AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा उडणार युद्धाचा भडका ? बलाढ्य देशाच्या प्रमुखाने जे केलं त्याने जगाला हादरा…

रशियाने युक्रेन युद्धाच्या आर्थिक ताणामुळे आणि वाढत्या अर्थसंकल्पीय तुटीमुळे (2026 मध्ये 61.2 अब्ज डॉलर्स) सुमारे 22 टन सोन्याची विक्री केली आहे. यामुळे जागतिक सुवर्ण बाजारात खळबळ उडाली आहे. संरक्षणावरील वाढलेला खर्च, चलनावरील दबाव आणि महागाई यामुळे अर्थव्यवस्था हादरली आहे. सोन्याच्या विक्रमी आंतरराष्ट्रीय किमतींमुळे रशियाला मोठा महसूल मिळाला, तरी देशांतर्गत सोन्याची मागणीही वाढली आहे.

पुन्हा उडणार युद्धाचा भडका ? बलाढ्य देशाच्या प्रमुखाने जे केलं त्याने जगाला हादरा...
Image Credit source: Getty Images
| Updated on: Apr 24, 2026 | 11:57 AM
Share

जगात बहुतांश ठिकाणी सध्या अस्थिरता, अशांततेचं वातावरण आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या आर्थिक दबावाची तीव्रता किती आहे ते, रशियाच्या अलीकडील कृतीतून दिसून येतं. व्लादिमीर पुतिन यांच्या सरकारने 2026 मध्ये आतापर्यंत अंदाजे 22 टन सोन्याची विक्री केली आहे. वाढती आर्थिक तूट भरून काढण्यासाठी करण्यासाठी पुतिन यांच्या सरकारने हे पाऊल उचललं आहे. युक्रेन युद्धाचं पाचवं वर्ष सुरू असतानाच, संरक्षण खर्च, ऊर्जेचा खर्च आणि चलनावरील दबावामुळे अर्थव्यवस्था हादरली आहे. या निर्णयामुळे जागतिक सुवर्ण बाजारात खळबळ उडाली असून गुंतवणूकदारांमध्ये नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत.

रशियाच्या सेंट्रल बँकेने 2026 मध्ये आत्तापर्यंत 21.8 टन सोन्याची विक्री केली आहे, जे अंदाजे 22 हजार किलोग्रॅमच्या बरोबरीचं आहे. मार्च अखेरपर्यंत देशाची अर्थसंकल्पीय तूट 61.2 २ अब्ज डॉलर्सवर पोहोचली असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे. रशियन मध्यवर्ती बँकेनुसार, 1 एप्रिल 2026 पर्यंत सोन्याचा साठा 2,304.76 टन इतका होता, पण केवळ मार्च महिन्यातच, त्यात 6.22 टनांची घट झाली आहे.

अर्थव्यवस्थेवर मोठा ताण

युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा दबाव आला आहे. सरकारी खर्च झपाट्याने वाढत असताना, रुबलवरील दबाव आणि महागाईने परिस्थिती बिकट केली आहे. दरम्यान, देशांतर्गत सोन्याची मागणी देखील लक्षणीयरीत्या वाढली आहे. मॉस्को एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, मार्चमध्ये गोल्ड ट्रेडिंग व्हॉल्यूमचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत 350 टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त वाढून 42.6 टनांवर पोहोचले. विशेष गोष्ट म्हणजे, सोन्याची विक्री होऊनही त्याचं एकूण मूल्य वाढलं आहे, कारण आंतरराष्ट्रीय किमती विक्रमी पातळीजवळ पोहोचल्या आहेत. जानेवारीमध्ये, सोन्याच्या किमती प्रति औंस 5500 डॉलर्सच्या वर गेल्यानंतर, रशियाने 3 लाख औंस सोन्याची विक्री करून अंदाजे $1.4 ते $1.68 अब्ज कमावले होते.

तज्ञांच्या सांगण्यानुसार. रशिया हाँ असा एकटा देश नाही. तर वाढत्या खर्चासाठी, अनेक मध्यवर्ती बँका विशेषतः संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रावरील खर्चासाठी निधी उभारण्याकरिता सोन्याची विक्री करत आहेत. मात्र, दीर्घकाळात रशियाने आपला सोन्याचा साठा अधिक मजबूत केला आहे. 2002 ते 2025 या दरम्यान, रशियाने 1900 टनांपेक्षा जास्त सोन्याची खरेदी केली, मात्र 2020 नंतर खरेदीचा वेग लक्षणीयरीत्या मंदावला. दरम्यान, रशियाचा चीनसोबतचा सोन्याचा व्यापारही वाढला आहे. 2025 च्या पहिल्या सहामाहीत चीनला होणारी मौल्यवान धातूंची निर्यात जवळपास दुप्पट झाली. याशिवाय, देशांतर्गत लोकांनी आपली बचत सुरक्षित ठेवण्यासाठी सोन्यातील गुंतवणूक वाढवली आहे. 2024 मध्ये, रशियाने विक्रमी 75.6 टन सोन्याची खरेदी केली.

Follow Us
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण