Scoliosis: मुलीच्या पाठीचा वाकला होता मणका.. डॉक्टरांनी लावला ‘दोरी’ चा नवा कणा! शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी झाली पायांवर उभी
कोरोना काळापासून वर्क फ्रॉम होम कल्चर सुरू झाले. मोठ्यांसोबतच लहानांच्या शाळा आणि शिकवणी वर्गसुद्धा ऑनलाईन झाले. त्यामुळे सध्या मणक्याशी संबंधित समस्या अनेक लोकांमध्ये दिसून येतात. चुकीची बसण्याची पद्धत, खराब जीवनशैली, व्यायामाचा अभाव (Lack of exercise), वृद्धत्व, अनियंत्रित मधुमेह, वाढलेले कोलेस्ट्रॉल इत्यादींमुळे मणक्यात वेदना होतात, ज्याला स्पॉन्डिलायटिस म्हणतात. दुखापत, सेब्रल पाल्सी, मस्क्यूलर डिस्ट्रॉफी किंवा इतर कारणांमुळे […]

कोरोना काळापासून वर्क फ्रॉम होम कल्चर सुरू झाले. मोठ्यांसोबतच लहानांच्या शाळा आणि शिकवणी वर्गसुद्धा ऑनलाईन झाले. त्यामुळे सध्या मणक्याशी संबंधित समस्या अनेक लोकांमध्ये दिसून येतात. चुकीची बसण्याची पद्धत, खराब जीवनशैली, व्यायामाचा अभाव (Lack of exercise), वृद्धत्व, अनियंत्रित मधुमेह, वाढलेले कोलेस्ट्रॉल इत्यादींमुळे मणक्यात वेदना होतात, ज्याला स्पॉन्डिलायटिस म्हणतात. दुखापत, सेब्रल पाल्सी, मस्क्यूलर डिस्ट्रॉफी किंवा इतर कारणांमुळे पाठीचा कणा वाकणे ही समस्या देखील अनेक लोकांमध्ये होऊ शकते. या स्थितीला स्कोलियोसिस (Scoliosis) म्हणतात. या स्थितीत पाठीचा कणा एका बाजूला फिरतो आणि व्यक्ती एका बाजूला झुकलेली दिसते. नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे ज्यामध्ये एका 13 वर्षांच्या मुलीलाही असाच त्रास झाला होता. डॉक्टरांच्या टीम ने या मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया करून दोरीच्या साह्याने मुलीचा मणका सरळ केला आहे. जाणून घ्या, काय आहे शस्त्रक्रीया, दोरीच्या साहाय्याने (With the help of a rope) मणक्याला कसा आधार दिला?
दुबईमध्ये झाली शस्त्रक्रिया
शस्त्रक्रिया झालेल्या मुलीचे नाव सलमा नसेर नवसेह आहे. ती १३ वर्षांची आहे. सलमा ही जॉर्डन या अरब देशाची रहिवासी आहे. दुबईतील बुर्जील हॉस्पिटलमध्ये तिचे ऑपरेशन करण्यात आले. ही अनोखी शस्त्रक्रिया करणारी सलमा ही मध्यपूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील पहिली मुलगी ठरली आहे. सलमाच्या पाठीचा कणा दोरीने दुरुस्त करण्यात आला असून आता ऑपरेशननंतर ती बरी होत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवसापासून सलमाने चालायला सुरुवात केली आहे. मणक्याला दोरीने आधार दिला 13 वर्षांच्या सलमावर काही वेळापूर्वी वर्टेब्रल बॉडी टिथरिंग (VBT) शस्त्रक्रिया झाली होती. या शस्त्रक्रियेमध्ये पाठीच्या कण्याला दोरीचा आधार दिला जातो आणि नंतर ती स्क्रूने घट्ट केली जाते. मणक्याचे फिरणे योग्य होईपर्यंत स्क्रूच्या मदतीने दोरी घट्ट केली जाते. पाठीचा कणा योग्य स्थितीत आला की, मणक्याच्या प्रत्येक भागात स्क्रू लावले जातात. VBT शस्त्रक्रिया सध्या अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनीसह काही देशांमध्ये प्रसिद्ध आहे परंतु प्रथमच ही शस्त्रक्रिया उत्तर आफ्रिका प्रदेशात करण्यात आली.
सलमा बरी होत आहे
दुबईतील बुर्जील रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर सलमा बरी होत आहे. लवकरच ती पूर्वीप्रमाणे टेनिस खेळू शकणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमाच्या पालकांना एप्रिल 2022 मध्ये पहिल्यांदा लक्षात आले होते की, त्यांच्या मुलीची बॉडी एका बाजूला झुकत आहे. त्यानंतर डॉक्टरांना दाखवल्यावर त्यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीला स्कोलियोसिस आहे. जरी ही समस्या जन्मापासून मुलामध्ये दिसू लागते, परंतु बर्याच प्रकरणांमध्ये, स्कोलियोसिस 10-15 वर्षांच्या दरम्यान होतो. स्कोलियोसिसची बहुतेक प्रकरणे सौम्य असतात आणि त्यांना शस्त्रक्रिया आवश्यक नसते. परंतु काही प्रकरणांमध्ये, स्कोलियोसिसमुळे हृदय आणि फुफ्फुसांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. सलमाच्या मणक्यात 65 अंशांचा ट्विस्ट होता.
तीन प्रकारे उपचार
दुबईच्या बुर्जील हॉस्पिटलचे सल्लागार ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. फिरास हुसबन यांनी या शस्त्रक्रियेचे नेतृत्व केले. डॉ.फिरास यांच्या मते स्कोलियोसिस अनेक लोकांमध्ये दिसून येते. यांच्या रूग्णांवर निरीक्षण, ब्रेसिंग आणि शस्त्रक्रिया अशा तीन प्रकारे उपचार करता येतात. जर एखाद्याला स्कोलियोसिसची सौम्य लक्षणे दिसत असतील तर त्यावर ब्रेसिंगद्वारे उपचार केले जाऊ शकतात, परंतु सलमाच्या मणक्यात खूप वळण आले होते त्यामुळे तिला शस्त्रक्रिया करण्याची गरज होती.
