अमेरिका इराक युद्धात भारत-पाकिस्तान सीमेवर मोठ्या घडामोडी, थेट पाकिस्तानातून भारतीय हद्दीत…

पाकिस्तानात मोठा हिंसाचार झाला. अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला करण्यात आला. यानंतर पाकिस्तानला झटका देणारा निर्णय अमेरिकेकडून घेण्यात आला. आता यादरम्यानच भारत पाकिस्तान सीमेवर मोठ्या हालचाली दिसत आहेत.

अमेरिका इराक युद्धात भारत-पाकिस्तान सीमेवर मोठ्या घडामोडी, थेट पाकिस्तानातून भारतीय हद्दीत...
India Pakistan border
| Updated on: Mar 04, 2026 | 12:39 PM

इराण, अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये मोठे युद्ध सुरू आहे. घातक हल्ले केले जात आहेत. युद्ध अत्यंत टोकाला पोहोचले. इराणकडूनही ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, तिथे हल्ला केला जात आहे. कुवेतच्या हद्दीतून अमेरिकेचे लढाऊ विमान इराणकडे जात असताना एक गैरसमज झाला आणि थेट कुवेतने ही विमान उडवून दिली. इराणच्या प्रमुख शहरांवर मोठे आणि घातक हल्ले होत असताना इराण पराभव स्वीकारत नाही. अमेरिकेच्या हल्ल्याला थेट उत्तर देत आहे. इस्त्रायल आणि इराणमधील नागरिक बंकरमध्ये लपून बसले. इस्त्रायल आणि इराण एकमेकांवर मोठे हल्ले करत आहेत. इराण अमेरिकेसोबत चर्चेसाठी तयार आहे. मात्र, अमेरिकेकडून सांगण्यात आले की, चर्चा करण्याची वेळ निघून गेली. अमेरिकेच्या लष्कर तळावर हल्ला करण्यासाठी इराणने जवळपास आठ देशांमध्ये हल्ला केला. या युद्धात इराणच्या प्रमुख शहरांचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट आहे. आत्मघाती हल्ले केले जात आहेत.

इराण आणि अमेरिकेत युद्ध पेटलेले असतानाच पाकिस्तान काही सुधरण्याचे नाव घेत नाही. जगात इतके मोठे युद्ध सुरू असताना पाकिस्तानच्या सीमेवरील कुरापती काही कमी झाल्या नाहीत. बीएसएफने रात्री उशिरा भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेतले. आरोपीची ओळख पाकिस्तानच्या शेखूपूराच्या मुरीदके येथे मोहम्मद अशफाक झाली.

बीएसएफने त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे आठ हजार रूपये, मोबाईल फोन आणि तीन सीमकार्ड मिळाली आहेत. आरोपीच्या विरोधात केल दाखल करण्यात आली. बीएसएफकडून सीमेवर गस्त घातली जात असताना त्यांना पाकिस्तानच्या बाजूने काही संशयास्पद हालचाली जाणवल्या. यावेळ तारेच्या जवळ व्यक्ती येताना दिसला.

जवानांनी त्याला लगेचच पकडले. त्यानंतर तो पाकिस्तानी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले. पंजाबच्या लगत असलेल्या पाकिस्तानी सीमेवर सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी नागरिकाला अटक करण्यात आली.पाकिस्तान सीमेवर सतत भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतात घुसखोरी करून मोठ्या दहशतवादी कारवाई दहशतवादी घडवतात.

Follow Us