श्वानांचं मटण शिजवण्यासाठी 200 शेफ, ‘या’ देशातील ‘स्वीट मीट’ राष्ट्रीय स्पर्धा

श्वानाचं मटण शिजवण्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून एकत्र आले स्पर्धक, देशातील 'स्वीट मीट' राष्ट्रीय स्पर्धेची सर्वत्र चर्चा... श्वानाचं सूप ठरलं स्पर्धेच्या आकर्षणाचं केंद्र

श्वानांचं मटण शिजवण्यासाठी 200 शेफ, या देशातील  स्वीट मीट राष्ट्रीय स्पर्धा
फाईल फोटो
| Updated on: Jul 21, 2025 | 10:14 AM

प्रत्येक देशाची त्यांची स्वतःचा खाद्यसंस्कृती आणि परंपरा असते. अशात उत्तर कोरिया एक असा देश आहे, जो जगातील इतर देशांपेक्षा फार वेगळा आहे. हुकूमशहा किम जोंग उन येथे राज्य करतात. येथील शासक कायम विचित्र आदेश आणि निर्णयांमुळे चर्चेत असतात. आता देखील उत्तर किरोयाची एका स्पर्धा तुफान चर्चेत आहे. रिपोर्टनुसार, उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग याठिकाणी या आठवड्यात श्वानाचं मांस शिजवण्याच्या राष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. तेथील सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्पर्धेत देशातील जवळपास 200 शेफ सामील झाले होतं.

का म्हटलं जातं स्वीट मीट स्पर्धा…

येथे श्वानाला ‘स्वीट मीट’ म्हटलं जातं. यामुळे या स्पर्धेचं नाव देखील ‘स्वीट मीट’ कॉम्पिटिशन ठेवण्यात आलं होतं. या वादग्रस्त पदार्थाची तयारी करण्यातील त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी सर्व सहभागी शेफ एकत्र आले होते. हा कार्यक्रम किम जोंग उन राजवटीने आयोजित केला होता. हा कार्यक्रम राजधानीतील रयोम्योंग स्ट्रीटवरील फूड फेस्टिव्हल हाऊसमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि चार दिवस चालला.

आकर्षणाचं केंद्र होते श्वामाच्या मांसाचं सूप

कोरियन सेंट्रल न्यूज एजेंसी (केसीएनए) द्वारा जारी करण्यात आलेल्या फुटेजमध्ये श्वानाच्या मांसचे वेगवेगळे प्रकार दिसले. . यामध्ये देशातील पारंपारिक श्वानाच्या मांसाचा सूप किंवा टँगोगी देखील समाविष्ट होता. ते स्पर्धेच्या आकर्षणाचं केंद्र होतं. सरकारी कोरियन सेंट्रल टेलिव्हिजनने केलेल्या दाव्यानुसार, या वर्षीच्या स्पर्धेत गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट शेफ सहभागी झाले होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक आले होते.

उन्हाळ्यात स्वीट मांसच्या सूपचं उर्जेचा पारंपारिक स्रोत म्हणून वर्णन केलं आणि असा दावा केला गेला की, स्वयंपाकाचा उद्देश स्वयंपाकाचा दर्जा वाढवणे आणि मांस शिजवण्याचे ज्ञान सामायिक करणे आहे.

दक्षिण कोरिया कुत्र्याच्या मांसावर बंदी घालणार आहे

हे पाऊल शेजारील दक्षिण कोरियाच्या अगदी विरुद्ध आहे, जिथे गेल्या वर्षी पारित झालेल्या कायद्यानुसार फेब्रुवारी 2027 पासून कुत्र्याच्या मांसाचं उत्पादन, वितरण आणि विक्री बेकायदेशीर ठरवण्यात येणार आहे.

उत्तर कोरिया करतोय अन्नटंचाईचा सामना

ही असामान्य स्पर्धा अशा वेळी आयोजित करण्यात आली होती जेव्हा उत्तर कोरिया दीर्घकालीन अन्नटंचाईचा सामना करत आहे. या स्पर्धेद्वारे, उत्तर कोरिया, आपल्या संस्कृतीला उजाळा देण्याच्या बहाण्याने, देशातील लोकांचे लक्ष दीर्घकालीन अन्नटंचाईपासून विचलित करू इच्छित आहे, ज्यामुळे तेथील लोक दीर्घकाळापासून त्रस्त आहेत.