Boeing story : सुनीता विलियम्सना परत आणू न शकलेल्या बोईंग कंपनीने सर्वाधिक गुंतवणूक भारतात का केलीय?

Boeing story : एयरोस्पेस क्षेत्रातील बोईंग जगातील एक मोठी कंपनी आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणू न शकल्यामुळे बोईंगच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. बोईंग कंपनीने भविष्याच्या दृष्टीने भारतावर लक्ष केंद्रीत केलय. भारतात मोठी गुंतवणूक केली आहे. बोईंग कंपनीची सुरुवात, त्यांचा जो इतिहास आहे, त्याबद्दल जाणून घ्या.

Boeing story : सुनीता विलियम्सना परत आणू न शकलेल्या बोईंग कंपनीने सर्वाधिक गुंतवणूक भारतात का केलीय?
Boeing-sunita williams
Follow us
| Updated on: Sep 09, 2024 | 12:06 PM

उद्योग, व्यवसाय क्षेत्रात काही कंपन्या आपली अशी ओळख बनवतात की, त्यांच्या नावातच मोठेपणा दडलेला असतो. या कंपन्या आपल्या कामाने अशी छाप उमटवतात की, त्या विस्मृतीत जाण शक्यच नसतं. उदहारण द्यायच झाल्यास भारतातील टाटा उद्योग समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्र अँड महिंद्रा, लार्सन एंड टुब्रो, मारुती सुझुकी. आज भारतीय जनमानसावर या कंपन्यांनी आपली एक वेगळी छाप उमटवली आहे. या कंपन्यांची जी उत्पादन म्हणजे प्रोडक्ट आहेत, त्याची एक विश्वासहर्ता आहे. या कंपन्यांनी आपल्या मेहनतीने ही ओळख निर्माण केलीय, विश्वास संपादन केला आहे. बोईंग ही सुद्धा अशीच एक कंपनी आहे. एयरोस्पेस सेक्टरमधील बोईंग ही जगातील एक मोठी अमेरिकन कंपनी आहे. बोईंग हे नाव कधीच ऐकलं नाही, अशी फार कमी लोक सापडतील. आज सुनीता विलियम्स यांच्यामुळे भारतात बोईंग कंपनी चर्चेचा विषय ठरलीय. आज बोईंगच्या विश्वासहर्तेबद्दल एक मोठ प्रश्नचिन्ह निर्माण झालय. कारण बोईंगच्या स्टारलायनर स्पेसक्राफ्ट अवकाश यानाने सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर सोडलं. पण हे स्पेसक्राफ्ट त्यांच्याशिवाय पृथ्वीवर परतलं. हा बोईंग कंपनीच्या प्रतिष्ठेसाठी मोठा झटका आहे. भले, बोईंगच्या स्टारलायनरने पृथ्वीवर सुरक्षित लँडिंग केलं असेल, पण सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना स्पेसएक्सच्या मिशनकडे ट्रान्सफर करणं म्हणजे एकप्रकारे बोईंगच्या क्षमतेवर अविश्वास दाखवण्यासारखं आहे.

बोईंग ही साधीसुधी कंपनी नाहीय, एयरोस्पेस इंजिनिअरींगमधील मार्वल आहे. बोईंगने आतापर्यंत विविध प्रकारची थक्क करणारी, सर्वोत्तम विमानं बनवली आहेत. म्हणूनच बोईंगला विमान निर्मिती क्षेत्रात इंजिनिअरींग मार्वल म्हटलं जातं. आज अवकाश मोहीमेतील अपयशामुळे बोईंगच्या या प्रतिष्ठेला तडा गेलाय. आज जगभरात 150 देशात बोईंगची 10 हजार कमर्शियल विमानं कार्यरत आहेत. हजारो कर्मचारी या कंपनीत काम करतात, त्यावरुन बोईंगचा आकार, अवाका लक्षात येतो. बोईंगची सर्वाधिक 39 टक्के कमाई डिफेन्स, स्पेस आणि सिक्योरिटीमधून होते. कमर्शियल विमानांमधून बोईंग कंपनी 32 टक्के कमाई करते. आज आपण बोईंगचा हा जो प्रवास आहे, त्या बद्दल जाणून घेणार आहोत. हाच बोईंग कंपनीसाठी ठरला टर्निंग पॉइंट

बोईंगची स्थापना कधी? कंपनीसाठी कुठला टर्निंग पॉइंट ठरला?

बोईंग कंपनीची स्थापना 107 वर्षांपूर्वी झाली. 1903 साली राइट ब्रदर्सनी बनवलेल्या विमानाने पहिलं उड्डाण केलं. त्यानंतर उद्योजक विलियम ई बोईंग यांच्या मनात विमान निर्मिती कंपनी सुरु करण्याचा विचार आला. 1916 साली त्यांनी एयरो प्रोडक्ट्स नावाची कंपनी बनवली. एक वर्षानंतर कंपनीने नाव बदलून बोईंग एयरप्लेन हे नाव ठेवलं. एक वर्षानंतर 1917 साली पहिल्या विमानाच डिजाइन केलं. हा तो काळ होता, जेव्हा पहिल्या विश्वयुद्धाची सुरुवात झाली होती. युद्धासाठी विमानांची आवश्यकता होती. त्यावेळी बोईंगला 50 फायरट विमान बनवण्याची ऑर्डर मिळाली. हाच बोईंग कंपनीसाठी टर्निंग पॉइंट ठरला.

बोईंगने आतापर्यंत किती कंपन्या टेकओवर केल्या?

या ऑर्डरमधून जो अनुभव मिळाला, त्यातून कंपनीने विस्तार करण्याची योजना बनवली. पहिल्या विश्व युद्धानंतर बोईंगने कमर्शियल विमानांची निर्मिती सुरु केली. वेळेबरोबर बोईंगने आपला विस्तार कायम ठेवला. बोईंगने या स्पर्धेच्या युगात आतापर्यंत 32 कंपन्या टेकओवर केल्या आहेत. म्हणजे अधिग्रहण केलं आहे.

बोईंगचा 7-7 चा फॉर्म्युला काय?

बोईंग विमानांना नंबर देण्याची स्टोरी सुद्धा इंटरेस्टिंग आहे. सुरुवातीला कंपनी क्रमाच्या हिशोबाने नंबर द्यायची. 1945 नंतर पहिल्या कमर्शियल जेटसाठी नावाचा विचार झाला, त्यावेळी मॉडल 700 नाव देण्यात आलं. मार्केटिंग टीमला हे नाव आवडलं, तेव्हापासून बोईंग विमानांना 7 नंबरपासून नाव देण्याची प्रथा सुरु झाली. 7 पासून सुरुवात 7 च शेवटचा नंबर 7-7 चा फॉर्म्युला सुरु झाला.

बोईंग कंपनी यशाच्या पायऱ्या चढत गेली, पण….

वेळेबरोबर बोईंग कंपनी यशाच्या पायऱ्या चढत गेली. पण कंपनीसोबत काही वादही जोडले गेले. बोईंगच्या अनेक विमानांना अपघातही झाले. त्यामुळे कंपनीच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. ज्या चुका झाल्या, त्यात बोईंगने सुधारणा केली. वेळेबरोबर विमान निर्मितीमध्ये बदल केले. अत्याधुनिक टेक्नोलॉजी आणली. त्यामुळे आज जगभरातून बोईंगच्या विमानांना मागणी आहे.

बोईंगच्या कुठल्या विमानावरुन सर्वाधिक वाद?

बोईंगच्या 737 मॅक्स मॉडलवरुन सर्वाधिक वाद झाला. 2018 मध्ये इंडोनेशिया आणि 2019 मध्य इथियोपियामध्ये या दोन विमान अपघातात 346 प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेनंतर दीडवर्षापेक्षा अधिक काळ बोईंगच्या 737 मॅक्स विमानाच्या उड्डाणाला ब्रेक लागला होता. 737 मॅक्स मॉडलवरुन बोईंगला बरीच टीका सहन करावी लागली. या दोन विमान अपघातानंतर बोईंगने फ्लाइट कंट्रोल सिस्टिमच्या सॉफ्टवेयरमध्ये बदल केले. परिणामी 2021 नंतर पुन्हा 737 मॅक्स विमानांच उड्डाण सुरु झालं.

अमेरिकेबाहेर बोईंगची सर्वाधिक गुंतवणूक भारतात?

बोईंग कंपनी भारताला फक्त विमानांचीच विक्री करत नाहीय, तर भारतात गुंतवणूकही करत आहे. अमेरिकेबाहेर बोईंग भारतात सर्वाधिक गुंतवणूक करणार आहे. बोईंग बंगळुरु येथे एक इंजिनिअरींग सेंटर सुरु करणार आहे. येथे विमान निर्मितीवर संशोधनही चालणार आहे. कर्नाटकात कॉम्प्लेक्स केम्पेगौडा आंरराष्ट्रीय विमान तळाजवळ बंगळुरु देवनहल्ली येथे हे सेंटर उभं राहणार आहे. भारतात एविशन सेक्टरमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी सुद्धा बोईंग कार्यक्रम सुरु करणार आहे. बोईंग बंगळुरुच्या सेंटरमध्ये 1600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. 43 एकरमध्ये हे सेंटर असेल. भारतात वैमानिकांना ट्रेनिंग, इन्फ्रास्ट्रक्चर आणि अन्य कार्यक्रमांसाठी 10 कोटी डॉलरची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा बोईंगने केली होती. यानंतर एअर इंडियाने 200 पेक्षा जास्त जेट विकत घेण्यासाठी बोईंगसोबत एक करार केला. यात 787 ड्रीमलायनर, 777X, 737 Max नॅरोबॉडी विमानांचा समावेश आहे.

भारतात बोईंग नाही, मग कुठल्या कंपनीच्या विमानाचा सर्वाधिक वापर?

भारताच फ्रान्सची कंपनी एयरबसच्या विमानांचा सर्वाधिक वापर होतो. देशातील एअरलाइन्स कंपन्यांकडे 478 एयरबसची विमान आहेत. त्यानंतर दुसऱ्या नंबरवर बोईंग आहे. बोईंगची 135 विमान आहेत. एअर इंडियाने मागच्यावर्षी डील केली. त्यानंतर आता भारतात बोईंग विमानांची संख्या वाढणार आहे. भारतात दरवर्षी विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. आकड्यानुसार, 2022 च्या तुलनेत 2021 मध्ये देशांतर्गत प्रवाशांची संख्या 47 टक्क्याने वाढली.

बोईंग कंपनी भारतात इतकी गुंतवणूक का करतेय?

बोईंग कंपनी अमेरिकेनंतर भारतात एवढी मोठी गुंतवणूक करतेय, त्यामागे बिझनेस हे एकमेव कारण आहे. भारतात लोकसंख्येच्या प्रमाणात हवाई प्रवाशांची संख्या सतत वाढत आहे. अनेक विमान कंपन्या सुरु झाल्या आहेत. हवाई कनेक्टिविटी वाढवण्यावर सरकारच लक्ष आहे. प्रवासी संख्या जितकी वाढणार तितकी विमानांची गरज लागणार. हेच नफ्याच गणित लक्षात घेऊन बोईंगने भारतावर लक्ष केंद्रीत केलय. फक्त प्रवासी विमानांचा पुरवठा करणं एवढच नव्हे, तर हवाई सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा भारतीय बाजारपेठेवर वर्चस्व मिळवण्याचा बोईंगचा प्रयत्न आहे. भारताने अमेरिकेकडून लष्करी साहित्याची खरेदी वाढवली आहे. यात विमान, हेलिकॉप्टर्स सुद्धा आहेत. पण फायटर जेट्ससाठी भारत आजही रशिया, फ्रान्स या देशांवर विश्वास दाखवतो. हेच मार्केट काबीज करण्याचा बोईंगचा प्रयत्न असेल.

बोईंगला भारताची इतकी गरज का?

विद्यमान सरकारने मेक इन इंडियाचा नारा दिला आहे. स्वदेशी तंत्रज्ञान, उत्पादनाला प्रोत्साहन देणं हा त्यामागे उद्देश आहे. बोईंगला जागतिक बाजारपेठेवर वर्चस्व ठेवण्यासाठी भारताची सुद्धा तितकीच गरज आहे. त्यामुळे बोईंगने भारतात गुंतवणूक करण्यावर भर दिला आहे. बोईंगच नवीन रिसर्च एंड डेवलपमेंट सेंटर भारतात होत असल्याने भारतीयांनाही यातून बरच ज्ञान मिळणार आहे. यापुढे एविएशन सेक्टरमधील नवीन शोध भारतात लागल्या आश्चर्य वाटून घेऊ नका.

बोईंगची मुख्य स्पर्धा कुठल्या कंपनीबरोबर?

बोईंगची मुख्य स्पर्धक एअरबस कंपनी आहे. वॉशिंग्टनच्या सिएटलमध्ये विलियम बोईंग यांनी 15 जुलै 1916 साली बोईंग कंपनी सुरु केली. बोईंग एक अमेरिकन मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन आहे. बोईंग कंपनीच शिकागो, इलिनोइसमध्ये कॉर्पोरेट मुख्यालय आहे. बोईंगमध्ये जवळपास 1,53000 कर्मचारी काम करतात. एअरबसची स्थापना 1970 साली झाली. युरोपियन संघातील जर्मनी, फ़्रान्स, यूनायटेड किंगडम आणि स्पेनमधील 16 ठिकाणी एअरबसचे जवळपास 57000 हजार कर्मचारी काम करतात. एअरबसमुळे बोईंगची विमान निर्मिती क्षेत्रातील एकाधिकारशाही संपुष्टात आली. एअरबसने 2022 साली 1,078 जेट्सची ऑर्डर पूर्ण केली. मागच्यावर्षी एअर इंडियाने एअरबस आणि बोईंगसोबत 470 एअरक्राफ्टची जगातील सर्वात मोठी सिविल एविएशन डील केली. या करारातंर्गत एअर इंडियाला फ्रान्सच्या एअरबस कंपनीकडून 250 आणि अमेरिकन कंपनी बोईंगकडून 220 विमानं मिळणार आहेत.

बोईंगने बनवलेली मिलिट्री विमान आणि हॅलिकॉप्टर्स

C-17 ग्लोबमास्टर III

CH/MH-47 चिनूक हॅलिकॉप्टर

V-22 ओस्प्रे विमान

AH-6 लाइट अटॅक हेलिकॉप्टर

AH-64D अपाचे हेलिकॉप्टर

F/A-18E/F सुपर हॉर्नेट फायटर एअरक्राफ्ट

F-15E स्ट्राइक इग्ल फायटर जेट

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.