‘मोदीजी यांच्यापासून इम्प्रेस…, ‘ नेपाळचे नेतृत्व सांभाळू पाहणाऱ्या सुशीला कार्की काय म्हणाल्या ?

नेपाळ धुमसतच असून तेथे आता नवे सरकार बनवण्याच्या हालचाली सुरु झालेल्या आहेत. या दरम्यान काळजीवाहू सरकारच्यावतीने संभाव्य प्रमुख सुशीला कार्की यांनी एका खाजगी चॅनलला मुलाखत दिली आहे.

मोदीजी यांच्यापासून इम्प्रेस...,  नेपाळचे नेतृत्व सांभाळू पाहणाऱ्या सुशीला कार्की काय म्हणाल्या ?
Sushila Karki
| Updated on: Sep 10, 2025 | 8:10 PM

भारताचा शेजारी नेपाळमध्ये गेली तीन दिवस अक्षरश: अराजक माजले आहे. आता तेथे नवे सरकार येण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. नव्या सरकारचे नेतृत्वा एका महिलेच्या हाती जाण्याची चिन्हे आहेत. या नेपाळच्या काळजीवाहू सरकारच्या संभाव्य प्रमुख सुशीला कार्की यांनी भारताशी असलेल्या नात्या संदर्भात एका खाजगी वृत्तवाहिनीशी चर्चा केली आहे.

नेपाळच्या नेत्या सुशीला कार्की यांनी भारताशी असलेल्या नेपाळच्या संबंधात विषयी मोकळेपणे चर्चा केलेली आहे. त्या म्हणाल्या भारत आणि नेपाळेचे नाते खुप जुने आहे. नेपाळ आणि भारताच्या जनतेचा एकमेकांशी असलेले नाते गहीरे आहे. भारत आमचा नातलगही आणि दोस्तही आहे. भारताने नेपाळला नेहमीच मदत केली आहे. परंतू जशी किचनमध्ये भांडी एकमेकांशी आपटतात तशी आमच्या नात्यात कधीतरी अधून मधून खटपट सुरु होते. परंतू भारत आणि नेपाळचे नाते मजबूत आहे असेही सुशीला कार्की यांनी सांगितले.

या मुलाखती दरम्याने सुशीला कार्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही नाव घेतले. त्या म्हणाल्या मी मोदी यांच्या कार्यशैलीने प्रभावीत झाले आहे. त्या म्हणाल्या की मोदीजी यांना नमस्कार, माझ्या मनात मोदी यांच्याबद्दल चांगले इम्प्रेशन आहे. कार्की यांनी भारतातील इतर नेत्यांचेही कौतूक केले, परंतू कोणाचे थेट नाव घेतले नाही. अंतरिम सरकार संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर कार्की यांनी माझ्या नावाचा प्रस्ताव आहे. परंतू अजूनही निश्चित झालेले नाही असेही त्यांनी सांगितले.

सुशीला कार्की यांनी सांगितले की त्यांचे घर सीमेजवळ आहे. नेहमी सीमेजवळील मार्केटमध्ये मी येत जात असते असेही त्यांनी सांगितले. सध्याच्या नेपाळच्या परिस्थितीबाबत कार्की म्हणाल्या काठमांडूची परिस्थिती संपूर्णपणे खराब झालेली नाही. परंतू २० विद्यार्थ्यांचा मृ्त्यू झाला हे दु:खद आहे. मी दुसऱ्यादिवशी मुलांना पाहायला गेले तर गोळीबार सुरु होता. लष्कराने परिस्थिती आपल्या हातात घेतली आहे. आता राजकारणापेक्षा शांततेची आधी गरज आहे. माझे नाव घेतले आहे, परंतू अजून काही निश्चित नाही.उद्या बदलही होऊ शकतो असेही त्या म्हणाल्या.