मोठी बातमी! खामेनी इराणमधून पळून जाण्याच्या तयारीत? बंकरमध्ये…मोठी माहिती समोर!
इस्रायल आणि अमेरिका यांनी इराणवर हल्ले केले आहेत. असे असतानाच आता खामेनी यांच्याबाबत मोठा दावा केला जातोय.

Iran And Israel War Update : सध्या इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध चांगलंच भडकलं आहे. या युद्धात अमेरिकेनेही उडी घेतली असून काही दिवसांपूर्वीच इराणच्या आण्विक तळांवर हल्ले केले आहेत. दरम्यान, आता इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्याबाबत मोठा दावा केला जातोय. खामेनी इराण सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा इराणच्या माजी क्राऊन प्रिन्सने केला आहे.
माजी क्राऊन प्रिस रेजा शाह पहलवी यांचा मोठा दावा
इराण आणि इस्रायल यांच्यात 13 जूनपासून युद्ध चालू झालं. या युद्दापासून खामेनी हे त्यांच्या कुटुंबासोबत एका बंकरमध्ये सुरक्षित ठिकाणी वास्तव्यास आहेत, असं सांगितलं जातं. तर दुसरीकडे इराणचे निर्वासित असलेले क्राऊन प्रिस रेजा शाह पहलवी यांनी मात्र मोठा दावा केला आहे. ते गेल्या अनेक दिवसांपासून खामेनी यांना लक्ष्य करत आहेत. खामेनी तसेच त्यांच्या जवळचे लोक इराण सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात आहे, असा दावा पहलवी यांनी केलाय. मी खामेनी यांना एक साधा संदेश देऊ इच्छीत आहे. त्यांनी सरळ आपल्या पदापासून दूर व्हावं. असं केल्यास त्यांच्यावर योग्य त्या कायदेशीर प्रक्रियेची मदत मिळेल. तसेच त्यांच्याविरोधात निष्पण खटला भरला जाईल.
मला सत्तेचा लोभ नाही- पहलवी
प्रिन्स रेजा शाह पहलवी यांनी मला इराणच्या सत्तेचा लोभ नाही, असंही सांगितलं आहे. मला राजकीय सत्ता नकोय. उलट माझा देश स्थिरता, स्वातंत्र्य तसेच न्यायाच्या प्रक्रियेत पुढे जावा आणि त्यासाठी मी मदत करावी, अशी माझी इच्छा आहे, असं पहलवी यांनी म्हटलंय.
इस्रायल, अमेरिकेला केले खास आवाहन
त्यांनी अमेरिका तसेच इस्रायलला सध्याच्या इराणमधील सरकारला माफी देऊ नये आणि शांततापूर्ण, लोकशाही मान्य असणाऱ्या सरकारला पाठिंबा द्यावी, असे आवाहन केले आहे. लोकशाही व्यवस्थाच इराणला अण्वस्त्र मिळवण्यापासून थांबवू शकेल, असं पहलवी यांचं मत आहे.
दरम्यान, आता पहलवी यांनी खामेनी यांच्याविरोधात भूमिका घेतल्यानंतर आता पुढे काय होणार? अमेरिका आणि इस्रायल नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
