AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर रशियाने युद्धात बाहेर काढला तुरुपचा एक्का ‘प्रोमेथियस’, युक्रेन, NATO सोडा अमेरिका सुद्धा काहीच बिघडवू शकणार नाही, असं काय आहे यात?

युद्धाला 1000 दिवस पूर्ण झाल्यानंतर रशियाने आपला तुरुपचा एक्का बाहेर काढला. रशियन संरक्षण मंत्री आंद्रेई बेलौसोव (Andrey Belousov) यांनी स्पष्टपणे सांगितलं की, प्रोमेथियसच्या पहिल्या रेजिमेंटने आपली युद्ध डयूटी सुरु केली आहे. यावेळी बेलौसोव यांनी एक महत्वाचं स्टेटमेंट केलय, जे सगळ्या जगासाठी महत्वाचं आहे.

अखेर रशियाने युद्धात बाहेर काढला तुरुपचा एक्का 'प्रोमेथियस', युक्रेन, NATO सोडा अमेरिका सुद्धा काहीच बिघडवू शकणार नाही, असं काय आहे यात?
prometheus
| Updated on: Jan 06, 2026 | 4:19 PM
Share

रशियाने अखेर S-500 प्रोमेथियस (Prometheus) हे सर्वात घातक शस्त्र बाहेर काढलं आहे. रशियाने युक्रेन विरुद्ध सुरु असलेल्या युद्धात ‘कॉम्बॅट ड्यूटी’वर S-500 प्रोमेथियसला तैनात केलं आहे. रशियाच्या या निर्णयाने पेंटागनपासून नाटोच्या मुख्यालयापर्यंत एकच खळबळ उडाली आहे. ही फक्त युक्रेनसाठी वाईट बातमी नाहीय, तर अमेरिकेसाठी थेट वॉर्निंग सिग्नल आहे. कारण पुतिन यांनी S-500 प्रोमेथियसला कॉम्बॅट ड्यूटीवर आणून थेट युद्धाचा स्तर जमिनीवरुन अवकाशापर्यंत पोहोचवला आहे. रशियाने अदृश्य कवच तयाल केलय का? ज्या समोर अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइलही निष्प्रभ ठरेल? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. S-500 मध्ये असं काय आहे, जे त्याला S-400 पेक्षा जास्त खतरनाक बनवतं? समजून घेऊया. या घातक मिसाइलला डिकोड करुया.

युद्धाला 1000 दिवस पूर्ण झाल्यानंतर रशियाने आपला तुरुपचा एक्का बाहेर काढला. रशियन संरक्षण मंत्री आंद्रेई बेलौसोव (Andrey Belousov) यांनी स्पष्टपणे सांगितलं की, S-500 एअर डिफेंस सिस्टिमने सुसज्ज पहिल्या रेजिमेंटने आपली युद्ध डयूटी सुरु केली आहे. यावेळी बेलौसोव यांनी एक महत्वाचं स्टेटमेंट केलय. जे सगळ्या जगासाठी महत्वाचं आहे. ही सिस्टिम Space-border targets म्हणजे अवकाशाच्या सीमेजवळ असलेल्या लक्ष्यांना (Targets) सुद्धा संपवायला सक्षम आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, रशिया आता फक्त हवाई हल्ल्याबद्दल बोलत नाहीय, तर स्पेस वॉरची तयारी करतोय.

एकारात्रीत बनवलेलं शस्त्र नाही

S-500 हे काही एकारात्रीत बनवलेलं शस्त्र नाही. 2002 साली या प्रोजेक्टची सुरुवात झाली होती. जवळपास दोन दशकाच्या रिसर्चनंतर 2021 साली औपाचारिकरित्या S-500 सिस्टिम सैन्याकडे सोपवण्यात आली. डिसेंबर 2024 मध्ये याची पहिली स्पेशल युनिट बनवण्यात आली. आता ही सिस्टिम युद्धाच्या मैदानात आहे. ही सिस्टिम काम कशी करते?

S-500 सिस्टिम कुठल्या अशक्य गोष्टी शक्य करु शकते?

S-500 प्रोमेथियस : जगातील सर्वात कठीण एरियल टार्गेट्सना रोखण्यासाठी ही सिस्टिम डिझाइन करण्यात आली आहे.

ICBMs (Intercontinental Ballistic Missiles) : उपखंडाच्या पार जाणाऱ्या अणवस्त्र मिसाइल्सना उड्डाणाच्या शेवटच्या टप्प्यात हवेत भस्मसात करता येऊ शकतं.

AWACS & Command Planes : युद्धाचा कंट्रोल, माहिती देणारी विमानं या सिस्टिमद्वारे पाडता येऊ शकतात. ऑपरेशन सिंदूरवेळी भारताने पाकिस्तानच असचं AWACS S-400 सिस्टिमने पाडलं होतं. जमिनीवरुन 300 किलोमीटर अंतरावरील टार्गेट नष्ट करण्याची ही पहिलीच वेळ होती.

Low Orbit Satellites : सर्वात खतरनाक म्हणजे S-500 पृथ्वीच्या खालच्या कक्षेत फिरणारे हेरगिरी उपग्रह नष्ट करु शकते.

या मिसाइलमध्ये असं काय घातक आहे?

S-500 म्हणजे फक्त हे एक ट्रकवर ठेवलेलं मिसाइल नाही. ही एक इकोसिस्टिम आहे. रिपोर्टनुसार, रशियाने S-500 ला आपल्या जुन्या A-135 अमूर मिसाइल डिफेंस सिस्टिमशी इंटिग्रेट केलं आहे. सोप्या भाषेत समजायचं झाल्यास मॉस्कोला आता चारही बाजूने सुरक्षा कवच मिळालय. हे कवच भेदणं कुठल्याही देशासाठी जवळपास अशक्यच आहे. अगदी अमेरिकेला सुद्धा हे सुरक्षाकड तोडणं जमणार नाही. पाश्चिमात्य सैन्य विश्लेषकांनुसार (Western Military Analysts) यात वापरली जाणारी 77N6-N इंटरसेप्टर मिसाइल्स गेम चेंजर आहेत. यांची रेंज आणि उंची घाबरवणारी आहे. हे इंटरसेप्टर मिसाइल्स 100 किलोमीटर उंचीपर्यंत जाऊ शकते. म्हणजे पृथ्वीच्या कक्षेबाहेर अवकाशात घुसून शत्रुची मिसाइल्स नष्ट करता येऊ शकतात.

हिट-टू-किल

S-400 ची रेंज 400 किलोमीटर आहे, तर S-500 ची रेंज 600 किलोमीटर असल्याचा दावा केला जातो. ही सिस्टिम ‘हिट-टू-किल’ (Hit-to-Kill) टेक्नोलॉजी वर काम करते. फक्त टार्गेटच्या जवळ जाऊन फुटत नाही, तर आपला वेग आणि ताकदीने थेट समोरुन येणाऱ्या लक्ष्यावर आदळून नष्ट करते.

रशियाने S-500 बाहेर काढण्यामागे दोन कारणं?

आता प्रश्न असा आहे की, रशियाचे याचवेळी S-500 का बाहेर काढलं?. याची दोन कारणं असू शकतात. एक म्हणजे युक्रेनला अमेरिकेकडून मिळणारी ATACMS आणि F-16 फायटर जेट्सला उत्तर देणं आणि दुसरं म्हणजे अमेरिकेला संदेश देणं की, तुम्ही तुमची हायपरसोनिक मिसाइल युरोपमध्ये तैनात केलीत तर त्याचं उत्तर आमच्याकडे आहे. याचा एक पैलू भारताशी सुद्धा कनेक्ट होतो.

भारताने S-500 खरेदी का इंटरेस्ट दाखवला नाही?

रशिया भारताचा जुना संरक्षण भागीदार आहे. त्यांनी S-500 सिस्टिमची भारताला सुद्धा ऑफर दिली आहे. भारताने S-400 चे पाच स्क्वाड्रन आधीच रशियाकडून विकत घेतले आहेत. भारताच्या सर्व सीमांवर हे स्क्वाड्रन तैनात आहेत. पण S-500 वर भारत मौन बाळगून आहे. त्यामागे एक कारण आहे, ते म्हणजे किंमत. S-500 चा खरेदी करार खूप महागडा ठरु शकतो.

Sanctions: अमेरिकेने CAATSA कायदा बनवला आहे. S-400 डीलच्यावेळी सुद्धा हाच कायदा मार्गात अडथळा बनलेला.

Utility : भारताला आता स्पेस-वॉरफेअर क्षमतेची गरज आहे का? हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. S-400 आणि स्वदेशी ‘Project Kusha’ पुरेसं आहे का? सध्या भारत ‘वेट अँड वॉच’च्या स्थितीमध्ये आहे. युक्रेन युद्धात S-500 कसं प्रदर्शन करतो, ते भारताला पहायचं आहे. खरच या मिसाइल्सनी अमेरिकन मिसाइल्सची हवेत राख केली, तर भविष्यात भारत या सिस्टिमच्या खरेदीचा विचार करु शकतो. पण गोष्ट इथेच संपत नाही.

भविष्यातील युद्धामध्ये S-500 सिकंदर का ठरणार?

S-500 मध्ये एक खास गोष्ट आहे, हायपरसोनिक मिसाइल (Hypersonic Missiles) रोखण्याची क्षमता, त्यामुळे ही सिस्टिम भविष्यातील युद्धात सिकंदर ठरेल. आज जगात वेगाने हायपरसोनिक मिसाइल बनवण्यावर काम सुरु आहे. ही मिसाइल्स ध्वनीच्या वेगापेक्षा 5 ते 10 पट जास्त वेगाने लक्ष्याच्या दिशेने झेपावते. S-400 उत्तम आहे, पण हायपरसोनिक अस्त्रांच्या हल्ल्यांविरुद्ध त्यांची गॅरेंटी 100 टक्के नाही. रडारला चकवून एकाक्षणात शहर उद्धवस्त करण्याची क्षमता असलेली मिसाइल सुद्धा S-500 च्या रेंजमधून सुटणार नाही असा रशियाचा दावा आहे.

खरच असं झालं तर अमेरिकेचा दबदबाच संपून जाईल

रशियाच्या याच दाव्यामुळे NATO आणि अमेरिकेची झोप उडाली आहे. S-500 एअर डिफेन्स सिस्टिमबद्दलचे रशियाचे सर्व दावे खरे ठरले तर ते असं अभेद्य सुरक्षा कवच ठरेल जे भेदणं अमेरिकेला सुद्धा जमणार नाही. याचा थेट परिणाम अमेरिकेच्या ‘न्यूक्लियर डेटरेंस’वर होईल. म्हणजे अमेरिकेची इंटरकॉन्टिनेंटल मिसाइल्स (ICBMs) रशियाच्या आकाशात पोहोचताच निष्प्रभ ठरतील. एक महाशक्ती म्हणून अमेरिकेचा दबदबा संपुष्टात येईल.

6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!
6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!.
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप.
लातूरमध्ये फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, देशमुखांच्या योगदानाला सलाम अन्..
लातूरमध्ये फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, देशमुखांच्या योगदानाला सलाम अन्...
उद्धव मामूंना खान, शेख चालतात, पण धुरी, देशपांडे नाही, साटम यांची टीका
उद्धव मामूंना खान, शेख चालतात, पण धुरी, देशपांडे नाही, साटम यांची टीका.
इकडे भाजप-काँग्रेसच्या युती, तिकडे सपकाळांचा मोठा निर्णय, नेत्याला थेट
इकडे भाजप-काँग्रेसच्या युती, तिकडे सपकाळांचा मोठा निर्णय, नेत्याला थेट.
जलील यांच्या कारवरील हल्ल्यामागे कोण? दोन मंत्र्यांची नाव आल्यानं खळबळ
जलील यांच्या कारवरील हल्ल्यामागे कोण? दोन मंत्र्यांची नाव आल्यानं खळबळ.
संभाजीनगरात MIM च्या सभेपूर्वीच जलील यांच्या गाडीवर हल्ला, घडलं काय?
संभाजीनगरात MIM च्या सभेपूर्वीच जलील यांच्या गाडीवर हल्ला, घडलं काय?.
ज्याची लाज वाटायला हवी त्यावर माज..चित्रा वाघ यांची ठाकरेंवर जहरी टीका
ज्याची लाज वाटायला हवी त्यावर माज..चित्रा वाघ यांची ठाकरेंवर जहरी टीका.
कांदिवलीतील बेकायदेशीर आरएमसी प्रकल्प बंद करावा, बसपाची मागणी
कांदिवलीतील बेकायदेशीर आरएमसी प्रकल्प बंद करावा, बसपाची मागणी.
बावनकुळेंच्या भाषणादरम्यान घुसला भाजपचा बंडखोर, स्टेजवर आला अन्...
बावनकुळेंच्या भाषणादरम्यान घुसला भाजपचा बंडखोर, स्टेजवर आला अन्....