AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सौदी अरेबियातील भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन पिढ्या संपल्या, 18 जण जागीच गेले, याला जबाबदार कोण?

Saudi Arabia bus fire big update: एका झटक्यात कुटुंबाची राखरांगोळी..., सौदी अरेबियातील भीषण अपघातात कुटुंबातील तीन पिढ्या संपल्या, घडलेल्या घटनेला जबाबदार कोण?

सौदी अरेबियातील भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन पिढ्या संपल्या, 18 जण जागीच गेले, याला जबाबदार कोण?
Saudi Arabia bus fire
| Updated on: Nov 18, 2025 | 10:04 AM
Share

Saudi Arabia bus fire big update: सौदी अरेबियात घडलेल्या दुर्घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. धार्मिक कार्यासाठी गेलेल्या भाविकांनी भीषण आगीत स्वतःचे प्राण गमावले आहे. ही फक्त दुर्घटना नही तर, बसीमधील 45 भारतीय प्रवाशांची अखेरची यात्रा ठरली. अपघात तर भीषण होताच, पण या अपघातात हैदराबाद येथील एकाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कारण कुटुंबाने एकाच वेळी 18 जवळच्या लोकांना गमावलं आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील तब्बल तीन पिढ्यांचा अंत झाला आहे. हज यात्रा पूर्ण झाल्यानंतर कुटुंबिया घराच्या दिशेने निघाले असताना काळाने त्यांच्यावर घाला केला. भक्तांच्या बसने एका डीझेलने भरलेल्या टँकरला धडक मारली आणि क्षणात सर्वकााही संपलं.

कुटुंबातील सदस्यांची हज यात्री हैदराबाद येथील मुसीराबाद येथे राहणाऱ्या शे नसीरुद्दीन आणि पत्नी अख्तर बेगम यांच्या कुटुंबासाठी दुःखाची लाट होऊन आली. या अपघातात त्यांचा मुलगा, दोन मुली, सुना आणि इतर सदस्यांचा मृत्यू झाला आहे… या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबात दुःखाचा डोंगर कोसळला आहे..

पीडित कुटुंबातील सदस्य मोहम्मद असलम पूर्णपणे कोलमडला आहे… ‘आमच्या 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सरकारने चौकशी करायला हवी… दोषींना शिक्षा झालीच पाहिजे…’. या अपघातात साबिहा बेगम, त्यांचा मुलगा इरफान, सून हुमैर आणि त्यांचे दोन मुलं हामदान आणि इझान.. यांचा मृत्यू झाला आहे.. नातेवाईयांच्या डोळ्यात सध्या फक्त दुःख आणि पाणी आहे.

रिपोर्टनुसार, तेलंगाना स्टेट हज कमिटीते अध्यक्ष गुलाम अफजल बियाबनी यांनी दुर्दैवी घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. ‘खासगी ऑपरेटर्स यांच्यावर माझं थेट नियंत्रण नाही. पण कुटुंबियांची शक्य ती सर्व मदत करू. हा खूप कठीण काळ आहे. आम्ही संपूर्ण माहिती आणि मदत देऊ… असं म्हणत मनापासून संवेदना व्यक्त केल्या.

कोण आहे या सामूहिक मृत्यूसाठी जबाबदार?

या भयानक अपघाताला कोण जबाबदार आहे? ही बस चालकाची चूक होती का? की खाजगी ऑपरेटरचा निष्काळजीपणा होता? उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे सखोल चौकशी झालीच पाहिजे, सत्य बाहेर आले पाहिजे, कारण 18 स्वप्ने, 18 जीवने आणि 18 कथा फक्त जाळून राख करता येत नाहीत.

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.