AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील या देशासाठी आता झुरळं युद्ध लढणार, अनोख्या प्लानने सगळेच थक्क

रशिया-युक्रेन युद्ध सुरु होऊन तीन वर्षांपेक्षा जास्त काळ झालाय. आपल्या सुरक्षेसाठी अमेरिका किंवा NATO च्या भरवाशावर राहता येणार नाही, हे युरोपमधील देशांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळेच दुसऱ्या वर्ल्ड वॉरनंतर युरोपमध्ये पुन्हा एकदा शस्त्रास्त्रांच्या विकासाची स्पर्धा सुरु झाली आहे.

जगातील या देशासाठी आता झुरळं युद्ध लढणार, अनोख्या प्लानने सगळेच थक्क
spy cockroaches
| Updated on: Jul 24, 2025 | 9:28 AM
Share

पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात भारताचं ऑपरेशन सिंदूर असो किंवा रशिया-युक्रेन युद्ध. या दोन्ही लढायांमध्ये आत्मघातकी ड्रोन्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. ड्रोन्स या युद्धात निर्णायक ठरले. भविष्यातील युद्धांमध्ये ड्रोन तंत्रज्ञान किती महत्त्वाच ठरणार, ते या दोन लढायांमधून लक्षात आलं. वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या या युगात ड्रोन एक घातक, अचूक वार करणारं शस्त्र बनलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर डिफेन्स सेक्टरमध्ये काम करणारी एक कंपनी त्यापुढचा विचार करत आहे. ते कॉकरोच म्हणजे झुरळ आणि मानवरहीत AI बेस्ड शस्त्रांचे इवेंट आयोजित करत आहे. त्याबद्दल विस्ताराने जाणून घ्या.

रशिया-युक्रेन युद्ध सुरु होऊन तीन वर्षांपेक्षा जास्त काळ झालाय. आपल्या सुरक्षेसाठी अमेरिका किंवा NATO च्या भरवाशावर राहता येणार नाही, हे युरोपमधील देशांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळेच दुसऱ्या वर्ल्ड वॉरनंतर युरोपमध्ये पुन्हा एकदा शस्त्रास्त्रांच्या विकासाची स्पर्धा सुरु झाली आहे. ज्यात सर्वात आघाडीवर जर्मनी असून ते शस्त्रास्त्र निर्मितीवर तितका पैसा खर्च करत आहे.

जर्मनीचा मोठा निर्णय

युरोपच्या आत अनेक छोटे-छोट देश आहेत. तिथे शस्त्रांच्या विकासासाठी वेगवेगळे नियम आहेत. दुसरीकडे Lockheed Martin, RTX, बोईंग या अमेरिकन कंपन्यांची आधीपासून शस्त्रास्त्रांच्या बाजारपेठेवर पकड आहे. सॅटलाइट, फायटर जेट्स आणि स्मार्ट शस्त्रांच्या निर्मितीत या कंपन्या अव्वल आहेत. त्यात आता जर्मनीने एक निर्णय घेतलाय. 2029 पर्यंत ते आपल्या संरक्षण खर्चात तीन पट वाढ करणार आहेत. 162 अब्ज युरो (जवळपास 175 अब्ज डॉलर) तरतूद करणार आहे.

अमेरिकेवर अवलंबून राहणं धोक्याचं

दुसऱ्या वर्ल्ड वॉरनंतर जर्मनीला अमेरिकेने सुरक्षेची गॅरेंटी दिली. जर्मनीला मर्यादीत प्रमाणात सैन्य क्षमता वाढवण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे जर्मनीने आपल्या संरक्षण खर्चात कपात करुन दुसऱ्या ठिकाणी खर्च करायला सुरुवात केली. रशिया-युक्रेन युद्धानंतर जर्मनीच्या लक्षात आलय की, आपल्या सुरक्षेसाठी अमेरिकेवर अवलंबून राहणं धोक्याचं ठरु शकतं.

सायबोर्ग कॉकरोच काय आहे?

जर्मन सरकारने देशाच्या सैन्य स्टार्टअपमध्ये फंडिंग सुरु केलं आहे. त्यामुळेच जर्मनीने हेरगिरी करणारी झुरळं, मानवरहीत पाणबुडी आणि AI आधारित टँकच्या निर्मितीचा कार्यक्रम सुरु केला आहे. “आधी संरक्षण क्षेत्रात काम करण्याबद्दल लोकांच्या मनात किंतु-परंतु होते. पण रशिया-युक्रेन युद्धानंतर लोकांमध्ये स्पष्टता आली आहे. लोक मोठ्या प्रमाणात संरक्षण क्षेत्रातील टेक्नोलॉजीबद्दल आयडीया घेऊन येत आहेत” असं सायबर इनोवेशन हबचे हेड स्वेन वीजेनेगर म्हणाले.

Swarm Biotactics नावाची कंपनी सायबोर्ग कॉकरोच बनवत आहे. शत्रूच्या भागात जाऊन सहजतेने माहिती गोळा करण्यासाठी अशा झुरळांची निर्मिती करत आहे. या झुरळाच्या हालचाली इलेक्ट्रिक सिग्नलने कंट्रोल करता येतात.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.