AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sri Lanka : महिंदा राजपक्षेंच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा, श्रीलंकेवर आर्थिक संकट, राजकीय घडामोडींना वेग

श्रीलंका आर्थिक संकटाला तोंड देत असून मध्यरात्री पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे. राजकीय स्थैर्य राखण्यासाठी आणि आर्थिक अडचणींना तोंड देण्यासाठी श्रीलंकेत सर्व पक्षीय सरकार स्थापन होण्याची मागणी होते आहे. श्रीलंकेतील मध्य प्रांतामध्ये रविवारी कर्फ्यू लावण्यात आलाय.

Sri Lanka : महिंदा राजपक्षेंच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा, श्रीलंकेवर आर्थिक संकट, राजकीय घडामोडींना वेग
श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचा राजीनामाImage Credit source: tv9
| Updated on: Apr 04, 2022 | 8:28 AM
Share

दिल्ली : श्रीलंका (sri lanka) आर्थिक संकटाला तोंड देत असून मध्यरात्री पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Prime Minister Mahinda Rajapaksa) यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा (resigns) दिला आहे. सभागृह नेते आणि शिक्षण मंत्री दिनेश गुणवर्धने यांनी सांगितलं की, मंत्रिमंडळाने पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. दरम्यान, राजीनामा का सुपूर्द केला. याचे कारण मात्र त्यांनी दिले नाही. राजकीय स्थैर्य राखण्यासाठी आणि आर्थिक अडचणींना तोंड देण्यासाठी श्रीलंकेत सर्व पक्षीय सरकार स्थापन होण्याची मागणी होते आहे. श्रीलंकेच्या रविवारी मध्य प्रांतामध्ये कर्फ्यू लावण्यात आलाय. सरकारचा निषेध करणाऱ्या पेरादेनिया विद्यापीठातील विद्यार्थी आणि शिक्षकांवर अश्रुधुराचा मारा यावेळी करण्यात आला. विद्यार्थी सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्याची मागणी यावेळी करत होते. श्रीलंकेत पेपरची किंमत वाढल्याने परीक्षा होत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. दरम्यान, पंतप्रधान महिंदा राजपक्षे वगळता सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिला आहे. यामुळे अवघ्या जगाचं लक्ष श्रीलंकेवर लागून आहे.

श्रीलंकेत संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा

राजपक्षेंच्या मुलाचाही राजीनामा

श्रीलंकेत पंतप्रधान महिंदा राजपक्षे वगळता सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिला आहे. महिंदा राजपक्षे यांचा मुलगा नमल राजपक्षे यांनीही आपल्या सर्व खात्यांचा राजीनामा दिला आहे. नमल राजपक्षे यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘मी राष्ट्रपतींना सर्व विभागांच्या माझ्या राजीनाम्याबद्दल तात्काळ कळवले आहे, आशा आहे की यामुळे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना देशात स्थैर्य प्रस्थापित करण्यात मदत होईल. मी आणि माझा पक्ष आमच्या मतदारांसाठी वचनबद्ध आहोत.’

नमल राजपक्षेंचं ट्विट

सोशल मीडिया पूर्ववत

श्रीलंकेत सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली होती. फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, इंस्टाग्राम, टॉकटॉक, स्नॅपचॅट, व्हॉट्सअॅप, व्हायबर, टेलिग्राम आणि फेसबुक मेसेंजरच्या सेवा पंधरा तासांनंतर पूर्ववत करण्यात आल्या.

राष्ट्रपतींच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने

राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या विरोधात रविवारी लोकांनी निदर्शने केली. आंदोलक राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा विशेष राजपत्र अधिसूचना जारी करून श्रीलंकेत 1 एप्रिलपासून आणीबाणी जाहीर केली आहे. आता राष्ट्रपती राजपक्षे यांच्या आणीबाणी लादण्याच्या निर्णयाविरोधात कोलंबोमध्ये आंदोलन केलं जातंय.

इतर बातम्या

ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानातून थेट BMC समोर ठिय्या, बोंबाबोंब आंदोलनामुळं पोलिसांची तारांबळ

Delhi CCTV | ‘मॉर्निंग वॉक’ला निघालेल्या दोघांना अडवलं, भररस्त्यात लुटीचा थरार

Emotional video : एकदा तरी पप्पा तुम्ही या हो सणाला…; कवितेतून पोलिसानं मांडली व्यथा, ऐका

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.