11A सिटचं अद्भुत रहस्य, 2 वेगळे विमान अपघात पण सगळं जसंच्या तसं घडलं; अचंबित करणारी माहिती समोर!
अहमदाबाद विमान अपघातानंतर आता 1998 साली झालेल्या आणखी एका विमान अपघाताची चर्चा होत आहे.

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर संपूर्ण देश सुन्न आहे. या अपघातामध्ये फक्त एक प्रवासी वगळता सर्वजणांचा मृत्यू झाला आहे. पायलट, क्रू मेंबर्स यांचाही यात समावेश आहे. या अपघातात बचावलेल्या एकमेव प्रवाशाचं नाव रमेश विश्वकुमार असं आहे. दरम्यान, रमेश विश्वकुमार 11A या सिटवर बसले होते. अशाच एका जुन्या विमान अपघातात 11A या सिटवर बसलेला प्रवासी चमत्कारिकरित्या बचावला होता. खुद्द प्रवाशानेच याबाबत माहिती दिली आहे.
1998 साली झाला होता अपघात
थायलंडमधील गायक रुआंगसक लॉयचुस्क हे 1998 सालच्या विमान अपघातात बचावले होते. विशेष म्हणजे तेदेखील विमानातील 11A या सिटवरच बसलेले होते. त्या अपघातात एकूण 101 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. म्हणजेच 1998 साली झालेल्या विमान अपघाता बचावलेल्या लॉयचुस्क यांचा सिट नंबर आणि अहमदाबादमधील विमान अपघातात बचावलेल्या रमेश विश्वकुमार यांचा सिटनंबर एकच होता. आता या योगायोगाची सगळीकडे चर्चा होत आहे.
11A हाच होता सिट नंबर
लॉयचुस्क यांनीच याबाबत माहिती दिली आहे. भारतात झालेल्या विमान अपघातात बचावलेल्या एकमेव प्रवाशाचा सिट नंबर 11A हा आहे. माझ्यादेखील सिटचा नंबर तोच होता. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे, अशा भावना लॉयचुस्क यांनी व्यक्त केल्या आहेत.
101 प्रवाशांचा झाला होता मृत्यू
लॉयचुस्क 1998 साली फ्लाईट TG216 या विमानातून प्रवास करत होते. हे विमान बँकॉकहून थायलंडच्या सुरत थानी या शहरात उतरणार होते. मात्र मध्येच या विमानाचा भीषण अपघात झाला होता. विमान जमिनीवर उतरण्यावेळी या विमानावरील नियंत्रण सुटले होते. या विमामात एकूण 132 प्रवासी आणि 14 क्रू मेंबर प्रवास करत होते. या दुर्घटनेत तब्बल 101 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर 45 प्रवासी हे गंभीर जखमी झाले होते. लॉयचुक्स हे देखील या अपघातात बचावले होते.
हवेचीही वाटायची भीती
ही दुर्घटना झाल्यानंतर पुढच्या दहा वर्षांपर्यंत मला विमानाने प्रवास करायला भीती वाटायची. मला श्वास घ्यायला त्रास व्हायचा. मला हवा जरी लागली तरी मला हा त्रास जाणवायचा, अशी आठवण त्यांनी सांगितली. तसेच मी त्या काळात कोणाशीही बोलत नव्हतो. मी फक्त खिडकीत बसून असायचो. कोणी खिडकी बंद केली तरी मला भीती वाटायची.
अहमदाबाद विमान अपघाताची होतेय चौकशी
दरम्यान, अहमदाबाद विमान दुर्घटनेत अजय विश्वकुमार बचावले आहेत. त्यांचा भाऊ मात्र या दुर्घटनेत वाचू शकला नाही. इतर सर्व प्रवाशांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. या विमान अपघाताचे नेमके कारण काय? याचा शोध घेतला जात आहे.