Vladimir Putin : शौचालय, पायऱ्यांवर मिळाले मृतदेह, जे कोणी यामागे, त्यातल्या एकालाही पुतिन नाही सोडणार

पोलिसांनी या प्रकरणात 11 जणांना ताब्यात घेतलय. त्यात हॉलमध्ये अंदाधुंद फायरिंग करणारे चार जण आहेत. कॉन्सर्ट हॉलमध्ये गोळीबार केल्यानंतर दहशतवाद्यांनी पेट्रोल टाकून हॉलला आग लावली.

Vladimir Putin : शौचालय, पायऱ्यांवर मिळाले मृतदेह, जे कोणी यामागे, त्यातल्या एकालाही पुतिन नाही सोडणार
Vladimir Putin
Follow us
| Updated on: Mar 24, 2024 | 11:40 AM

रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये कॉन्सर्ट हॉलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे लोकांमध्ये दहशतीच वातावरण आहे. या भीषण हल्ल्यात 133 नागरिकांचा मृत्यू झाला. जवळपास 107 लोक जखमी झाले आहेत. रुग्णालयात त्यांचा जीवन-मृत्यूशी संघर्ष सुरु आहे. भारत, अमेरिकेसह जगभरातील देशांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. ISIS ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पोलिसांनी या प्रकरणात 11 जणांना ताब्यात घेतलय. त्यात हॉलमध्ये अंदाधुंद फायरिंग करणारे चार जण आहेत.

हल्लेखोरांना युक्रेनमधून मदत मिळाली होती, असा रशियन अधिकाऱ्यांचा दावा आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सांगितलं की, पोलिसांनी चार बंदुकधाऱ्यांसह 11 जणांना ताब्यात घेतलय. लपण्यासाठी युक्रेनला जाण्याच्या तयारीमध्ये होते. त्यासाठी युक्रेनच्या सीमेवर तयारी करण्यात आली होती. दहशतवाद्यांना लपवण्यासाठी युक्रेनकडून मदत दिली जाणार होती. रशियाच म्हणणं आहे की, दहशतवाद्यांसाठी सीमेवर युक्रेनकडून एक खिडकी बनवण्यात आली होती. रशियाच्या एफएसबीनुसार, दहशतवादी युक्रेनच्या संपर्कात होते. तिथे पळण्याच्या तयारीत होते. पण सीमा पार करण्याआधी त्यांना पकडण्यात आलं.

युक्रेनच म्हणण काय?

या हल्ल्याला रशियाने युक्रेनशी जोडलं आहे. युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की यांच्यासह त्या देशातील सर्व मोठ्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलय की, या हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाहीय. दुसऱ्यांची माथी खापर फोडण हे पुतिन यांचं वैशिष्टय आहे असं राष्ट्रपती जेलेंस्की यांनी म्हटलं आहे. युक्रेनी सैन्याचा प्रवक्ता एंड्री युसोव म्हणाला की, “आमचा देश या दहशतवादी हल्ल्यात सहभागी नव्हता. आमच रशियन जनतेविरोधात नाही, तर त्यांच्या सैन्याविरोधात युद्ध सुरु आहे”

शौचालयात किती मृतदेह मिळाले?

कॉन्सर्ट हॉलमध्ये गोळीबार केल्यानंतर दहशतवाद्यांनी पेट्रोल टाकून हॉलला आग लावली. काहींचा मृत्यू गोळ्या लागून झाला, तर काहींचा मृत्यू आगीत होरपळून झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शौचालयात 28 मृतदेह मिळाले आहेत. 14 मृतदेह पायऱ्यांवर होते. यात महिला आणि निष्पाप लहान मुलं आहेत.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.