ही तर छोटी डुकरे… व्लादिमीर पुतिन यांचा थेट भडका, युरोपीयन नेत्यांबद्दल संताप, भारतानंतर..
व्लादिमीर पुतिन काही दिवसांपूर्वीच भारताच्या दाैऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी काही महत्वाचे करार भारतासोबत गेले. आता नुकताच पुतिन चांगलेच भडकल्याचे बघायला मिळत आहे. यामुळे युद्ध पेटण्याची शक्यता आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसीय भारत दाैऱ्यावर होते. भारतावरील अमेरिकेच्या वाढत्या दबावानंतर पुतिन थेट भारत दाैऱ्यावर आले आणि त्यांनी काही महत्वपूर्ण करार केली. युक्रेन आणि रशियातील तणावात सुरूवातीपासूनच अमेरिकेची भूमिका राहिली आहे. युक्रेनला रशियाविरोधातील युद्धात अमेरिकेने मदत केली हे जगजाहीरच आहे. आता अमेरिका दोन्ही देशातील युद्ध थांबवण्यासाठी शांतता प्रस्ताव तयार करत आहे. मात्र, अमेरिकेच्या पहिल्याच युद्ध शांतता कराराला युक्रेनने केराची टोपली दाखवली. युक्रेनने घेतलेली ही भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांना अजिबातच पटली नाही आणि त्यांनी थेट केलेल्या सर्व मदतीचा पाढाच वाचून दाखवला. रशियाने थेट म्हटले होते की, आम्ही एकट्या युक्रेनसोबत नाही तर संपूर्ण नाटो देशांसोबत युद्ध लढत आहोत. रशियाविरोधात नाटो देश थेट युद्धाच्या मैदानात युक्रेनच्या बाजूने उभे आहेत.
व्लादिमीर पुतिन यांनी आता थेट युरोपीयन नेत्यांवर जोरदार टीका केली. पुतिन यांनी युरोपीयन नेत्यांना थेट छोटी डुकरेच म्हटले. राजकीय मुत्सद्देगिरीद्वारे असो किंवा लष्करी सामर्थ्याच्या बळावर असो. त्यांनी संरक्षण मंत्रालयासोबतच्या वार्षिक बैठकीदरम्यान हे विधान केले. यादरम्यान पुतिन यांनी युरोपीयन नेत्यांवर चांगलाच भडका काढला. पुतिन म्हणाले की, विशेष लष्करी मोहीम ज्याला रशिया म्हणतो त्याची सर्व उद्दिष्ट्ये कोणत्याही अटीशिवाय साध्य केली जातील.
यादरम्यान थेट इशारा देत पुतिन यांनी म्हटले की, विषयावर गंभीरपणे चर्चा होणार नसेल तर रशिया रणांगणात आपल्या ऐतिहासिक प्रदेशांना मुक्त करेल. विशेष म्हणजे पुतिन यांनी हे भाष्य अशावेळी केले, ज्यावेळी युक्रेन युद्धासंदर्भात आंतरराष्ट्रीय राजनैतिक प्रयत्न तीव्र होत असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. यादरम्यान पुतिन यांनी थेट अमेरिकेचे नाव घेत मोठा आरोपही लावला.
पुतिन यांनी म्हटले की, मागील अमेरिकन प्रशासनाने जाणीवपूर्वक परिस्थितीला सशस्त्र संघर्षाच्या दिशेने ढकलले. अमेरिकेच्या भूमिकेबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. काही गोष्टी अमेरिका जाणूनबुजून करत असल्याचे पुतिन यांनी स्पष्टपणे म्हटले. याच दरम्यान, पुतिन यांनी असा दावाही केला की रशियाचा नाटो देशांवर हल्ला करण्याचा कोणत्याही विचार नाहीये. युक्रेनला नाटो देश साथ देत असल्याने रशिया त्यांच्यावरही हल्ला करू शकतो, असे सांगितले जात होते. त्यावरही पुतिन यांनी स्पष्टीकरण दिले.
