SCO मध्ये भारताला मोठं यश, चीनच्या भूमीवर शहबाज शरीफ यांच्यासमोर पाकिस्तानला दिला मोठा झटका
Sco Summit 2025 : चीनच्या तियानजिन शहरात SCO शिखर सम्मेलन सुरु आहे. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाच्या पार्श्वभूमीवर या परिषदेच्या निमित्ताने पुतिन, शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र आलेत. त्यामुळे शंघाय सहकार्य परिषदेची खूप चर्चा आहे. या परिषदेत भारताने पाकिस्तानला एक मोठा झटका दिला आहे.

चीनच्या तियानजिन शहरात शंघाय सहकार्य परिषदेची (SCO) बैठक सुरु आहे. या बैठकीत SCO नेत्यांच्या सर्वसम्मतीने एक SCO घोषणापत्र जारी करण्यात आलय. या घोषणापत्रात जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याता एकसूरात निषेध करण्यात आला. हा कट रचणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची, त्यांना शिक्षा देण्याची एकसूरात मागणी करण्यात आली. पहलगाम हल्ल्याचा निषेध करताना पाकिस्तानचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनात दहशतवादाविरुद्ध दुटप्पी भूमिका मान्य नाही, हे स्पष्ट केलं. पहलगाम दहशतवादी हल्ला हा मानवतेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक देशासाठी एक खुलं आव्हान आहे, असं पीएम मोदी म्हणाले. त्यांनी सर्व SCO सदस्यांना दहशतवादाविरुद्ध लढाईत एकत्र येण्याच आवाहन केलं. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ स्वत: SCO परिषदेला उपस्थित आहेत. त्यांच्यासमोर हे सर्व होणं हा त्यांच्यासाठी मोठा झटका आहे.
तियानजिन घोषणापत्रात काय खास?
सदस्य देशांनी 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.
मृत आणि जखमींच्या कुटुंबाप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या. असे हल्ले घडवून आणणाऱ्यांना, त्यांचे प्रायोजक, संयोजकांना न्यायाच्या पिंजऱ्या उभं केलं पाहिजे.
सदस्य देश दहशतवाद, फुटीरतावाद आणि उग्रवाद यांच्याविरोधातील लढाईत आपण कटिबद्ध असल्याची पुष्टी करतात. दहशतवाद, फुटीरतावाद आणि उग्रवाद यांचा उद्देशपुर्तीसाठी वापर मान्य नाही. दहशतवाद आणि उग्रवादाचा सामना करण्यासाठी संप्रभु देश आणि त्यांच्या सक्षम अथॉरिटीजच्या लीडिंग रोलला आमची मान्यता आहे.
सदस्य देश सर्व प्रकारचा दहशतवाद आणि अभिव्यक्तीचा आम्ही कठोर शब्दात निषेध करतात. दहशतवाद विरुद्ध लढाईत दुटप्पीपणा चालणार नाही. आंतरराष्ट्रीय सुमदायाला दहशतवादाचा मुकाबला करण्याचं आवाहन करतो.
भारताच्या कुठल्या उपक्रमांना मान्यता?
‘एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य’ हा भारताचा मूळ विचार घोषणापत्रातून दिसून येतो.
सदस्य देशांनी एससीओ थिंक टँक फोरम (नवी दिल्ली, 21-22 मे 2025) 20 व्या बैठक आयोजनाचा उल्लेख केला.
सांस्कृतिक आणि मानवीय आदान-प्रदान भक्कम करण्यासाठी भारतीय विश्व परिषदेचे (आयसीडब्ल्यूए) एससीओ अध्ययन केंद्राचा सुद्धा उल्लेख केला.
