आमच्यावर पुरुष नजरेनेच बलात्कार करतात, पाकिस्तानातील भयानक वास्तव

Women Life in Pakistan : महिलांसाठी नरक आहे पाकिस्तान... पुरुष नजरेनंही करतात बलात्कार, तरुणीकडून पकिस्तानी पुरुषांची पोलखोल, 'तो' व्हिडीओ पाहिल्यानंतर म्हणाल..., व्हिडीओ तुफान व्हायरल

आमच्यावर पुरुष नजरेनेच बलात्कार करतात, पाकिस्तानातील भयानक वास्तव
| Updated on: Oct 31, 2025 | 11:02 AM

Women Life in Pakistan : महिलांना त्यांच्या इच्छेनुसार जगता आलं पाहिजे, त्यांनी त्यांची आवड जोपासली पाहिजे… महिलांना त्यांच्या आवडीचे कपडे घालता यायला पाहिजे… असं आपण म्हणतो… पण असं राहणाऱ्या मुली, महिलांचं आयुष्य किती कठीण असतं… हे सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे… ही परिस्थिती दुसऱ्या कोणत्या देशातील नाही तर, पाकिस्तान येथील आहे… मुस्लीम महिलांनी बुरखा घालूनच बाहेर पडलं पाहिजे.. असा मुस्लीम धर्माचा नियम आहे… तर मुस्लीम राष्ट्रात एक तरुणी बुरखा न घालता घराबाहेर पडते तेव्हा पुरुष तिला किती वाईट नजरेत पाहातात… हे व्हिडीओमध्ये दिसत आहे..

व्हिडीओ दिसणाऱ्या तरुणीने असे कपडे घातले आहेत, जसे इतर देशातील महिला कायम घालत असतात. पॅन्ट आणि टी-शर्ट घालून बाहेर पडलेल्या तरुणीला पाकिस्तानी पुरुषांच्या वाईट नजरेचा सामना करावा लागला… त्यामुळे महिला खरंच स्वतंत्र आहेत का? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.

व्हिडिओमध्ये तरुणीकडे पाहणाऱ्या पुरूषांचे दृश्य लाजिरवाणं आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या पुरूषांमध्ये वृद्ध पुरूषांचा समावेश आहे जे तरुणीकडे अश्लीलपणे पाहत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. पुरुष नजरेनं बलात्कार करत आहेत… असं देखील अनेकांना कमेंट करत म्हटलं आहे. सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सांगायचं झालं तर, पाकिस्तानात महिलांसाठी अनेक नियम आहेत, ते सर्व नियम मोडीत काढत तरुणीने मोठं धाडस करत पाकिस्तानता काळा चेहरा जगा समोर आणला आहे… व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

 

 

महिलांसाठी नरक आहे पाकिस्तान…

पाकिस्तानमध्ये महिलांनी बुरखा घातला म्हणजे त्या सुरक्षित आहे… असं मानलं जातं. पण असं काहीही नाही. लाहोर, कराची, इस्लामाबाद यांसारख्या देशात 70 टक्के महिला बुरख्यात असून सुद्धा स्टॉकिंगच्या बळी ठरतात… एप्रिल 2024 मध्ये कराची येथील पाक कॉलनीमध्ये एका बुरखा घातलेल्या महिलेवर अत्याचार करण्यात आले.

घटनेचे CCTV फुटेज देखील सर्वत्र व्हायरल झाले होते. तज्ज्ञांचे म्हणण्यानुसार, हे सर्व पुरुषप्रधान समाजाचे परिणाम आहे जिथे महिलांवर नियंत्रण ठेवणे हा आदराचा विषय मानला जातो. WFP अहवालात असं सांगितंल आहे की. 40% महिलांचा ऑनलाइन छळ केला जातो, ज्यामुळे रस्त्यावरील भीती वाढते.