AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धविराम होताच इराणकडून भारताचं तोंडभरून कौतुक, मानले जाहीर आभार, समोर आलं मोठं कारण

इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध झालं, युद्धविरामानंतर इराणने भारताचं कौतुक करत आभार मानले आहेत. या युद्धामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे.

युद्धविराम होताच इराणकडून भारताचं तोंडभरून कौतुक, मानले जाहीर आभार, समोर आलं मोठं कारण
| Updated on: Jun 25, 2025 | 9:08 PM
Share

इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध झालं, या युद्धामध्ये इराणसोबतच इस्रायलचं देखील मोठं नुकसान झालं आहे. युद्ध सुरू असतानाच अमेरिकेनं इराणच्या तीन अणू केंद्रांवर हल्ला केला. त्यानंतर अखेर आता इराण आणि इस्रायलमध्ये युद्धविराम झाला आहे. युद्धविराम झाल्यानंतर इराणने भारताचे आभार मानले आहेत. इस्रायलसोबत झालेल्या युद्धादरम्यान भारताकडून मिळालेल्या समर्थनासाठी इराणने भारताचे आभार मानले आहेत. नवी दिल्लीतील इराणच्या दूतावासाकडून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये इराणने भारताचे आभार मानले आहेत. सोबतच या पोस्टमध्ये इराण आणि भारतामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या विविध क्षेत्रातील भागीदारीचा उल्लेख देखील करण्यात आला आहे.

इराणने काय म्हटलं?

अमेरिका आणि इस्रायलसारख्या राष्ट्रानं केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचा विजय झाला आहे.हा एक ऐतिहासिक असा विजय आहे. त्यासाठी इराणचा दूतावास भारतातील सर्व महान आणि स्वतंत्रताप्रेमी नागरिक, राजकीय पक्ष, संसदेतील सर्व सदस्य, धार्मिक आणि आध्यात्मिक गुरू, सामाजिक कार्यकर्ता आणि भारतीय मीडियाचे आम्ही आभारी आहोत, जे युद्धासारख्या कठीण प्रसंगात आमच्यासोबत उभे राहिले.

भारताचे आभार मानताना इराणने म्हटलं आहे की, भारतासारख्या महान राष्ट्रातील लोकांनी आणि संस्थांनी आम्हाला दिलेल्या खऱ्या आणि अमूल्य पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून कौतुक करतो, निःसंशयपणे यामुळे आपल्या दोन्ही देशांमधील दीर्घकालीन सांस्कृतिक, आणि मानवतावादी संबंधांना चालना मिळणार आहे.

इराणचं किती नुकसान?

या युद्धामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे, इराणच्या अनेक महत्त्वाच्या संस्था उद्ध्वस्त झाल्या आहेत. अनेक महत्त्वाची विमानतळं आणि पायाभूत सुविधा बेचिराख झाल्या आहेत. अमेरिकेकडून इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रांवर हल्ला करण्यात आला, या हल्ल्यामध्ये इराणच्या या अणुऊर्जा केंद्रांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

इस्रायलचं देखील प्रचंड नुकसान 

या युद्धामध्ये इस्रायलचं देखील मोठं नुकसान झालं आहे, इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणने देखील आक्रमक भूमिका घेतली होती, अमेरिकेच्या दबावाला न जुमानता इराणने इस्रायलवर हल्ले सुरूच ठेवले होते, त्यामुळे इस्रायलचं देखील मोठं नुकसान झालं आहे.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली