
नेपाळमध्ये तरुणांच्या यल्गाराने संसदच काय तर नेत्यांनाही पळता भुई थोडी झाली आहे. सोशल मीडियावरील बंदी हे तर केवळ निमित्त ठरले आहे. बऱ्याच काळापासून तरुणांच्या मनात कोंडलेली वाफ या निमित्ताने उसळून बाहेर आल्याचे म्हटले जात आहे भ्रष्टाचार, घराणेशाही आणि कोसळलेली अर्थव्यवस्था यांनी परिस्थितीला आणखीनच विस्फोटक बनवले असल्याचे म्हटले जात आहे.
सोशल मीडियावरील बंदी यात आगीत तेल घालण्याचे काम केले आणि पहाता पहाता हे आंदोलन पेटले. सरकारने वाढता विरोध पाहून सोशल मीडियावर बंदी तातडीने मागे घेतली. अनेकांनी राजीनामे दिले.जाळपोळीच्या घटना घडल्या.या युवकांच्या गर्दीला एकटवण्याचे काम केले ते हामी नेपाल नावाच्या संघटनेने. आणि या संघटनेचे कर्तेधर्ते आहे, ३६ वर्षांचा एक तरुण सुदन गुरुंग. गुरुंग आज नेपाळच्या जनरेशन z साठी एक उमेदीचा नवा किरण आणि नवे प्रतीक मानला जात आहे.
गुरुंग यांची ताकद आहे विद्यार्थी आणि तरुण. त्यांचं आंदोलन संपूर्णपणे डिजिटल टुल्सवर आधारित आहे.इंस्टाग्राम, डिस्कॉर्ड आणि युट्युबवर ते केवळ प्रोटेस्टचे रुट्स नव्हे तर सुरक्षेचे उपाय देखील शेअर करतात. त्यांनी तरुणांना अपिल केले की निदर्शनात त्यांना युनिफॉर्म आणि पुस्तके घेऊन सामील व्हावे. आंदोलनाचा हा प्रकार नेपाळी तरुणांना खूपच भावला आणि आंदोलन पहाता पहाता पेटले.
एके काळी इव्हेंट ऑर्गनायझर असलेल्या सुदन यांनी त्यांच्या करीयरची दिशा संपूर्णपणे बदलली. भूकंपात त्यांनी मदत साहित्य पोहचवण्यापासून ते पुर, भुस्खलन आणि साथीच्या सारख्या नैसर्गिक संकटात काम केले. हामी नेपाळ यांनी आतापर्यंत हजारो कुटुंबांना जेवण, कपडे आणि औषधे पोहचवली आहेत. त्यांचा मंत्र आहे – For the People, By the People. जेव्हा निदर्शक हिंसक झाले, २० लोक मृत्यूमुखी पावले आणि शेकडो जखमी झाले.तेव्हा कुठे कॅबिनेटने ही बंदी मागे घेतली. म्हणजे सुदन गुरुंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सिस्टीमला त्यांच्या पुढे झुकण्यास मजबूर केले.
केवळ विरोध नाही तर सुदन गुरुंग यांनी आधी जनआंदोलनांना दिला दिली आहे. धरानमधील घोपा कँप प्रोटेस्टपासून आरोग्य सेवेत पारदर्शकतेची मागणी, ते नेहमीच सक्रीय राहिले आहेत. त्यांचा हा ट्रॅक रेकॉर्ड त्यांना आज नेपाळच्या तरुणांमध्ये विश्वसनीय चेहरा बनवले आहे.आज सुदन गुरुंग केवळ एक NGO प्रमुख नव्हे तर नेपाळच्या जनरेशन Z ची आवाज बनले आहेत.