
आज संध्याकाळी 6.30 वाजता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन विशेष विमानाने नवी दिल्लीत दाखल होतील. रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच पुतिन भारत दौऱ्यावर येत आहेत. याआधी ते फक्त चीनमध्ये गेले होते. पुतिन यांच्या भारत दौऱ्याकडे जगातील अनेक महत्वाच्या देशांच लक्ष लागलं आहे. कारण त्यांच्या या दौऱ्यात जे करार होतील, त्याचे काही देशांवर दूरगामी परिणाम होतील. उदहारणार्थ रशिया-युक्रेन युद्धात भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. कारण भारताच्या तेल खरेदीमुळे रशियाला आर्थिक रसद मिळते. त्यातून युद्ध सुरु ठेवण्यासाठी त्यांना बळ मिळतं. म्हणून अमेरिकेने हा निर्णय घेतला.
व्लादीमीर पुतिन आज भारतात येतील. उद्या सकाळी त्यांची पतंप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठक आहे. या बैठकीत काय करार होणार? त्यावर सर्वांच लक्ष लागलं आहे. खासकरुन संरक्षण करार दोन्ही देशांसाठी महत्वाचे आहेत. ऊर्जा करारावर अमेरिकेच लक्ष असेल. भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार, असं ट्रम्प म्हणत आहेत. रशिया भारताला अजून सवलतीच्या दरात तेल पुरवठ्यासाठी तयार आहे. या संदर्भात करार झाला, तर अमेरिका-युरोपसाठी ती वाईट बातमी असेल. कारण त्यातून रशियाला आर्थिक ताकद मिळेल.
पाकिस्तानला सर्वात जास्त टेन्शन कुठलं असेल?
मोदी-पुतिन बैठकीच सर्वात जास्त टेन्शन पाकिस्तानला असेल. भारत आणि रशियामध्ये संरक्षण करार काय होणार? यावर पाकिस्तानची नजर असेल. रशियाने भारताला SU-57 देण्याची तयारी दाखवली आहे. हे पाचव्या पिढीचं स्टेल्थ फायटर जेट आहे. स्टेल्थ विमानं रडारला दिसत नाहीत. त्याची चिंता पाकिस्तानला आहे. दुसऱ्याबाजूला S-500 च सर्वात जास्त टेन्शन पाकिस्तावर असेल.
पाकिस्तानी विमानं पाडली
भारताने 2018 साली रशिया बरोबर S-400 ची पाच रेजिमेन्ट खरेदी करण्याचा करार केला. त्यातली दोन रेजिमेन्ट अजून बाकी आहेत. तीन S-400 एअर डिफेन्स सिस्टिम भारताला मिळाली आहेत. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाकिस्तानने S-400 ची कमाल पाहिली. या एअर डिफेन्स सिस्टिमुळे पाकिस्तानच एक मिसाइल, ड्रोन, फायटर जेट भारतापर्यंत पोहोचू शकलं नाही. उलट पाकिस्तानात खोलवर 300 किलोमीटर आत घुसून पाकिस्तानी विमानं पाडली.
पाकिस्तानची काय इच्छा असेल?
S-500 तर S-400 च्या अनेक पावलं पुढे आहे. अशी सिस्टिम भारताच्या हाती आली, तर पाकिस्तानची अजून वाट लागेल. ड्रोन, मिसाइल सोडा त्यांना त्यांची F-16, JF-17 ही फायटर जेट्स अफगाणिस्तान, इराणच्या सीमेजवळ लपवावी लागतील. युद्ध प्रसंगात त्यांचं एक फायटर जेट तिथल्या एअर बेसवरुन उडणार नाही. त्यामुळे S-500 चा खरेदी करार होऊ नये, हीच त्यांची इच्छा असेल.