Video : श्रीलंकेत परिस्थिती गंभीर; पंतप्रधानांच्या रिकाम्या खुर्चीचे संरक्षण करण्यासाठी सशस्त्र सैनिक

| Updated on: Jul 14, 2022 | 2:42 PM

श्रीलंकेमध्ये (Sri Lanka crisis) परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत आहे. आता पंतप्रधानांच्या रिकाम्या खुर्चीचे संरक्षण करण्यासाठी देखील सैनिकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Video : श्रीलंकेत परिस्थिती गंभीर; पंतप्रधानांच्या रिकाम्या खुर्चीचे संरक्षण करण्यासाठी सशस्त्र सैनिक
Follow us on

कोलंबो : श्रीलंकेमध्ये परिस्थिती गंभीर (Sri Lanka crisis) बनली आहे. श्रीलंका (Sri Lanka) सध्या एका मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. मात्र त्याचसोबत आता श्रीलंकेत राजकीय संकट देखील निर्माण झाले आहे. गेले अनेक दिवस हालाकीचे जीवन जगणाऱ्या  नागरिकांचा अखेर संयम सुटला आणि त्यांनी शनिवारी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला. आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घालताच श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी राष्ट्रपती भवनातून पळ काढला. त्यानंतर ते राजीनामा देण्यापूर्वीच श्रीलंका सोडून मालदीवच्या आश्रयाला गेले. गोटबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेतून पलायन केल्याने आता माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे हे श्रीलंकेचे काळजीवाहू राष्ट्रपती बनले आहेत. मात्र अद्यापही श्रीलंकेच्या पंतप्रधानांची खुर्ची रिकामी आहे. या खुर्चीच्या संरक्षणासाठी आता श्रीलंकेतील सैन्यदल तैनात करण्यात आले आहे. या खुर्चीभोवती सशस्त्र सैनिकांचा पहारा तैनात करण्यात आला आहे.

विक्रमसिंघे काळजीवाहू पंतप्रधान

आंदोलक प्रचंड आक्रमक झाले आहेत, गेल्या आठवड्यात शनिवारी आंदोलकांनी कोलंबोच्या रस्तावर उतरत राष्ट्रपती भवनाला घेराव घातला. आंदोलक राष्ट्रपती भवनात दाखल होताच गोटबाया राजपक्षे यांनी पलायन केले. त्यानंतर त्यांनी आपली पत्नी आणि दोन सुरक्षा रक्षकांसह देश सोडला. ते मालदीवमध्ये गेले. शनिवारी सायंकाळच्या सुमारास आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी देखील आग लावली होती. त्यानंतर लगेचच पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तर राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे हे 13 जूलैला राजीनामा देणार होते. मात्र राजीनामा देण्यापूर्वीच त्यांनी देशातून पलायन केले. त्यामुळे आता  रानिल विक्रमसिंघे हे श्रीलंकेचे काळजीवाहू राष्ट्रपती बनले आहेत. श्रीलंकेचे पंतप्रधानपद अद्यापही रिक्त असून, त्या खुर्चीच्या संरक्षणासाठी कमांडो तैनात करण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

 

राष्ट्रपती भवन आंदोलकांच्या ताब्यात

गेल्या शनिवारी आंदोलकांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला होता. त्यानंतर राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे हे राष्ट्रपती भवनातून बाहेर पडले. तेव्हापासून  राष्ट्रपती भवन हे आंदोलकांच्या ताब्यात आहे. अनेक आंदोलकांनी राष्ट्रपती भवनातच मुक्काम ठोकाला आहे. त्याचे अनेक फोटो देखील व्हायरल झाले आहेत. दुसरीकडे श्रीलंकेत कर्फ्यू लावण्यात आला असून, जागोजागी पोलीस आणि सैन्यदल तैनात करण्यात आले आहे. मात्र तरी देखील आंदोेलकांचे रस्त्यावर उतरत प्रदर्शन सुरूच आहे.