
मोठी बातमी समोर आली आहे, मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चार बोटी समुद्रात बुडाल्या. या दुर्घटनेत तब्बल 180 लोक बेपत्ता झाले आहेत. यमन आणि जिबूतीदरम्यान ही दुर्घटना घडली. संयुक्त राष्ट्र संघाकडून या बातमीला दुजोरा देण्यात आला आहे. ज्या समुद्री मार्गावर ही दुर्घटना घडली आहे, त्याचा समावेश हा जगातील सर्वात धोकादायक असलेल्या समुद्री मार्गांमध्ये होतो. या मार्गाने प्रमुख्यानं इथोपियन नागरिक रोजगाराच्या शोधात आखाती देशांमध्ये जातात. मात्र या मार्गावरून प्रवास करत असताना ही मोठी दुर्घटना घडली. या अपघातामध्ये चार बोटी समुद्रात बुडाल्या असून,180 लोक बेपत्ता झाले आहेत.
आयएमओने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. चार बोटी समुद्रात बुडाल्या आहेत. या चार बोटींमधून तब्बल 180 नागरिक प्रवास करत होते. या बोटी प्रवाशांनी खचाखच भरलेल्या होत्या. या चारही बोटी समुद्रात बुडल्या, यातून प्रवास करणारे सर्व प्रवाशी बेपत्ता झाले आहेत, त्यांचा अजूनही शोध लागला नसून घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. मात्र अजून यातील एकही प्रवाशी सापडलेला नाहीये. हा अपघात यमन आणि जिबूतीदरम्यान असलेल्या समुद्री मार्गावर घडला आहे. या मार्गावर आधी देखील काही दुर्घटना घडल्या आहेत. 2024 साली या मार्गानं एकूण 60,000 लोकांनी प्रवास केला, त्यातील 558 लोकांचा मृत्यू झाला.
यापूर्वी जानेवारी महिन्यात देखील या मार्गावर मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत बोट बुडाल्यानं 20 इथोपियन नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता ही मोठी दुर्घटना घडली आहे. तब्बल 180 प्रवाशी बेपत्ता आहे.रोजगाराच्या शोधात हे लोक या खतरनाक रस्त्याने प्रवास करतात, अपघात झाल्यास अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. दरम्यान सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे, बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे, मात्र अजून एकही प्रवाशी सापडेला नाहीये. या दुर्घटनेनंतर बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.