AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीलंकेतील पंतप्रधानांच्या कुटुंबियांचे देशातून पलायन; आणीबाणीत 56 जणांना सोडवण्यासाठी 600 वकील न्यायालयात 

पंतप्रधान महिंद्रा राजपक्षेंची सून लमिनी राजपक्षेनं यांनी देश सोडला आहे. आणि तिच्यासोबत राजपक्षे कुटुंबातले अन्य सदस्य 9 जणांनीही श्रीलंकेबाहेर पडल्याचे वृत्त देण्यात आले आहे.

श्रीलंकेतील पंतप्रधानांच्या कुटुंबियांचे देशातून पलायन; आणीबाणीत 56 जणांना सोडवण्यासाठी 600 वकील न्यायालयात 
श्रीलंकेत आणीबाणीही लागूImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 06, 2022 | 12:18 AM
Share

नवी दिल्लीः श्रीलंकेची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे, आणि दुसरीकडे पंतप्रधान राजपक्षेंची सून आणि इतर परिवारातल्या सदस्यांनी देशातून पलायन केल्याचं वृत्त आहे. त्यामुळे श्रीलंकेतील (Sri Lanka) परिस्थिती नेमकी काय आहे त्याचा टीव्ही नाईन मराठीचा हा एक ग्राऊंड रिपोर्ट. परं घर का भेदी, लंका ढाये ही म्हण सध्याच्या श्रीलंकेतल्या अवस्थेला लागू पडते आहे. कारण, एकीकडे देश बेहाल होत आहे, अनेक लोकं रस्त्यांवर उतरले आहेत आणि दुसरीकडे श्रीलंकेचे सर्वेसर्वा राजपक्षें (Rajapakshe) परिवाराच्या सुनांनी मुला-बाळांसह देश सोडल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

डेली मिररने दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान महिंद्रा राजपक्षेंची सून लमिनी राजपक्षेनं यांनी देश सोडला आहे. आणि तिच्यासोबत राजपक्षे कुटुंबातले अन्य सदस्य 9 जणांनीही श्रीलंकेबाहेर पडल्याचे वृत्त देण्यात आले आहे. श्रीलंकेतील राजपेक्षेंच्या घराण्याची ही बातमी पहिल्यांदा गुप्त ठेवण्यात आली होती. मात्र ही बातमी ज्या प्रकारे बाहेर आली तस तसे श्रीलंकेच्या लोकांमधील संतपाला पारा उराला नाही.

राजपक्षे परिवाराने देश सोडला

राजपक्षे परिवाराने देश सोडला असे वृत्त देण्यात आले असले तरी त्यांच्या घरातील सदस्य नेमके कोणत्या देशात गेले आहेत याची माहिती मात्र अजूनपर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही. राजपक्षेंच्या घराण्याची परिस्थिती ही एकीकडे असतानाच दुसरीकडे मात्र राजपक्षे परिवाराने श्रीलंकन लोक घराबाहेर पडू नयेत, म्हणून आणीबाणी लागू केली आहे.

सरकारच्या आणीबाणीविरोधात संताप

श्रीलंकेतील सरकारच्या आणीबाणीविरोधात संताप रोज वाढत असून लोकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त करणाऱ्या 56 लोकांना श्रीलंकेतील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र त्यांच्या जामिनासाठी तब्बल 600 वकील कोर्टात पोहोचले आहेत. त्यामुळे न्यायालयालाही 56 जणांपैकी 50 जणांना सोडावं लागलं आहे.

जनता जुमानणार नाही

श्रीलंकन जनता आणीबाणी आणि सरकारची धोरणांना जनता जुमानणार नाही, असा संदेश श्रीलंकेतील वकिलांनी दिला आहे. त्याच बरोबर या श्रीलंकेन जनतेने संसदेबाहेर श्रीलंकन जनता सरकारची धोरणं आणि कर्फ्यूला जुमानणार नाही, हा संदेश वकिलांनी दिलाय. श्रीलंकेच्या संसदेबाहेर निदर्शनं केली आहेत. आणीबाणी जाहीर केल्यानंतर पेट्रोल पंपावर येथील प्रशासनाने सैन्य तैनात करण्यात आले आहे, आणि महाागाईमुळे हॉटेल-चहाची दुकानंही बंद पडली आहेत. नेमकं श्रीलंकेत

सनथ जयसूर्याही रस्त्यावर

माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांनी सुद्धा राजपक्षे सरकाराविरोधात रस्त्यावर उतरला आहे. श्रीलंकन असणारी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसनंही श्रीलंकने जनतेला शांततेचं आवाहन केलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अर्थकारण, कोरोना आणि बेसुमार कर्जामुळे श्रीलंकेचं अर्थकारण बिघडले आहे. अत्यावश्यक गोष्टी खरेदीसाठीही श्रीलंका सरकारकडे पैसा उरलेला नसून राजधानीसारख्या शहरांमध्ये 12-12 तास वीजकपात सुरु आहे. परिणामी कंपन्या आणि उद्योग बंद होऊ लागले आहेत.

संबंधित बातम्या

मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन पुणे मनसेत अंतर्गत वाद! वसंत मोरे नाराज, मनसे मात्र भूमिकेवर ठाम

Sharad Pawar : शरद पवारांच्या घरी स्नेहभोजनास नितीन गडकरी-संजय राऊत एकत्र, ईडीच्या कारवाईनंतर चर्चा काय?

मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यापासून राऊतापर्यंत! शिवसेनेसह NCPचे कोण कोणते नेते EDच्या जाळ्यात? वाचा संपूर्ण यादी!

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.