AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayatollah Ruhollah Khomeini : इराणचे सुप्रीमो खामेनीचं भारतीय कनेक्शन, उत्तर प्रदेशातील या गावाशी काय संबंध

Supreme Leader Ayatollah Ruhollah Khomeini : इराणने इस्त्रायललाच नाही तर अमेरिकाला पण टशन दिल्याने जगभरात तो चर्चेचा विषय ठरला आहे. अर्थात इराणमधील हुकूमशाही आणि महिलांवरील अत्याचारा संपूर्ण जगाला माहिती आहे. या इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनीचं भारताशी असं कनेक्शन आहे.

Ayatollah Ruhollah Khomeini : इराणचे सुप्रीमो खामेनीचं भारतीय कनेक्शन, उत्तर प्रदेशातील या गावाशी काय संबंध
अयातुल्ला खामेनीचे भारताशी कनेक्शनImage Credit source: गुगल
| Updated on: Jun 21, 2025 | 8:46 AM
Share

Israel Iran War : इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्ध भडकले आहे. दोन्ही देश एकमेकांवर तुटून पडलेले आहेत. इस्त्रायलचे संरक्षण मंत्र्यांचे मते, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी हे जिवंत राहण्यास योग्य नाही. इराणच्या कट्टरवादामुळे तिथल्या स्वातंत्र्याचा पुरस्कारकर्त्या महिला, पुरुषांवरील अत्याचाराने कळस गाठला आहे. त्यातच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनीचं भारताशी कनेक्शन समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील बाराबंकी या शहराचे इराणसोबत जुने नाते आहे. 1978 मध्ये जेव्हा इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली. त्यामागे रुहुल्लाह खामेनी हे होते. खामेनी यांचे आजोबा सय्यद अहमद मूसवी हे बाराबंकीजवळील किंतूर या गावाचे रहिवाशी होते. त्यांचे किंतूर हे जन्मगाव आहे.

बाराबंकी नाही किंतूर हे जन्मगाव

समाज माध्यमांसह अनेक माध्यमं हे खामेनी यांच्या पूर्वजांचे बाराबंकी हे गाव असल्याचा दावा करत आहे. पण त्या दाव्यात तथ्य नाही. सिरोलीगौसपूर तहसील अंतर्गत किंतूर हे गाव सय्यद अहमद मुसवी यांचे जन्म गाव आहे. 40 व्या वर्षी ते पहिल्यांदा धार्मिक यात्रेवर इराक येथे गेले होते. तिथून ते इराणमध्ये गेले. तिथल्या खुमेन या गावातच ते स्थायिक झाले. अहमद मूसवी यांनी त्यांच्या नावासमोर अजून एक उपनाव जोडले. लोक त्यांना सय्यद अहमद मूसवी असे म्हणू लागले.

इराणचे असे झाले सर्वोच्च नेते

मूसवी यांचा नातू रुहुल्लाह खामेनी याचा जन्म 1902 मध्ये झाला. त्याने धार्मिक आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. त्यावेळी इराणमध्ये पहलवी कुटुंबाचे शासन होते. खामेनी यांनी या घराण्याला विरोध केला. सरकारने त्याला देशाबाहेर हाकलले. पुढे इराणमधील जनता रुहुल्लाह खामेनी याला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरली. ही बंडाळी पाहून पहलवी घराण्याने गाशा गुंडाळला. 14 वर्षानंतर खामेनी इराणमध्ये परतले. 1979 मध्ये पहिल्यांदा इस्लामिक सरकार अस्तित्वात आले. खामेनी इराणचे पहिले सर्वोच्च नेते ठरले.

नंतर अयातुल्ला खामेनी सत्तेत

1989 मध्ये रूहुल्‍लाह खामेनी यांचे निधन झाले.अयातुल्ला अली खामेनी यांनी या देशाची सूत्र हाती घेतली. पद मिळताच त्याने धार्मिक कट्टरतवाद सुरू केला. त्याने इराणच्या घटनेत मोठ्या दुरस्त्या केल्या. इराणवर मजबूत पकड मिळवण्यासाठी त्याने अनेक सांस्कृतिक, धार्मिक बंधन घातली. धार्मिक हुकूमशाही आणण्यात अयातुल्ला खामेनी यशस्वी ठरला. इराणवर आपला वचक असावा ही त्याच्या वडिलांची इच्छा अयातुल्लाने अखेर पूर्ण केली. कट्टरतावादाने या देशातील स्त्रीया आणि मुलांचे मोठे नुकसान केले.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.