AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran Israel War : अमेरिकन बेसवरील इराणच्या हल्ल्यानंतर अखेर सौदी अरेबियाचा खरा चेहरा उघड

Iran Israel War : इराणने काल रात्री कतरमधील अल-उदीद या अमेरिकेन एअरबेसवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाच्या मनात काय चाललं आहे? इराणबद्दलच्या त्यांच्या खऱ्या भावना समोर आल्या. इराणने बदला घेण्यासाठी सोमवारी रात्री अमेरिकेच्या एअर बेसवर अनेक मिसाइल्स डागली.

Iran Israel War : अमेरिकन बेसवरील इराणच्या हल्ल्यानंतर अखेर सौदी अरेबियाचा खरा चेहरा उघड
Mohammed bin Salman
| Updated on: Jun 24, 2025 | 9:35 AM
Share

इस्रायल-इराणमध्ये सुरु असलेल्या संघर्षामुळे फक्त हे दोन देशच नाही, तर जग चिंतेत आहे. अमेरिकेने 22 जून रोजी इराणच्या तीन न्यूक्लियर तळांवर बॉम्बफेक करुन ते नष्ट केले. अनेक देशांनी या हल्ल्याचा निषेध केला. सौदी अरेबियाने मात्र सावध भूमिका घेतली. 23 जूनच्या रात्री जेव्हा इराणने कतरमधील अमेरिकेच्या बेसवर हल्ला करुन प्रत्युत्तर दिलं, तेव्हा मात्र सौदी अरेबियाने कठोर शब्दात निषेध केला. इराणने बदला घेण्यासाठी सोमवारी रात्री अमेरिकेच्या एअर बेसवर अनेक मिसाइल्स डागली. इराणने एकूण 19 मिसाइल्स फायर केली. रिपोर्टनुसार यातील 18 मिसाइल्स एअर डिफेन्स सिस्टिमने हवेतच नष्ट केली.

इराण आणि कतरमधील मतभेद कोणापासून लपून राहिलेले नाहीत. अनेकदा दोन्ही देशांमध्ये वाद झाले आहेत. 12 जून रोजी इराण-इस्रायलमध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर सौदी अरेबियाने सावध भूमिका घेतली होती. 21 जूनच्या रात्री अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर सौदी अरेबियाने सावध शब्दात आपली भूमिका मांडली.

तेव्हा मात्र सौदी अरेबिया खवळला

दुसऱ्याबाजूला इराणने अमेरिकेशी बदला घेण्यासाठी 23 जून रोजी अल-उदीद एअरबेसवर मिसाइल हल्ला केला, तेव्हा मात्र सौदी अरेबिया खवळला. सौदी अरेबियाने अत्यंत कठोर शब्दात या हल्ल्याचा निषेध केला. महत्त्वाच म्हणजे या सगळ्या घटनाक्रमात सौदी अरेबिया अमेरिकेबद्दल काही बोलला नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे, सौदी अरेबियासाठी इराणपेक्षा अमेरिका जास्त जवळचा आहे. मुस्लिम देश असून त्यांचं दुटप्पी धोरण यातून दिसतं.

सौदी अरेबियाने काय म्हटलं?

अल-उदीद एअरबेसवर इराणचा मिसाइल हल्ला हा आंतरराष्ट्रीय कायदा आणि शेजारी देशासोबतच्या संबंधांच उल्लंघन आहे अशी भूमिका सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने घेतली. हे एक बेजबाबदार पाऊल आहे, कुठल्याही परिस्थितीत याला योग्य ठरवता येऊ शकत नाही, अशी सौदीची भूमिका आहे.

इराणने कतरवर केलेल्या हल्ल्यावर काय स्पष्टीकरण दिलं?

इराणच्या सुप्रीम नॅशनल सिक्योरिटी काउन्सिलने अल-उदीद एअरबेसवर केलेल्या मिसाइल हल्ल्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. हा एअर बेस कतरच्या नागरी वस्तीपासून लांब आहे. ही कारवाई आमचा मित्र आणि बंधुता असलेल्या कतर आणि तिथल्या लोकांसाठी अजिबात धोकादायक नाही. इराण कतरसोबत आपले ऐतिहासिक संबंध कायम ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे असं इराणने म्हटलं आहे. या सगळ्या प्रकरणात सौदीने अमेरिकेऐवजी इराणवर खापर फोडलं आहे. सोबतच त्यांना धमकावलं आहे. यावरुन एक स्पष्ट आहे, सौदी अरेबियाला अमेरिकेला अजिबात नाराज करायच नाहीय.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.