या मुस्लीम देशाची बकरी ईदच्या कुर्बानीवर बंदी,आणखी कोणत्या देशात बंदी पाहा
मुस्लीमांसाठी बकरी ईद एक महत्वाचा धार्मिक सण आहे.या सणाच्या वेळी बकऱ्याचा बळी दिला जात असतो.परंतू एका इस्लामिक देशाने या कुर्बाणीवर बंद घातली आहे.अखेर कोणत्या देशात कुर्बाणीवर बंदी आहे हे पाहूयात..

जगभरात येत्या ७ जून रोजी बकरी ईदचा सण मोठ्या उत्साहात साजारा होणार आहे.या सणाच्या वेळी मुस्लीम देशात बकऱ्याची कुर्बाणी देऊन हा सण साजरा केला जातो. परंतू एका मुस्लीम देशाने यंदा बकरी ईदला बकऱ्यांची कुर्बाणी देण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बकऱ्याची कुर्बाणी देण्यावरुन देशांत मतेमतांतर आहे. परंतू एका आफ्रीकीन देशाने यावर्षी ईद अल अजहा म्हणजे बकरीदला कुर्बाणी देण्यावर बंदी लादली आहे. या देशाने बकरी ईदचा सण कुर्बाणी शिवाय साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आणखी कोणत्या देशात बकरी ईदला बकऱ्यांची कुर्बाणी दिली जाणार नाही हे पाहूयात….
जगभरात मुस्लीम बांधव बकरीद मोठ्या थाटामाटाने साजरी करीत असतात. येत्या ७ जूनला जगभर बकरीद साजरी केली जाणार आहे. यंदा आफ्रीकन देश मोरक्कोने ईद अल अजहा अर्थात बकरीद साजरी न करण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आहे. येथील राजा मोहम्मद VI यांनी देशात पडलेल्या दुष्काळामुळे येथे बकऱ्यांची कुर्बानीवर बंदी घातली आहे. येथील सरकारने हा सक्त आदेश काढला आहे. यंदा कोणत्याही नागरिकाने बकरीदला बकरा किंवा कोणत्याही जनावराची कुर्बाणी देऊ नये असे आदेश काढण्यात आले आहे.आणखी कोणत्या देशात बकरीदला जनावरांच्या कुर्बानीवर बंदी लादली आहे हे पाहूयात….
सरकारविरोधात संताप
मोरक्को एक मुस्लीम देश आहे. येथील ९९ टक्के लोकसंख्या इस्लामिक आहे. या देशात बकरीद सणाला खूप महत्वाचे स्थान आहे. या देशात सरकारनेच बकरी ईदला कुर्बाणीवर बंदी लादल्याने येथील जनता संतापली आहे. येथील जनता सरकारच्या विरोधात गेली आहे. येथे आता राजाला किंवा सरकारला जनतेचा सण रोखण्याचे अधिकार आहेत का ? यावर चर्चा सुरु झाली आहे. आता भारतातही जनावरांच्या कुर्बाणीला बंदी लावण्याची मागणी काही धार्मिक संघटना करीत आहेत. राज्य सरकारचे मंत्री नितेश राणे, गाझियाबादचे भाजपा आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी लोकांनी आता वर्च्युअर बकरीद साजरी करावी अशी मागणी केली आहे. मोरक्को सह आणखी कोणत्या देशात जनावरांच्या कुर्बाणीला बंदी लादली आहे हे पाहूयात…
नेपाळमध्ये पशु बळीवर बंदी
धार्मिक कारणासाठी प्राण्यांच्या कुर्बानीवर बंदी लादणारा मोरक्को एकटा देश नाही. तर नेपाळ, चीन, तैवान येथेही धार्मिक कारणासाठी पशूंच्या कुर्बानीवर बंदी घातली आहे. नेपाळ येथे एक सण असतो. त्याचे नाव गढीमाई सण असे आहे. या सणातही पशुबळीवर संपूर्णपणे बंदी लादली आहे. नेपाळमध्ये धार्मिक सणात गढीमाई मंदिरात लाखो पशूंचा बळी दिला जात होता. परंतू २०१५ मध्ये यावर बंदी घातली आहे.
चीन आणि तैवानमध्ये बंदी
चीनमध्ये बौद्ध धर्माचे लोक असल्याने येथे कोणत्याही धार्मिक कारणासाठी प्राणी हत्या केली जात नाही. तैवान देशातही काऊशुंग तसेच ताओवादी मंदिरात पशुबळीवर बंदी आहे.
