AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या अनोख्या चोरीने जगही हादरले… फक्त 7 मिनिटात मौल्यवान दागिने लंपास, चाकू-बंदुक नव्हे; या हत्याराचा वापर

Robbery in Louvre Museum: फ्रान्समधील एका चोरीमुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. राजधानी पॅरिसमध्ये आज मुखवटा घातलेले चोर लुव्र संग्रहालयात शिरले आणि अवघ्या काही क्षणात मौल्यवान दागिने चोरून पळून गेले. चोरांनी ही चोरी अवघ्या सात मिनिटांमध्ये केली.

या अनोख्या चोरीने जगही हादरले... फक्त 7 मिनिटात मौल्यवान दागिने लंपास, चाकू-बंदुक नव्हे; या हत्याराचा वापर
Robbery in Paris
| Updated on: Oct 19, 2025 | 8:00 PM
Share

फ्रान्समधील एका चोरीमुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. राजधानी पॅरिसमध्ये आज मुखवटा घातलेले चोर लुव्र संग्रहालयात शिरले आणि अवघ्या काही क्षणात मौल्यवान दागिने चोरून पळून गेले. चोरांनी ही चोरी अवघ्या सात मिनिटांमध्ये केली. इतक्या कमी वेळात दागिने लंपास करण्यात आल्यामुळे पोलीस प्रशासनाची झोप उडाली आहे. आता या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पॅरिसमधील लुव्र संग्रहालय हे जगातील सर्वात जास्त लोकप्रिय संग्रहालय आहे. येथे नेहमी सतत पर्यटकांची वर्दळ पहायला मिळते. हे सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या संग्रहालयांपैकी एक आहे. या संग्रहालयात जगप्रसिद्ध मोनालिसाचे चित्र आहे. आता याच संग्राहालयात चोरी झाल्याने फ्रेंच प्रशासनाने संग्रहालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पर्यटकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.

गृहमंत्री लॉरेंट नुनेज यांनी दिली चोरीची माहिती

फ्रेंच वृत्तसंस्था एएफपीने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी सकाळी 9:30 ते 9:40 या कालावधीत घडली. गृहमंत्री लॉरेंट नुनेज यांनी याबाबत बोलताना सागितले की, ही संपूर्ण घटना अवघ्या सात मिनिटांत घडली. चोरांनी बाहेरून चेरी पिकर (हायड्रॉलिक शिडीसारखे मशीन) वापरून संग्रहालयात प्रवेश केला आणि मौल्यवान दागिने चोरले. या घटनेत तीन ते चार लोकांचा सहभाग होता. या चोरांनी चोरी करण्यापूर्वी संग्रहालयाची रेकी केली होती. ही चोरी अतिशय सावधगिरीने आणि अभ्यासपूर्वक केली आहे. कारण चोरट्यांनी काच कापण्यासाठी डिस्क कटरचा वापर केला.’

नेपोलियन आणि महाराणीचे 9 दागिने लंपास

ले पॅरिसियनने दिलेल्या वृत्तानुसार, लुव्र संग्रहालयातील नेपोलियन आणि महाराणीच्या दागिन्यांच्या संग्रहातून 9 दागिने चोरीला गेले आहेत. यातील एक दागिना संग्रहालयाच्या बाहेर तुटलेल्या अवस्थेत आढळला. हा दागिन्याचा तुकडा राणी युजेनी डी मोंटिजोच्या मुकुटातील असल्याची माहिती समोर आली आहे.

नदीतून संग्रहालयात प्रवेश

समोर आलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी सीन नदीच्या बाजूने गॅलरीमध्ये प्रवेश केला. यासाठी चोरट्यांनी बास्केट लिफ्टचा वापर केला.या भागात बांधकाम सुरू होते. त्यानंतर चोरट्यांनी डिस्क कटरने खिडक्या कापल्या आणि आत प्रवेश केला. त्यानंतर नऊ दागिने चोरले आणि ते पळून गेले. आता त्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे.

या चोरीबाबत बोलताना पॅरिस सेंटरचे महापौर एरियल वेइल म्हणाले की, ‘लुव्र संग्रहालयात इतक्या सहजपणे चोरी होणे हे धक्कादायक आहे. आतापर्यंत आपण अशा गोष्टी चित्रपटांमध्ये पाहिले आहे, मात्र चोरट्यांनी ते प्रत्यक्षात केले आहे.’

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.