AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने रशियाकडून तेल आयात करणं कमी करावं, अन्यथा..! रघुराम राजन यांनी दिला इशारा

अमेरिकेने भारतावर टॅरिफ लादून कोंडी करण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला आहे. ट्रम्प सरकार या निर्णयातून एक पाऊल देखील मागे येण्यास तयार नाही. त्यामुळे भारताच्या निर्यातीवर परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. असं असताना रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारताला सल्ला दिला आहे.

भारताने रशियाकडून तेल आयात करणं कमी करावं, अन्यथा..! रघुराम राजन यांनी दिला इशारा
भारताने रशियाकडून तेल आयात करणं बंद करावं, अन्यथा..! रघुराम राजन यांनी दिला इशाराImage Credit source: TV9 Network
| Updated on: Aug 28, 2025 | 9:14 PM
Share

भारत रशियाकडून तेल आयात करतो या मुद्द्यावरून अमेरिकेने भारताची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेने भारतावर सुरुवातीला 25 टक्के कर आणि त्यानंतर त्यात आणखी 25 टक्क्यांची वाढ केली. आता भारतीय वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लादला गेला असून त्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे भारताच्या निर्यातीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. असं असताना आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारताला सल्ला दिला आहे. रशियाकडून आयात करत असलेल्या तेलावर पुन्हा एकदा विचार करा, असं सांगितलं आहे. रशियावर जास्तीचं अवलंबून राहणं भारतासाठी दीर्घकालासाठी जोखिमेचं होऊ शकतं. राजन यांच्या मते, आंतरराष्ट्रीय स्थिती बदलली किंवा रशियावर आणखी निर्बंध लादले गेले तर भारातच्या ऊर्जा सुरक्षेवर प्रभाव पडू शकतो. त्यामुळे भारताने तेल खरेदी करण्यासाठी संतुलित रणनिती आखली पाहीजे. इतर देशातून तेल आयातीचे पर्याय खुले ठेवावे. यामुळे भारताला भविष्यात कोणत्याही राजकीय किंवा आर्थिक संकटात चांगल्या पद्धतीने सामना करता येईल.

रघुराम राजन यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत याबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं. ‘यामुळे कोणाला फायदा होतो आणि कोणाला तोटा हे समजून घेतलं पाहीजे. रिफायनिंग कंपन्या आवश्यकतेपेक्षा जास्त नफा कमवत आहे. पण या टॅरिफमुळे निर्यातदारांचं नुकसान होत आहे. जर जास्त फायदा होत नसेल, तर आपण खरेदी सुरु ठेवावी की नाही याचा विचार करणं भाग आहे.’ दुसरीकडे, तुर्की, चीन आणि युरोपियन यूनियन यांनीही रशियासोबत ऊर्जा व्यापार सुरु ठेवला आहे. पण त्यांच्यावर असा काही दंड लावलेला नाही. त्यामुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध ताणले गेल्याचं दिसत असल्याचं रघुराम राजन यांनी सांगितलं.

रघुराम राजन यांनी सांगितलं की, ‘हा एक इशारा आहे की आम्हाला पूर्वेकडे पाहणं गरजेचं आहे. युरोप, अफ्रिकेकडे पाहिलं पाहीजे. अमेरिकेची सोबतही ठेवली पाहीजे. पण अशी सुधारणा करणं आवश्यक आहे की 8 ते 8.5 टक्के विकास दर गाठू शकू. आपल्या तरूणांना रोजगार देऊ शकू.’ दुसरीकडे, त्यांनी कोळंबी उत्पादक आणि कापड उत्पादकांना फटका बसेल असं सांगितलं आहे. दरम्यान, अमेरिकन ग्राहकांसाठीही हा निर्णय डोकेदुखी ठरणार आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा