AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रम्प याच्या सुरक्षेत घोडचूक ! व्हाईट हाऊसजवळ गोळीबार, निशाण्यावर डायरेक्ट..

वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊसजवळ झालेल्या गोळीबाराने अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एका सशस्त्र व्यक्तीने सिक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सवर गोळीबार केला, ज्याला प्रत्युत्तर देण्यात आले. उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांचा ताफा घटनास्थळाजवळून गेला होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अलीकडे झालेल्या हल्ल्यांच्या प्रयत्नांशी या घटनेचा संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे, ज्यामुळे राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे.

ट्रम्प याच्या सुरक्षेत घोडचूक ! व्हाईट हाऊसजवळ गोळीबार, निशाण्यावर डायरेक्ट..
Donald Trump
| Updated on: May 05, 2026 | 8:16 AM
Share

Donald Trump Security Breached : जगातील बलाढ्य राष्ट्राचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपूर्ण सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. काही दिवसांपूर्वी ट्रम्प एका कार्यक्रमात असतानाच तिथे गोळीबार झाला होता, आता त्याच भयानक प्रकाराची पुनरावृत्ती झाली आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये, व्हाईट हाऊसजवळ अचानक गोळीबाराचा आवाज घुमला, ज्यामुळे परिसरात घबराट पसरली. मिळालेल्या माहितीनुसार, व्हाईट हाऊसजवळ एक सशस्त्र व्यक्तीने सिक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सवर गोळीबार केला. ज्याला प्रत्युत्तर देताना एजंट्सनीही गोळ्या झाडत त्याला जखमी केलं. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाल्या. सर्वात विशेष गोष्ट म्हणजे ही घटना घडण्याच्या अगीद कही वेळ आधीच अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या गाड्यांचा ताफा तिथून गेला होता.

काही दिवसांपूर्वीच, एका कार्यक्रमात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला (गेल्या दोन वर्षांतील हा तिसरा प्रयत्न आहे). तर आता पुन्हा ही घटना घडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत: व्हाईट हाऊसजवळ झालेला हा हल्ला एखाद्या प्रमुख नेत्याला लक्ष्य करून केला होता की ही केवळ एक संशयास्पद घटना होती? असा प्रश्नही या घटनेमुळे उपस्थित होत असून तपास यंत्रणा आता प्रत्येक पैलूची काळजीपूर्वक तपासणी करत आहेत.

नेमकं काय झालं ?

एएफपीच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसजवळ अमेरिकी सिक्रेट सर्व्हिसच्या (USSS) एजंट्सनी एका सशस्त्र व्यक्तीवर गोळीबार केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी वॉशिंग्टन शहराच्या मध्यवर्ती ही घटना भागात घडली. गौळीबाराच्या या धक्कादायक घटनेनंतर व्हाईट हाऊस काही काळासाठी बंद करण्यात आलं होतं.

उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांचा ताफा नॅशनल मॉलजवळून जात असताना हा गोळीबार झाला, असं अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसचे उपसंचालक मॅथ्यू क्विन यांनी सांगितलं. मात्र या हल्ल्याचे लक्ष्य उपराष्ट्रपती होते असं मला वाटत नाही. तसेच, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अलीकडेच झालेल्या हल्ल्यांच्या प्रयत्नांशी, या गोळीबाचा संबंध आहे की नाही, हेही इतक्यात सांगू शकत नाही, असं क्विन म्हणाले.

“मी याबाबत अंदाज लावणार नाही. हा हल्ला राष्ट्राध्यक्षांना लक्ष्य करणारा होता की नाही, हे मला माहीत नाही, पण आम्ही लवकरच याचा तपास करू” असं क्विन म्हणाले. (गोळीबाराची) ही घटना जेव्हा झाली तेव्हा सिक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सना एक “संशयास्पद व्यक्ती” दिसला, ज्याच्याकडे शस्त्र असल्याचा संशय होता. जेव्हा अधिकाऱ्यांनी त्या माणसाकडे जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो वेगाने पळू लागला. त्यानंतर त्याने आपले शस्त्र बाहेर काढून गोळीबार सुरू केला अशी माहिती समोर आली. त्याला प्रत्युत्तर देताना सिक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सनी गोळीबार केला आणि त्यात संशयित हल्लेखोर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात अल्याची माहिती समोर आली. एका कार्यक्रमासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वॉशिंग्टनमधील एका हॉटेलमध्ये गेले असताना, एका बंदूकधाऱ्याने तेथील सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर अवघ्या एका आठवड्यात ही घटना घडली आहे.

Follow Us
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय