AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Rushdie : बुकर पुरस्कार विजेते लेखक सलमान रश्दी यांच्यावर चाकू हल्ला! न्यूयॉर्कमधील कार्यक्रमात धक्कादायक घटना

रश्दींची ओळख करून देत असताना त्यांना भोकसलं आहे. या हल्ल्यानंतर रश्दी हे जमीनीवर कोसळले. सलमान रश्दी हे बुकर पुरस्कार विजेते लखक आहेत. तसेच ते त्यांच्या लिखानामुळे अनेकदा वादातही राहिले आहेत.

Salman Rushdie : बुकर पुरस्कार विजेते लेखक सलमान रश्दी यांच्यावर चाकू हल्ला! न्यूयॉर्कमधील कार्यक्रमात धक्कादायक घटना
बुकर पुरस्कार विजेते लेखक सलमान रश्दी यांच्यावर चाकू हल्ला! न्यूयॉर्कमधील कार्यक्रमात धक्कादायक घटनाImage Credit source: twitter
| Updated on: Aug 12, 2022 | 9:06 PM
Share

न्यूयॉर्कमधील चौटौका येथे भाषण देण्यापूर्वी कादंबरीकार सलमान रश्दी (Writer Salman Rushdie) यांच्यावर चाकूने वार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. असोसिएटेड प्रेसच्या रिपोर्टरनुसार चौटाका इन्स्टिट्यूटच्या स्टेजवर एका व्यक्तीने रश्दी यांच्यावर तुफान हल्ला केला. रश्दींची ओळख करून देत असताना त्यांना भोकसलं (Stabbed) आहे. या हल्ल्यानंतर रश्दी हे जमीनीवर कोसळले. सलमान रश्दी हे बुकर पुरस्कार विजेते (Booker Award) लखक आहेत. तसेच ते त्यांच्या लिखानामुळे अनेकदा वादातही राहिले आहेत. रश्दींच्या “द सॅटॅनिक व्हर्सेस” या पुस्तकावर 1988 पासून इराणमध्ये बंदी घालण्यात आली आहे, कारण अनेक मुस्लिमांनी ते निंदनीय मानले आहे. एका वर्षानंतर इराणचे दिवंगत नेते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी रश्दींच्या मृत्यूची मागणी करणारा फतवा जारी केला. इराणने रश्दींना मारणाऱ्यास $3 दशलक्षपेक्षा जास्त बक्षीस देणार असे जाहीर केले आहे.

हल्ल्याचा व्हिडिओ

हल्ल्याबाबत ट्विट

कोण आहेत सलमान रश्दी?

सलमान रश्दी हे जागतिक किर्तीचे मात्र अनेकदा वादग्रस्त ठरलेले लेखक आहेत. त्यांच्या पुस्तकात महंमद पैगंबराची निंदा आहे असा आरोप करत भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधई यांनी रश्दी यांच्या सॅटानिक व्हर्सेस या पुस्तकावर बंद घातली होती. मात्र अशी बंदी घालणं ही राजीव गांधी यांची चूक होती असं माजी गृहमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी 2015 मध्ये म्हटलं होतं.

सर अहमद सलमान रश्दी यांचा जन्म 19 जून 1947 मध्ये झाला. ते ब्रिटिश भारतीय कादंबरीकार आणि लेखक आहेत. त्यांच्या मिडनाईट्स चिल्ड्रेन या दुसऱ्या कादंबरीला 1981 मध्ये बुकर पुरस्कार मिळाला आहे. त्यांची चौथी कादंबरी सॅटानिक व्हर्सेस ही वादाचं केंद्र ठरली होती. या कादंबरीला अनेक मुस्लिम देशांनी जोरदार विरोध केला. काही भागात तर हिंसक आंदोलनं झाली होती. या पार्श्वभूमीवर रश्दी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसंच 1989 मध्ये ईराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला खौमैनी यांनी एक फतवाही काढला होता. या पार्श्वभूमीवर रश्दी यांना तब्बल एक दशक भूमिगत व्हावं लागलं होतं.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.