जगाची उडाली झोप, डोनाल्ड ट्रम्प यांचा कट यशस्वी, इराणमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर, थेट रशियामध्ये…
गेल्या काही दिवसांपासून इराणमधील परिस्थिती तणावात आहेत. इराण अस्थिर होण्याची शक्यता आहे. इराणमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप वाढला असून तिथे सुरू असलेल्या आंदोलनाबद्दल मोठा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठी धमकी दिली. फक्त धमकीच नाही तर आंदोलन थांबले नाही तर आम्ही हस्तक्षेप करू असे त्यांनी म्हटले. इराणमध्ये परिस्थिती सध्या हाताबाहेर जाताना दिसत असून इराणमध्ये सुरू झालेली निदर्शने अधिकच तीव्र होत आहेत. दरम्यान मोठी माहिती पुढे येत असून देशातील वाढत्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई मॉस्कोला पळून जाण्याची शक्यता आहे. एका गुप्तचर अहवालानुसार, जर इराणमध्ये खोमेनीची राजवट कोसळली तर ते इराणमध्ये न राहता ते थेट मॉस्कोला निघून जाऊ शकतात. सध्याच्या परिस्थितीला इराणमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप चांगलाच वाढला. इराणला धमक्या दिल्या जात आहेत. इराणचा अत्यंत जवळचा मित्र असलेला पाकिस्तानही यादरम्यान बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे.
अहवालानुसार, 86 वर्षीय खमेनी तेहरान सोडून आपल्या काही जवळच्या लोकांसह आणि कुटुंबातील सदस्यांसोबत देशाबाहेर जातील. एका गुप्तचर सूत्राने ब्रिटिश वृत्तपत्राला सांगितले की, खमेनीची प्लॅन बी म्हणजे आपला मुलगा आणि नियोजित उत्तराधिकारी मोजतबा यांच्यासह आपल्या जवळच्या सहकाऱ्यांसोबत आणि कुटुंबासोबत पळून जायचे आहे. इराणमधील परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील आंदोलनात हस्तक्षेप करावा लागेल असे म्हटल्यानंतर खामेनेई सरकारने अमेरिकेवर जोरदार टीका केली होती आणि आम्ह आमच्या राष्ट्रीय सुरक्षेमध्ये कोणत्याही हस्तक्षेप करणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते. हेच नाही तर जर कोणी हस्तक्षेप करत असेल तर त्याचे हात तोडून टाकण्याचीही भाषा त्यांनी बोलून दाखवली होती. मात्र, त्यानंतर अमेरिकेचा चांगलाच जळफळाट बघायला मिळाला.
20 लोकांसोबत अयातुल्ला अली खामेनेई इराण सोडू शकतात, असेही काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. त्यांनी तेहरानमधून बाहेर पडण्यासाठी आधीच एक पळून जाण्याचा मार्ग आखला आहे, ज्यामध्ये परदेशात मालमत्ता आणि संपत्ती जमा करण्याचा समावेश आहे. आंदोलन अधिक तीव्र होताना दिसत असून चिघळण्याची दाट शक्यता आहे. रिपोर्टनुसार, जूनमध्ये इस्रायलसोबत झालेल्या 12 दिवसांच्या युद्धानंतर खामेनेई मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत झाले आहेत.
