AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियाचं 25 वर्षांनी धक्कादायक पाऊल, खजान्यातलं सोनं… युद्धाच्या काळात त्या निर्णयाचा अर्थ काय?

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरू आहे. या युद्धाचा वाढता खर्च भागवण्यासाठी रशियाने 25 वर्षांनंतर एक मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रशियाचं 25 वर्षांनी धक्कादायक पाऊल, खजान्यातलं सोनं... युद्धाच्या काळात त्या निर्णयाचा अर्थ काय?
Russian GoldImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 29, 2026 | 5:53 PM
Share

गेल्या 4 वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरू आहे. यात रशियाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता या युद्धाचा वाढता खर्च भागवण्यासाठी रशियाने 25 वर्षांनंतर एक मोठा निर्णय घेतला आहे. रशियाने पहिल्यांदाच आपल्या सेंट्रल बँकेच्या राखीव साठ्यातील सोने विकायला सुरुवात केली आहे. बर्लिनस्थित बीएनई इंटेलिन्यूजच्या अहवालानुसार, रशियाच्या सेंट्रल बँकेने यावर्षी जानेवारीत 3,00,000 औंस आणि फेब्रुवारीत 2,00,000 औंस सोने विकले. म्हणजेच केवळ दोन महिन्यांत एकूण सुमारे 14 टन सोने विकले गेले आहे. यातून मिळालेला पैसा युद्धात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रशियाने 25 वर्षांनंतर म्हणजेच 2002 नंतर कोणत्याही दोन महिन्यांमध्ये केलेली ही सर्वात मोठी सोन्याची विक्री आहे. ही रशियाच्या सोन्याच्या व्यवस्थापनातील मोठी बदलाची खूण आहे. यापूर्वी वित्त मंत्रालय आणि सेंट्रल बँक यांच्यातील सोन्याचे व्यवहार बहुतेक कागदोपत्रीच होत असत. यात प्रत्यक्ष सोन्याच्या सळया एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवल्या जात नव्हत्या. मात्र आता सेंट्रल बँक थेट बाजारात प्रत्यक्ष सोन्याच्या सळया विकत असल्याचे समोर आले आहे.

रशियाकडे आता किती सोन्याचा साठा आहे?

अलिकडेच केलेल्या सोन्याच्या या विक्रीमुळे रशियाचा सोन्याचा साठा घटून 7.43 कोटी औंसांवर आला आहे. हा आकडा मागील चार वर्षांतील सर्वात कमी आकडा आहे. तरीही रशियाकडे अजूनही 2000 टनांहून अधिक सोने आहे. तो जगातील पाचवा सर्वात मोठा सोन्याचा साठा असलेला देश आहे. रशिया ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात सोने विकत आहे, त्यावरून सरकारच्या आर्थिक स्थितीवर मोठा ताण असल्याचे समोर येत आहे. रशिया संकटात असताना सोन्याची ही विक्री होत आहे.

तेल-गॅस उत्पन्नात घट

रशियन सरकारला तेल आणि गॅसच्या विक्रीतून मोठ्या प्रमाणात निधी मुळा होता, मात्र आता या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे आणि 2020 च्या उत्तरार्धात तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे ऊर्जा कराचा एकूण सरकारी महसुलातील वाटा आता फक्त 20% पर्यंतच राहिला आहे, जो युक्रेन युद्धापूर्वीच्या तुलनेत खूपच कमी आहे. तसेच गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या युक्रेन युद्धामुळे लष्करी खर्च खूपच वाढला आहे. त्यामुळे रशियन सरकार अडचणीत आले आहे.

सोन्याची विक्री रणनीतीचाही भाग असू शकते

रशियन सरकारचा सोने विकण्याचा निर्णय काही अंशी योग्यही ठरू शकतो, कारण सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. अलीकडेच त्या प्रति औंस 5,000 डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. यामुळे रशियाचे एकूण आंतरराष्ट्रीय राखीव भांडार 809 अब्ज डॉलरपेक्षा अधिक झाले आहे, मात्र यातील सुमारे 300 अब्ज डॉलरची मालमत्ता पाश्चिमात्य देशांनी गोठवून ठेवली आहे. 14 टन सोने विकणे हे रशियासाठी मोठी बाब नसली तरी यातून सरकारला पैशांची गरज आहे हे स्पष्ट होते.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...