AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crude Oil Price Crash : भारतासह जगासाठी मोठा दिलासा… होर्मुज खुलताच आली गुड न्यूज, कच्च्या तेलाचे भाव…

अमेरिका आणि इराणमध्ये शांतता कराराबाबत सहमती झाल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. अमेरिकेने होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची घोषणा केली, ज्यामुळे तेल आणि वायूचा पुरवठा सुरळीत होणार आहे. यामुळे जगाला, विशेषतः भारताला, ऊर्जा संकटातून मोठा दिलासा मिळाला असून पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे.

Crude Oil Price Crash : भारतासह जगासाठी मोठा दिलासा… होर्मुज खुलताच आली गुड न्यूज, कच्च्या तेलाचे भाव…
| Updated on: Jun 15, 2026 | 8:36 AM
Share

प्रदीर्घ कालावधीनंतर, अमेरिका आणि इराण यांच्यात अखेरीस सर्वसमावेशक शांतता कराराबाबत सहमती झाली आहे. या कराराची घोषणा करताना, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील अमेरिकन नाकेबंदी उठवण्याची आणि हा अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग जगासाठी पुन्हा खुला करण्याची घोषणा केली. यामुळे सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिका-इराण करार सहमतीनंतर जागतिक बाजारात अनेक पडसाद उमटले. सर्वात महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत अचानक मोठी घसरण झाली. या बातमीमुळे सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारांत ‘ब्रेंट क्रूड फ्युचर्स’च्या किमतीत 5 टक्क्यांनी, तर अमेरिकेच्या ‘वेस्ट टेक्सास इंटरमीजिएट’च्या किमतीत 4.6 टक्क्यांहून अधिक घट झाली.

अचानक एवढं स्वस्त झालं कच्चं तेल

अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता कराराची चिन्हं गेल्या काही दिवसांपासूनच दिसू लागली होती आणि कच्च्या तेलाच्या किमतीही घसरताना दिसत होत्या. मात्र, ट्रम्प यांनी हा करार निश्चित झाल्याची घोषणा करताच किमतींमध्ये मोठी घसरण दिसून आली. ब्रेंट क्रूडच्या किमती 4 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 83 डॉलर्सवर आल्या, तर डब्ल्यूटीआय (WTI) क्रूडच्या किमती प्रति बॅरल 80 डॉलर्सच्या जवळ पोहोचल्या; याव्यतिरिक्त, मुर्बान क्रूडचा व्यवहार 83 डॉलर्सवर होत होता.

काय म्हणाले ट्रम्प ?

“इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणसोबतचा करार आता पूर्ण झाला आहे; सर्वांचं अभिनंदन! याद्वारे मी होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) कोणत्याही अडथळ्याविना खुली करण्यास आणि अमेरिकन नौदलाची नाकेबंदी त्वरित उठवण्यास अधिकृत मंजुरी देत ​​आहे” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले”. ‘ट्रुथ सोशल’ (Truth Social) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील आपल्या खात्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-इराण शांतता कराराची घोषणा केली.

जगाला मोठा दिलासा

साधारण चार महिन्यांपूर्वी 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने मिळून इराणवर हल्ला केला आणि त्यानंतर इराणने केलेल्या प्रतिहल्ल्यामुळे मध्य पूर्वेत भीषण युद्ध भडकले. इराणने ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (होर्मुझची सामुद्रधुनी) बंद करण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे जागतिक स्तरावर तेल आणि वायूचे मोठे संकट गडद झालं. त्यामुळे कच्च्या तेलाचे भाव दीर्घकाळापर्यंत प्रति बॅरल 100 ते 115 डॉलर्सच्या दरम्यान होते आणि विविध देशांमध्ये पेट्रोल-डिझेलपासून ते एलपीजीपर्यंत सर्वच गोष्टींचे दर वाढले होते. भारतताही उर्जा संकट घोंगावत होतं. मात्र आता, कच्च्या तेलाच्या दरातील घसरण आणि ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (Strait of Hormuz) पुन्हा सुरू होणे ही जगासाठी तसेच भारतासाठीही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे. होर्मुझ मार्ग पुन्हा खुला झाल्यामुळे आणि तेल व वायूचा सुरळीत पुरवठा पूर्ववत झाल्यामुळे, केवळ पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याचीच नव्हे, तर एलपीजीच्या दरांवरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Follow Us
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय