युद्ध आणखी चिघळणार? युक्रेनला मिळाली अशी मदत ज्याने उडाली रशियाची झोप, तब्बल 1 लाख…बाहुबली देश मदतीला!
रशियाची झोप उडवणारी एक मोठी माहिती समोर आली आहे. युक्रेनला तब्बल 1 लाख ड्रोन मिळणार आहेत. ब्रिटनकडून ही मदत केली जाणार आहे.

Russia Ukrain War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध चांगलेच भडकले आहे. युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला आहे. या ड्रोन हल्ल्यात एकूण 41 विमानं ध्वस्त झाली आहेत. या हल्ल्यानंतर रशिया देश चांगलाच चवताळला असून तो युक्रेनला चोख प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता रशियाला घाम फोडणारी माहिती समोर आली आहे. युक्रेनच्या मदतीला आता ब्रिटन उतरला असून या देशातर्फे चक्क 1 लाख ड्रोन युक्रेनला देण्यात येणार आहेत.
ब्रिटन देणार एक लाख ड्रोन
गेल्या साधारण अडीच वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू आहे. या काळात दोन्ही देशांनी एकमेकांवर मोठे हल्ले केले आहेत. अलिकडेच 2 जून रोजी ड्रोन हल्ले केले आहेत. युक्रेनने रशियात घुसून हे हल्ले केले आहेत. असे असतानाच आता ब्रिटेन देशाने युक्रेनला 2026 सालापर्यंत तब्बल 1 लाख ड्रोन देण्याचे ठरवले आहे. रशियासोबत युद्ध चालू असताना रशियाला आता एवढी मोठी मदत मिळणार असल्याने आता युक्रेनचे बळ चांगलेच वाढणार आहे. ब्रिटनने युक्रेनला पुरण्यात येत असलेल्या ड्रोन्समध्ये तब्बल 10 पटीने वाढ केली आहे.
ड्रोन हल्ल्यांत युक्रेन सरस
याआधी जर्मनीनेदेखील युक्रेनची मदत करण्याचे जाहीर केले होते. जर्मनी लवकरच युक्रेनला लाबं पल्ल्यांचे क्षेपणास्त्र देणार आहे. युक्रेनला इतरही अनेक देशांकडून मदत मिळत आहे. तोफ, बंदूक तसेच गोळीबार यांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांत रशिया युक्रेनपेक्षा वरचढ ठरतोय. मात्र ड्रोन हल्ल्यांमध्ये युक्रेनने सरशी घेतली आहे. त्यामुळे आता ब्रिटन युक्रेनला तब्बल 1 लाक ड्रोन देणार आहे.
जर्मनीदेखील करणार युक्रेनला मदत
ब्रिटनने युक्रेनला ड्रोन यांच्याव्यतिरिक्त 4.5 अब्ज पाउंड एवढी सैन्य मदत करण्याचे जाहीर केलेले आहे. याच घोषणेअंतर्गत आम्ही हे 1 लाख ड्रोन युक्रेनला देऊ असे ब्रिटनने स्पष्ट केलेय. ब्रिटनचे संरक्षणमंत्री जॉन हेली याबाबतची घोषणा करणार आहेत. या वर्षाच्या शेवटपर्यंत हजारो ड्रोन युक्रेनला दिले जाणार आहेत. आगामी वर्षाच्या एप्रिलपर्यंत एक लाख ड्रोन देण्याचा विचार ब्रिटनचा आहे. दरम्यान, आता ब्रिटनच्या या मदतीनंतर रशिया नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
