AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : ‘हिंदूहृदयसम्राट राजसाहेब ठाकरे…’ फक्त बॅनरबाजीच नाही तर घाटकोपरमध्ये मनसे कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी!

मनसे कार्यकर्त्यांनी मोठी बॅनरबाजी केली होती. महत्वाची बाब म्हणजे त्या बॅनरवर राज ठाकरे यांचा उल्लेख हिंदूहृदयसम्राट असा उल्लेख करण्यात आला. मनसे कार्यकर्ते फक्त बॅनरबाजीवरच थांबले नाहीत. संध्याकाळी राज ठाकरे जेव्हा मनसे कार्यालयाच्या उद्घाटनासाठी घाटकोपरमध्ये पोहोचले तेव्हा मनसे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीत 'हिंदूहृदयसम्राट राजसाहेब ठाकरे यांचा...' ही घोषणा घुमत होती!

Video : 'हिंदूहृदयसम्राट राजसाहेब ठाकरे...' फक्त बॅनरबाजीच नाही तर घाटकोपरमध्ये मनसे कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी!
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
| Edited By: sagar joshi | Updated on: Feb 14, 2022 | 9:00 PM
Share

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बदलत्या काळानुसार आपल्या पक्षात महत्वाचे बदल केले. त्या बदलानुसार राज यांनी पक्षाचा झेंडाही बदलला आणि त्यासोबतच आता मनसे मराठीसह हिंदुत्वाचा (Hindutva) मुद्दा घेऊन मैदानात उतरेल असं स्पष्ट केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज घाटकोपरमधील मनसेच्या कार्यालयाचं (MNS Office) उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मोठी बॅनरबाजी केली होती. महत्वाची बाब म्हणजे त्या बॅनरवर राज ठाकरे यांचा उल्लेख हिंदूहृदयसम्राट असा उल्लेख करण्यात आला. मनसे कार्यकर्ते फक्त बॅनरबाजीवरच थांबले नाहीत. संध्याकाळी राज ठाकरे जेव्हा मनसे कार्यालयाच्या उद्घाटनासाठी घाटकोपरमध्ये पोहोचले तेव्हा मनसे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीत ‘हिंदूहृदयसम्राट राजसाहेब ठाकरे यांचा…’ ही घोषणा घुमत होती!

गेल्या अनेक दशकांपासून देशात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढेच हिंदूहृदयसम्राट अशी उपाधी लावली जात होती. भाजपच्याही कुठल्या नेत्याच्या नावापुढे आजवर हिंदूहृदयसम्राट लावण्यात आलं नाही. मात्र, मनसेनं हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यानंतर आता त्यांच्या नावापुढे हिंदूहृदयसम्राट लावण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगत आहे. महत्वाची बाब म्हणजे मागे एकदा अशाच प्रकारचे बॅनर मनसे कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले होते. त्यावेळी मला हिंदूहृदयसम्राट म्हणून नका असं राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं होतं. मात्र, यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी राज यांना केवळ बॅनरवरच हिंदूहृदयसम्राट असं संबोधलं नाही तर राज ठाकरे यांच्यासमोरच हिंदुहृदयसम्राट राजसाहेब ठाकरे… अशी जोरदार घोषणाबाजीही केलीय.

राज ठाकरेंचं हिंदुत्व शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरणार?

राज्यात शिवसेनेनं भाजपशी फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा केलाय. मागील दोन वर्षांपासून राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. अशावेळी शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेल्याचा आणि बाळासाहेबांची शिवसेना राहिली नसल्याचा आरोप भाजप नेत्यांसह विरोधकांकडून केला जातो. अशातच आता मुंबईसह राज्यातील अनेक महापालिका निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्याचबरोबर अधेमधे भाजप आणि मनसे युतीची चर्चाही सुरु असते. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना हिंदूहृदयसम्राट संबोधून मनसे राजकारणात जोरदार कमबॅक करण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील कंबर कसुन मैदानात उतरले आहेत. मुंबई, पुण, नाशिक आणि औंरगाबाद शहराचा सातत्याने दौरा करुन त्यांनी आपले मनसुबेही सातत्याने स्पष्ट केले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या नावापुढे मनसे कार्यकर्त्यांनी लावलेलं हिंदूहृदयसम्राट ही उपाधी शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इतर बातम्या :

Video : ‘काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपचं भूत येऊ नये म्हणून वेशीवर शिवसेनेचा बोर्ड लावा’, गुलाबराव पाटलांचा शिवसैनिकांना मजेशीर सल्ला

‘साडे तीन लोकांना अटक करा किंवा साडे तिनशे, पण आधी आरोपांची उत्तरं द्या’, किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरे, राऊतांना खोचक टोला

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...