PM Modi in Germany: जर्मनीत पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत; पुन्हा एकदा जगाला पटवून दिले भारतीय ‘योगा’चे महत्व

दोन महिन्यांतील मोदींचा हा दुसरा जर्मनी दौरा आहे. यापूर्वी ते २ मे रोजी जर्मनीला गेले होते. पंतप्रधान संध्याकाळी म्युनिकमध्ये परदेशी भारतीयांच्या कार्यक्रमासाठी हजेरी लावली. आणीबाणीचा संदर्भ देऊन त्यांनी भाषणाला सुरुवात केली. जी लोकशाही आपला अभिमान आहे, जी लोकशाही प्रत्येक भारतीयाच्या डीएनएमध्ये आहे. 47 वर्षांपूर्वी या दिवशी आणीबाणी लादून लोकशाहीला ओलिस ठेवण्याचा, लोकशाहीला चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला असे ते म्हणाले.

PM Modi in Germany: जर्मनीत पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत; पुन्हा एकदा जगाला पटवून दिले भारतीय 'योगा'चे महत्व
सिद्धेश सावंत

|

Jun 26, 2022 | 11:13 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26-27 जून रोजी होणाऱ्या G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जर्मनीत दाखल झाले आहेत.  येथे भारतीयांनी त्यांचे जंगी स्वागत केले.  जर्मनीतील नागरिकांसह भारतीय वंशाच्या लोकांनी त्यांचे भव्य स्वागत केले. यादरम्यान एका भारतीय-जर्मन वधू-वर जोडीनेही पंतप्रधानांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वादही घेतले. याचा व्हिडिओ या जोडप्याने सोशल मिडीयावर शेअर केला असून हा व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये आहे.

दोन महिन्यांतील मोदींचा हा दुसरा जर्मनी दौरा आहे. यापूर्वी ते २ मे रोजी जर्मनीला गेले होते. पंतप्रधान संध्याकाळी म्युनिकमध्ये परदेशी भारतीयांच्या कार्यक्रमासाठी हजेरी लावली. आणीबाणीचा संदर्भ देऊन त्यांनी भाषणाला सुरुवात केली. जी लोकशाही आपला अभिमान आहे, जी लोकशाही प्रत्येक भारतीयाच्या डीएनएमध्ये आहे. 47 वर्षांपूर्वी या दिवशी आणीबाणी लादून लोकशाहीला ओलिस ठेवण्याचा, लोकशाहीला चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला असे ते म्हणाले.

मी तुमच्या सर्वांमध्ये भारताची संस्कृती, एकता आणि बंधुता पाहत आहे. भारतातील जनतेने लोकशाही चिरडण्याच्या सर्व कारस्थानांना लोकशाही मार्गाने उत्तर दिले. आपण भारतीय जिथे आहोत तिथे आपल्याला लोकशाहीचा अभिमान वाटतो. प्रत्येक भारतीय अभिमानाने म्हणतो, भारत ही लोकशाहीची जननी आहे.

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

  • योगाची ताकद काय आहे, हे जगाला भारतापेक्षा चांगले समजले आहे. यासोबतच आता भारत प्राचीन वैद्यकीय प्रणालींचे जागतिक केंद्र बनत आहे.
  • 2015 मध्ये जेव्हा मी जर्मनीला आलो तेव्हा स्टार्टअपच्या जगात कोणीही भारताला ओळखत नव्हते. आज भारत जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्ट-अप इकोसिस्टम आहे.
  • आज भारताला स्वतःच्या ताकदीवर विश्वास आहे, स्वतःवर विश्वास आहे. त्यामुळेच आज आपण जुने विक्रम मोडून नवीन उद्दिष्टे गाठत आहोत.
  •  21व्या शतकातील भारत हा चौथ्या औद्योगिक क्रांतीतील मागे राहिलेला नसून त्याचे नेतृत्व करणाऱ्यांपैकी एक आहे.
  • एवढ्या विशाल आणि वैविध्यपूर्ण देशात लोकशाही किती चांगल्या प्रकारे देत आहे हे भारताने दाखवून दिले आहे. करोडो भारतीयांनी मिळून ज्या प्रकारे मोठी उद्दिष्टे साध्य केली आहेत, ती अभूतपूर्व आहे.
  • आणीबाणीचा काळ हा भारताच्या दोलायमान लोकशाही इतिहासातील एका गडद स्पॉटसारखा आहे. पण हा गडद डाग शतकानुशतकांच्या लोकशाही परंपरांच्या वर्चस्वाने झाकलेला आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें