मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन पुणे मनसेत अंतर्गत वाद! वसंत मोरे नाराज, मनसे मात्र भूमिकेवर ठाम

वसंत मोरे यांची भूमिका वैयक्तिक असल्याचं मनसेकडून सांगण्यात आलंय. राज ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका सर्वांना मान्य आहे. वसंत मोरे यांचा काहीतरी गोंधळ झाला असल्याचं मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संबुस यांनी म्हटलंय.

मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन पुणे मनसेत अंतर्गत वाद! वसंत मोरे नाराज, मनसे मात्र भूमिकेवर ठाम
राज ठाकरे, अध्यक्ष, मनसेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 11:51 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे मांडला. इतकंच नाही तर मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुनही राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे पुण्यातील मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची चांगलीच गोची झाल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर मशिदीतील भोंगे (Mosque Loudspeaker) काढण्यावरुन आता पुणे शहर मनसेत अंतर्गत वाद पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्याला प्रत्युत्तर म्हणून हनुमान चालिसा लावण्याच्या आदेशाबाबत मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी नाराजी व्यक्त केलीय. तर मोरे यांची ती वैयक्तिक भूमिका असल्याचं मनसेकडून सांगण्यात आलंय. राज ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका सर्वांना मान्य आहे. वसंत मोरे यांचा काहीतरी गोंधळ झाला असल्याचं मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संबुस यांनी म्हटलंय.

मशिदीवरच्या भोंग्याविरोधात राज ठाकरेंनी शिवतीर्थावरुन एल्गार तर केला. मात्र त्याच एल्गाराचे साईड इफेक्ट पक्षात उमटू लागले आहेत. पुण्यातल्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊ केले आहेत. विकासाच्या ब्लु प्रिंटवरुन थेट भोंगे हटवण्यापर्यंत भूमिका का बदलली, असे प्रश्न मनसेचे काही पदाधिकारी विचारत आहेत. वसंत मोरेंनी तर थेट त्यांच्या प्रभागात लाऊड स्पीकर न लावण्याचं सांगून अप्रत्यक्षपणे पक्षाचा आदेश झुगारुन लावलाय.

वसंत मोरेंची नेमकी अडचण काय?

मनसेच्या भूमिकेमुळे वसंत मोरेंची अडचण नेमकी काय आहे, ती सुद्दा समजून घेणे गरजेचे आहे. कात्रजमधून वसंत मोरे गेल्या 10 वर्षांपासून नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. वसंत मोरे जातीनं मराठा आहेत. मात्र त्यांच्या प्रभागातला मुस्लिम मतदार मनसेऐवजी वसंत मोरेंच्या कामामुळे त्यांच्या पाठिशी राहिला आहे. कात्रज प्रभागात मुस्लिमांची 3 हजार 800 मतं आहेत आणि हीच मतं गेमचेंजर ठरतात.

साईनाथ बाबरांचीही गोची

कोंढव्यातले साईनाथ बाबर पुण्यातले मनसेचे दुसरे नगरसेवक आहेत. साईनाथ बाबरही जातीनं मराठा आहेत आणि कोंढव्यात 70 टक्के मतदान मुस्लिमांचं आहे. या घडीला पुण्यातल्या 8 मतदारसंघापैकी मनसेची सर्वाधिक ताकद हडपसर, कोथरुड आणि त्यानंतर कसबा मतदारसंघात आहे. सध्या पुण्यात मनसेचे जे दोन नगरसेवक आहेत, ते दोघं निवडून येण्यात मुस्लिम मतांचा वाटा मोठा राहिला आहे. पक्षाच्या पडत्या काळातही जे राज ठाकरेंसोबत राहिले, त्यात बाळा नादगांवकर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि वसंत मोरेंसारख्या नेत्यांचा समावेश आहे.

भूमिकांवरुन मागच्या 10 दिवसातील घटनाक्रमही मोठा रंजक

>> 25 मार्चच्या दरम्यान शिवसेनेला कट्टर हिंदुत्ववादी मानणारी एमआयएम युतीचा प्रस्ताव पाठवते.

>> 31 मार्चला भाजपचे मंगलप्रभात लोढा मशिदींवरचे भोंगे उतरवण्याच्या मागणीसाठी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडेंना पत्र लिहीतात

>> 2 एप्रिलला राज ठाकरे जाहीर मंचावरुन सरकारला मशिदीवरचे भोंगे उतरवण्याचा इशारा देतात

>> 3 एप्रिलला मुंबईत मनसे कार्यकर्ते मशिदीवरच्या भोंग्यांविरोधात लाऊडस्पीकरवरुन हनुमान चालिसा लावतात

>> 3 एप्रिललाच नेहमी कट्टर हिंदुत्ववाद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेणारे एमआयएमचे ओवैसी मनसेच्या भोंग्याविरोधातल्या आंदोलनावर एमआयएमला मौन राहण्याचं फर्मान काढतात

>> 4 एप्रिलला भाजपचे मोहित कंबोज मंदिरांना मोफत लाऊड स्पीकर देण्याच्या स्कीमची घोषणा करतात

>> 5 तारखेला मनसे कार्यकर्ते पुन्हा ठिकठिकाणी मशिदीवरच्या भोंग्यांविरोधात हनुमान चालिसा लावतात

>> 5 एप्रिललाच मनसेचे वसंत मोरे आपल्या प्रभागात मशिदीवरचे भोंग्याविरोधात आंदोलन न करण्याच सांगत मनसेला घरचा आहेर देतात.

कोंडी फोडण्यासाठी काय भूमिका घेणार?

निवडणुका नसतानाही कोरोनाच्या काळात मनसेच्या वसंत मोरेंनी अनेकांना उपचार दिले. स्वतः हॉस्पिटल उभारुन लोकांना अॅडमिट करुन घेतलं. रुग्णवाहिका वेळेत पोहोचली नाही म्हणून महापालिका अधिकाऱ्यांच्या गाड्याही फोडल्या. टोलनाक्याच्या अडचणी, मालवाहतूकदारांच्या समस्या, छोटे-मोठे वाद प्रत्येक ठिकाणी वसंत मोरे हिरीरीनं पुढे राहिले आहेत. पक्ष अडचणीत असतानाही वसंत मोरेंनी पक्षाची साथ सोडली नाही. त्यामुळे आता एका भूमिकेनं जेव्हा नेता अडचणीत आलाय, तेव्हा पक्ष काय करतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

इतर बातम्या : 

मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यापासून राऊतापर्यंत! शिवसेनेसह NCPचे कोण कोणते नेते EDच्या जाळ्यात? वाचा संपूर्ण यादी!

Breaking : ‘राज्यात काँग्रेसमध्ये कुठलाच समन्वय नाही’, काँग्रेस आमदारांची दिल्ली दरबारी खंत! थेट सोनियांकडे तक्रार

Non Stop LIVE Update
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.