“भारताच्या संसदेत विरोधकांचे माईक बंद असतात”; राहुल गांधी यांनी पुन्हा साधला निशाणा…

भारताच्या परराष्ट्र धोरणावर आक्षेप घेणे हा तुमच्या अल्प बुद्धीचा पुरावा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. परदेशातून तुम्ही भारताविषयी जे खोटे पसरवले आहे त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

भारताच्या संसदेत विरोधकांचे माईक बंद असतात; राहुल गांधी यांनी पुन्हा साधला निशाणा...
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 12:42 AM

नवी दिल्लीः काँग्रेसचे नेते आणि खासदा राहुल गांधी सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी त्यांनी लंडनमधील संसदेच्या सभागृहात ब्रिटीश खासदारांबरोबर संवाद साधला. भारतातील राजकीय परिस्थिती आणि भारतीय संसदेतील विविध गोष्टींवर त्यांनी खासदारांबरोबर संवाद साधला आहे. भारतात संसदेविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, कधी कधी विरोधी पक्षांच्या नेत्यांचे मायक्रोफोन बंद केले जातात.

राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाचे विरोधी मजूर पक्षाचे आणि भारतीय वंशाचे खासदार वीरेंद्र शर्मा यांनी हाऊस ऑफ कॉमन्सच्या ग्रँड कमिटी रूममध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’चेही त्यांनी आपले अनुभव सांगितले.

यादरम्यान राहुल गांधी यांनी मायक्रोफोनचा वापर केला मात्र तो सदोष होतो अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.त्यानंतर ते म्हणाले की, आमचे माइक खराब नाहीत तर ते काम करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

पण तरीही तुम्ही ते चालू करू शकत नाही. कारण जेव्हा मी संसदेत माझा मुद्दा मांडतो तेव्हा तिथे अनेकदा याविरोधात घडले आहे. त्यामुळे भारतीय संसदेतील आवाज दडपला जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी सांगितले की, आम्ही नोटाबंदीचा निर्णय घेतला होता,मात्र तो एक विनाशकारी आर्थिक निर्णय होता. आम्हाला या विषयावर चर्चा करण्याची परवानगी नव्हती.

मात्र जीएसटीचा संदर्भ देत ते म्हणाले की, आम्हाला त्यावर चर्चाही करू देण्यात आली नाही. तसेच चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत प्रवेश केल्याच्या मुद्द्यावरुनही आम्हाला बोलू दिले नाही.

या सगळ्या गोष्टींवर भाजपने राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे तर चीनचे कौतुक केले म्हणून परदेशात जाऊन तुम्ही भारताची बदनामी केल्याचा आरोप केला आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच देशाशी गद्दारी करू नये असंही त्यांनी यावेळी सांगितले.

अनुराग ठाकुर यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना तुम्ही भारताचा विश्वासघात करू नये अशी टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

तर भारताच्या परराष्ट्र धोरणावर आक्षेप घेणे हा तुमच्या अल्प बुद्धीचा पुरावा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. परदेशातून तुम्ही भारताविषयी जे खोटे पसरवले आहे त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.