Saudi Arabia Bus Accident : अपघातातील 45 भारतीयांचे मृतदेह सौदी अरेबियातच पुरणार, कारण जाणून हैराण व्हाल
Saudi Arabia Bus Accident : सौदी अरेबियात 45 भारतीयांचा मृत्यू... मक्का आणि मदिना येथील जमिनीवर मृत्यू आला की काय होतं? मृतदेह सौदीमध्येच पुरण्याचा कायदा, कारण जाणून व्हाल हैराण..., घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

Saudi Arabia Bus Accident : सौदी अरेबियात मक्का आणि मदिना जवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. हायवेवर हज यात्रेला गेल्या प्रवाशांची बस एका डीझेल ट्रँकरला धडकते आणि बसला आग लागते. या भीषण आगीत 45 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या बसमध्ये एकाच कुटुंबातील 18 जण सदस्य प्रवास करत होते आणि या सर्वांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे एका क्षणात कुटुंबातील तीन पिढ्या नष्ट झाल्या आहेत. आता अपघातात मृत्यू झालेल्या भारतीयांवर सौदी अरेबियात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती समोर येत आहे. अशात प्रश्न निर्माण होतो की, भारतीयांचे मृतदेह भारतात का परत आणले जाऊ शकत नाहीत. यामागे देखील मोठं कारण आहे.
भारतात का नाही येऊ शकत भारतीयांचे मृतदेह?
सौदी अरेबियात याबद्दल एक कायदा आहे. ज्यामध्ये उमरा मंत्रालयाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. एवढंच नाही तर, यात्रेसाठी आलेल्या लोकांकडून डिक्लेरेशन फॉर्म भरुन घेतला जातो. ज्यावर सही केल्याशिवाय मुस्लिम बांधव यात्रा करु शकत नाही… या फॉर्ममध्ये स्पष्ट लिहिलेलं असतं की, जर यात्रे दरम्यान, सौदीच्या जमिनीवर कोणाचा मृत्यू झाला तर, त्या व्यक्तीला सौदीमध्येच पुरण्यात येणार… मृतदेहाला त्याच्या देशात पाठवलं जाणार नाही… अशात सौदी येथे कामाच्या निमित्ताने आलेल्या लोकांसाठी कायदा वेगळा आहे.
पण भारतातील कोणती व्यक्ती खासगी कामासाठी किंवा नोकरीसाठी सौदी येथे असेल आणि त्याचं निधन झालं तर, त्याच्या कुटुंबियांच्या इच्छेने त्या व्यक्तीचं मृतदेह मायदेशी आणलं जाऊ शकतं. तर व्यक्तीचं कुटुंब देखील सौदी येथे असेल आणि तिथेच अंत्यसंस्कार करायचे असतील, तर मृतदेहाला पुरलं जातं…
कसं मिळतं डेथ सट्रिफिकेट?
आता प्रश्न असा निर्माण होतो की, जर मृत्यूनंतर मृतदेह सौदी अरेबियातून परत आणता येत नसेल तर मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे कशी मिळवायची? यासाठी एक सविस्तर प्रक्रिया आहे. जेव्हा एखाद्या यात्रेकरूचा मृत्यू होतो तेव्हा हज मंत्रालयाने त्या देशातील हज मिशनला त्याची माहिती द्यावी लागते. ही माहिती सौदी हज मंत्रालयाच्या वेबसाइटवर देखील पोस्ट केली आहे. यानंतर, मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे हज कार्यालयातून मिळू शकतात.
