AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध रॅपर निकी मिनाजच्या वडिलांचा कारच्या धडकेत मृत्यू

रॉबर्ट मराज यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. शनिवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (Nicki Minaj's father hit and run)

प्रसिद्ध रॅपर निकी मिनाजच्या वडिलांचा कारच्या धडकेत मृत्यू
अमेरिकन रॅपर निकी मिनाज
| Updated on: Feb 15, 2021 | 4:01 PM
Share

न्यूयॉर्क : अमेरिकेतील प्रसिद्ध रॅपर निकी मिनाज (Nicki Minaj) हिच्या वडिलांचा कार अपघातात मृत्यू झाला. 64 वर्षीय रॉबर्ट मराज यांना ‘हिट अँड रन’मध्ये प्राण गमवावे लागले. अपघातातनंतर कारचालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (Rapper Nicki Minaj’s father killed in hit and run)

कारच्या धडकेत गंभीर जखमी

न्यूयॉर्कमध्ये स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी संध्याकाळी हा अपघात घडला. निकी मिनाजचे 64 वर्षीय वडील रॉबर्ट मराज संध्याकाळी 6:15 वाजता पायी जात होते. लाँग आयलंडमधील मिनेओला भागातील रस्त्याने ते चालत होते. त्यावेळी कारच्या धडकेत ते गंभीर जखमी झाले.

रॉबर्ट मराज यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. शनिवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अपघाताचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

निकी मिनाजकडून अद्याप प्रतिक्रिया नाही

पोलिसांनी अधिकृत सूचना जारी करत रॉबर्ट मराज यांच्या अपघाती निधनाची माहिती दिली. परंतु यामध्ये रॅपर निकी मिनाजसोबत त्यांच्या नात्याचा उल्लेख नाही. मात्र पोलिसांच्या प्रवक्त्यांनी ते निकीचे वडील असल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिल्याची माहिती ‘द गार्डियन’ वृत्तपत्राने दिली आहे. निकी मिनाजने मात्र याविषयी जाहीर वाच्यता केलेली नाही.

(Rapper Nicki Minaj’s father killed in hit and run)

कोण आहे निकी मिनाज?

निकी मिनाज ही अमेरिकेतील प्रसिद्ध रॅपर आहे. 38 वर्षीय निकी मिनाजचा जन्म त्रिनिदादमध्ये झाला. तिचे मूळ नाव ओनिका तान्या मिराज. तर न्यू यॉर्क शहरात तिचे बालपण गेले. रॉबर्ट मराज हे सरकारी नोकरी करत होते, मात्र त्यांनी गायनाच्या क्षेत्रातही नाव कमावलं आहे. निकीची आईही गायिका आहे.

निकी मिनाजचं आयुष्य अनेक खळबळजनक घटनांनी भरलेलं आहे. किशोरवयात तिने आपला गर्भपात झाल्याचं सांगितलं होतं. करिअरच्या सुरुवातीला तिने आपण बायसेक्शुअल असल्याचं म्हटलं होतं. परंतु, आपण केवळ लक्ष वेधून घेण्यासाठी हे वक्तव्य केल्याचा दावा तिने काही वर्षांनी केला.

चुलतभावाची हत्या

2018 मध्ये ती बालपणीचा मित्र केनेथ पेटीसोबत रिलेशनशीपमध्ये होती. ऑगस्ट 2019 मध्ये दोघं विवाहबंधनात अडकले. सप्टेंबर 2020 मध्ये तिने मुलाला जन्म दिला. निकीच्या चुलतभावाची जुलै 2011 मध्ये हत्या झाली होती. तर तिच्या सख्ख्या भावाला बाल लैंगिक शोषण प्रकरणी तुरुंगवारी झाली होती.

(Rapper Nicki Minaj’s father killed in hit and run)

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.