना भारताचा सर्वात मोठा पहिला झटका, थेट पंतप्रधानांनी घेतला अत्यंत मोठा निर्णय, अमेरिकेचा…

डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रशासन भारताबद्दल धक्कादायक निर्णय घेतलाना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर सर्वांना मोठा धक्का बसला. आता भारत देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात मैदानात उतरल्याचे बघायला मिळत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना भारताचा सर्वात मोठा पहिला झटका, थेट पंतप्रधानांनी घेतला अत्यंत मोठा निर्णय, अमेरिकेचा...
Donald Trump Prime Minister Narendra Modi
| Updated on: Sep 06, 2025 | 9:17 AM
Share

टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेत संबंध ताणले आहेत. मागील काही वर्षात अमेरिका आणि भारतात संबंध चांगले राहिले. दोन्ही देशांमध्ये मोठे व्यापार करार झाले आणि एकमेकांना सन्मानाची वागणूक देखील देण्यात आली. मात्र, सध्या परिस्थिती पूर्णपणे बदलल्याचे बघायला मिळत आहे. भारत हा आमचा सर्वात चांगला आणि जवळचा मित्र आहे, असा दावा करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची भारताबद्दलची भाषा बदलली. थेट भारताला धमकावले जात आहे आणि रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी दबाव टाकता जात आहे. भारताने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत आणि दबावाला बळी पडला नाहीये. आता अमेरिकेचा जळफळाट उठला आहे.

भारत आणि अमेरिकेतील संबंध टॅरिफच्या मुद्द्यावरून ताणलेले असतानाच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. नरेंद्र मोदी यांनी थेट अमेरिकेला धक्काच दिला. डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफबद्दलची रणनीती पाहून नरेंद्र मोदी यांनी या महिन्यातील न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या 80 व्या सत्रामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

नरेंद्र मोदी यांचा या पूर्वनियोजित दाैरा होता. मात्र, त्यांनी आता मोठा निर्णय घेत थेट हा दाैरा रद्द केला आहे. या महासभेत नरेंद्र मोदी यांच्याऐवजी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे जातील आणि भारताचे प्रतिनिधित्व करतील. 24 जुलैला सांगण्यात आले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महासभेला जाण्यासाठी राखीव वेळ ठेवला आहे. मात्र, सध्याच्या भारत आणि अमेरिकेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणे टाळले आहे.

या महासभेत नरेंद्र मोदी यांच्याऐवजी शेवटी संबोधित भाषण देखील जयशंकर हे करतील. भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चा मागील काही दिवसांपासून अचानक बिघडली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा पूर्वनियोजित दाैरा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हा एकप्रकारे मोठा धक्का त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिल्याचे बोलले जात आहे.  डोनाल्ड ट्रम्प यांनीह भारताचा दाैरा रद्द केला होता.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.