इजिप्तमध्ये सेफीन चर्चमध्ये आग, 41 जणांचा मृत्यू  तर  55 लोक जखमी; आगीच्या ज्वाळांत चर्चच्या खिडक्यांमधून मदतीची हाक

ही आग इतक्या गतीने पसरली की अनेकांना वाचवण्यासाठी पळही काढता आला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ज्यावेळी चर्चला आग लागली त्यावेळी तिथे 60 जणं होते. चर्चमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आले होते. आग लागल्यानंतर काही जणांना पळून जाण्याची संधी मिळाली, तर 41 जण आगींच्या ज्वाळांमध्ये सापडले.

इजिप्तमध्ये सेफीन चर्चमध्ये आग, 41 जणांचा मृत्यू  तर  55 लोक जखमी; आगीच्या ज्वाळांत चर्चच्या खिडक्यांमधून मदतीची हाक
वनिता कांबळे

|

Aug 14, 2022 | 8:02 PM

काहिरा : इजिप्तची(Egypt) राजधानी असलेल्या काहिरात रविवारी सकाळी एका चर्चमध्ये आग(Fire) लागली. यात 41 जणांचा मृत्यू झाला आहे तर यात 14 जण जखमी झाले आहेत. इम्बाबा या दाट लोकसंख्या असलेल्या परिसरात अबू सेफीन चर्च(Sephine Church) आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. या आगीत दोन अधिकारी आणि नागरी सैन्यदलाचे 3 सदस्यही जखमी झाले आहेत. ही आग इतक्या गतीने पसरली की अनेकांना वाचवण्यासाठी पळही काढता आला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ज्यावेळी चर्चला आग लागली त्यावेळी तिथे 60 जणं होते. चर्चमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आले होते. आग लागल्यानंतर काही जणांना पळून जाण्याची संधी मिळाली, तर 41 जण आगींच्या ज्वाळांमध्ये सापडले. काही जण मदतीची साद चर्चच्या खिडक्यांमधून अखेरच्या क्षणांपर्यंत घातल होते.

बचावकार्य गतीने

राष्ट्रपती अब्देल फत्ताह यांनी कॉप्टिन क्रिश्चियन पोप तवाड्रोस सेकन्ड यांच्या फोनवरुन चर्चा केली आणि दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यास सांगितले. सोशल मीडियावर याबाबत राष्ट्रपतींनी एक पोस्टही लिहीली, त्यात त्यांनी लिहिले की, दुर्घटनेनंतर आता त्या चर्चमध्ये बतावकार्य करण्यात येते आहे. या घटनेने आपल्याला मोठए दु:ख झालेले आहे. कोणतीही अडचण असेल तर ती सोडवण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येईल.

दुर्घटनेतील जखमींना अॅम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये पोहचवले

ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या १५ पेक्षा जास्त गाड्या घटनासथळी दाखल झाल्या होत्या. जखमींना हॉस्पिटलमध्ये पोहचवण्यासाठी ३० हून अधिक अँम्ब्युलन्स घटनास्थळी तैनात करण्यात आल्या होत्या. ११ मार्च २०२१ मध्येही काहिरात लागलेल्या एका आगीत कपड्यांचा कारखाना जळून खाक झाला होता. या दपर्घटनेत २० जणांचा मृत्यू झाला होता. २०२० सालीही एक मोठी आग लागली होती. त्यात १४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. हे सर्व रुग्ण कोरोनाचे होते.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें