इमरान खान यांच्यासाठी बहि‍णींनी केलं जीवाचं रान, कोण आहेत उज्मा, राणी, अलीमा आणि रुबीना?

अखेर पाकिस्तानच्या तुरुंगात इम्रान खान यांना भेटून आलेल्या उजमा यांनी इम्रानची तब्येत नीट असली तरी ते संतप्त असल्याचे म्हटले आहे. इम्रान यांच्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या या बहिणी कोण आहेत पाहूयात..

इमरान खान यांच्यासाठी बहि‍णींनी केलं जीवाचं रान, कोण आहेत उज्मा, राणी, अलीमा आणि रुबीना?
Imran Khan’s Sister
| Updated on: Dec 02, 2025 | 9:37 PM

इम्रान खान यांच्या संदर्भात त्यांच्या बहिणींच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या आंदोलनासमोर अखेर पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले आहेत. इम्रान खानची बहिणी उज्मा खान ही अदियाला जेलमध्ये तिच्या भावाला भेटण्याची परवानगी दिली गेली. मंगळवारी ती जेलमध्ये जाऊन इम्रान याला भेटून बाहेर आली. त्यानंतर उज्मा खानम हिने आपला भाऊ इम्रान खान याची तब्येत ठीक असल्याचे सांगितले,परंतू ते सध्या प्रचंड संतप्त आहेत. उज्मा यांच्या मते इम्रान खान यांनी त्यांना जेलमध्ये मानसिकदृष्ट्या छळले जात असल्याचे देखील सांगितले. त्यांनी यासाठी लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांनी जबाबदार ठरवले जात आहे.

इम्रान खान यांच्या भेटीसाठी तिन्ही बहिणींनी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे. अदियाला जेल आणि हायकोर्टच्या बाहेर सतत्याने निदर्शने होत होती. त्यांच्या बहिणींना दावा केला की सलग तीन आठवड्याहून अधिक काळापासून त्यांना भावाला भेटू दिले जात नव्हते. त्यानंतर जेल बाहेर इम्रान यांच्या मृत्यूची अफवा पसरू लागली. चला तर पाहूयात इम्रानच्या बहिणी कोण आहेत आणि काय करतात. जेलमध्ये इम्रानची भेट घेणारी उज्मा खानम काय करते? आणि तिच्या पतीचा पाकिस्तानी एअर फोर्सशी काय संबंध आहे.

डॉक्टर आहेत उज्मा खान, पतीचे PAK आर्मीशी कनेक्शन

पाकिस्तानच्या तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे संस्थापक इम्रान खान यांना चार बहिणी आहेत. इम्रान यांची सर्वात मोठी रुबीना आणि सर्वात छोटी बहिण नौरीन आहे. तुरुंगात भेट घेणारी उजमा खान नियाजी ही पेशाने डॉक्टर असून लाहोर येथे राहाते. उजमा सर्जन असून तिचे पती मजीद खान मौलवी आहेत. दोघे इम्रानचे हितचिंतक असून पक्षाच्या प्रत्येक इव्हेंटला हजर असतात.

मजीद खान पाकिस्तानच्या एअरफोर्समधून विंग कमांडर म्हणून निवृत्त झालेले आहेत. ते अमेरिकेच्या F-16 फायटर जेटला चालवणाऱ्या पाकिस्तानी पायलट्सच्या पहिल्या बॅचमध्ये होते. मजीद यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की पाकिस्तानी सरकार इम्रान सोबत जसे वागत आहे तसे शत्रूशीही वागत नाही.पाकिस्तानी कोर्टात डॉक्टर उजमा आणि मजीद खान यांच्यावर कोट्यवधी जमीन खरेदी घोटाळ्यात आरोपी आहेत.

मोठी बहिण रुबीना हिची युएनमध्ये सेवा –

युट्युबवर @justajoo9 चॅनल पेजवरील माहितीनुसार इम्रान यांची बहिण रुबीना खान यांचा जन्म सप्टेंबर १९५० मध्ये लाहोरमध्ये झाला. ती लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्सची विद्यार्थीनी होती. संयुक्त राष्ट्रात एक सिनियर पोस्टवर त्यांनी सेवा दिली आहे. त्यांनी कधीच विवाह केला नाही. त्यांचे जीवन अमेरिकेत नोकरी करताना व्यतित झाले. रुबीना खूप शांत आणि समजदार व्यक्ती आहेत. रुबीना राजकारणापासून दूर आहेत.

तिसरी बहिण अलीमा टेक्सटाईल एक्सपोर्टर –

इम्रान खान यांची तिसरी बहिण अलीमा खान आहे. पाकिस्‍तानच्या यु-ट्युब चॅनल 13 News अनुसार अलीमा यांचा जन्म 1960 मध्ये लाहोर येथे झाला. अलीमा यांचा सुरुवातीचे शिक्षण लाहोर येथे झाले. अलीमा खान यांनी फॅशन डिझाइनिंग आणि टेक्स्टाईलमध्ये शिक्षण घेतले. त्यांनी साल १९८९ लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्समध्ये एमबीए डीग्री घेतली. लाहोरच्या टेक्स्टाईल बाईंग स्टोर कॉटकॉम सोर्सिंग ( प्रायव्हेट ) लिमिटेडच्या फाऊंडर आहेत.आज त्यांचे नाव पाकिस्तानच्या काही प्रसिद्ध टेक्स्टाईल एक्सपोर्ट्समध्ये समाविष्ट आहे. त्यांची कंपनी अनेक देशात गारमेंट एक्सपोर्ट करतात.

अलीमा खान या महिला सशक्तीकरणासाठी आवाज उठवणाऱ्या आणि मोकळ्या विचारांच्या महिला म्हणून ओळखल्या जातात. त्या शौकत खान कॅन्सर रुग्णालयासाठी फंड जमा करण्याचे काम करतात. इम्रान यांच्या राजकीय यशामागे अलीमा यांचा मोठा रोल आहे. अलीमा यांची लग्न तिच्या माहेरी झाले. त्यांचे पती सुहैल अमीर खान बर्की पाकिस्तान एअरफोर्समध्ये होते.

सर्वात छोटी बहिण नौरीन खान –

इम्रान खान यांची सर्वात छोटी बहिण नौरीन असून त्यांना राणी खान म्हणून ओळखले जाते. राणी यांचा विवाह त्यांच्या काकांचा मुलगा हफीजुल्ला खान नियाजी यांच्याशी झाले. लग्नानंतर ती काही दिवस अमेरिकेत राहिली आणि नंतर जेद्दामध्ये सेटल झाली. हफीजुल्ला इंजिनियर आहेत. हफीज नियाजी इम्रानच्या वयाचे असून पीटीआयच्या संस्थापक सदस्यापैकी एक आहेत. परंतू इम्रान यांच्या त्यांचे मतभेद झाले. २००२ मध्ये विधानसभेच्या निवडणूकात मियांवलीमध्ये हफीज नियाजी यांनी इम्रानच्या विरोधी उमेदवाराशी लढत दिली आणि हरले. हफीज मुले आणि पत्नी सोबत न रहाता वेगळे राहातात.