AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia-Ukrain War | युद्धात रशियन सैन्याचा मोठा विजय, पुतिन पुन्हा सरस, ‘हे’ शहर घेतलं ताब्यात

Russia-Ukrain War | रशियन सैन्याने रणनितीक दृष्टीने युक्रेनच महत्त्वाच शहर ताब्यात घेतलय. पराभव टाळण्यासाठी जेलेंस्की यांनी नाटो देशांकडे लवकरात लवकर शस्त्र पुरवठ्याची मागणी करत होते. पण काही उपयोग झाला नाही. व्लादिमीर पुतिन यांच्या अचूक रणनितीने युक्रेनला शहरावरचा ताबा सोडावा लागलाय.

Russia-Ukrain War | युद्धात रशियन सैन्याचा मोठा विजय, पुतिन पुन्हा सरस, 'हे' शहर घेतलं ताब्यात
vladimir putin army captured avdiivka ukrainImage Credit source: AP/PTI
| Updated on: Feb 17, 2024 | 12:44 PM
Share

Russia-Ukrain War | मागच्या दोन वर्षांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरु आहे. आता रशियन सैन्याला या युद्धात महत्त्वपूर्ण यश मिळालय. रशियाने युक्रेनच अवदिवका शहर ताब्यात घेतलय. रशियाने हे शहर जिंकलं असलं तरी सध्या ते उद्धवस्त झालेल्या स्थितीमध्ये आहे. बाखमुतपेक्षाही अवदिवकाची भीषण स्थिती आहे. बाखमुतपेक्षाही मोठा संहार इथे झालाय. यूक्रेनने अवदिवकामधून आपल उरलेलं सैन्य काढून घेण्याचा निर्णय घेतलाय. युक्रेनचे नवीन सैन्य प्रमुख जनरल सिरीस्की यांनी ही घोषणा केलीय. मे 2023 बाखमुतनंतर रशियन सैन्याला मिळालेला हा मोठा विजय आहे.

शस्त्रास्त्रांची कमतरता आणि रशियाच्या आक्रमक हल्ल्याने युक्रेनी सैन्याला माघार घेण्यास भाग पाडलं. रशियन फौजांनी तिन्ही बाजूंनी घेरुन युक्रेनी सैन्यावर हल्ला केला. त्यामुळे युक्रेनी सैन्याला रसद मिळण बंद झालं. आता युक्रेनी सैन्य माघारी फिरलय. पराभव टाळण्यासाठी जेलेंस्की यांनी नाटो देशांकडे लवकरात लवकर शस्त्र पुरवठ्याची मागणी केली आहे.

युक्रेनी सैन्याला का माघार घ्यावी लागली?

अवदिवका शहर पूर्णपणे उद्धवस्त झालय. हजारो इमारती असलेल्या शहरात पडक्या भिंती उरल्या आहेत. अर्ध्या जळालेल्या अवस्थेत काही इमारती आहेत. 32 हजार लोकसंख्येच अवदिवका शहर आज ओस पडलय. शहर उद्धवस्त झालय. युक्रेनी सैन्य पराभूत होऊन अवदिवकातून काढता पाय घेतय. भग्नावस्थेत हे शहर आहे. युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की मदतीसाठी याचना करत होते. ज्यामुळे अवदिवकामधून युक्रेनी सैन्याला वाचवल जाऊ शकत होतं. पण काही उपयोग झाला नाही. शस्त्रास्त्रांच्या कमतरतेमुळे युक्रेनी सैन्याला अवदिवकामध्ये पाय रोवून राहण कठीण बनलं होतं. मारियुपोलसारखी इथे स्थिती निर्माण झाली होती.

रशियासाठी हे शहर इतक महत्त्वाच का आहे?

अवदिवका शहर रणनीतिक दृष्टीने रशियासाठी खूप महत्त्वाच आहे. अवदिवकामधून डोनेस्कमध्ये एंट्री करता येते. रशियाच्या ताब्यात असलेलं डोनेस्क आणि अवदिवकामध्ये फक्त 15 किलोमीटरच अंतर आहे. डोनबासमध्ये इंडस्ट्री आहे. डोनबासवर ताबा मिळवण्यासाठी अवदिवकावर कब्जा आवश्यक होता. अवदिवकामध्ये युक्रेनने बंकर्सच जाळ विणलं होतं. बंकरमुळेच युक्रेनी सैन्य रशियन सैन्यासमोर 5 महिने टिकाव धरु शकलं.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.