AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला, 24 तासांपेक्षा अधिक गोळीबार, 47 लोकांचा मृत्यू, 50 जणांचं अपहरण, मोठी खळबळ

हल्लेखोरांनी शहरता तब्बल 24 तासांपेक्षा अधिक काळ अंदाधुंद गोळीबार केला, या दुर्दैवी घटनेत 47 हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, 50 जण जखमी झाले आहेत. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला, 24 तासांपेक्षा अधिक गोळीबार, 47 लोकांचा मृत्यू, 50 जणांचं अपहरण, मोठी खळबळ
Image Credit source: Getty Images
| Updated on: Aug 26, 2026 | 9:18 AM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. हैतीची राजधानी पोर्ट-ओ प्रिंस परिसरात शस्त्रधारी टोळीने धुमाकूळ घातला आहे. तब्बल 24 तास गोळीबार सुरू होता. या घटनेत आतापर्यंत 47 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 हून अधिक नागरिकांना किडनॅप करण्यात आलं आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेकडून देखील या घटनेची दखल घेण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेनं देखील या घटनेची पुष्ठी करताना रविवार आणि सोमवार असे दोन दिवस या ठिकाणी गोळीबार करण्यात आल्याचं म्हटलं आहे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शस्त्रधारी टोळीकडून हा हल्ला करण्यात आला आहे, विशेष म्हणजे चर्चेमध्ये शरण घेतलेल्या आणि विस्थापित झालेल्या लोकांना या टोळीकडून लक्ष्य करण्यात आलं. या लोकांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेत 47 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 50 हुन अधिक जणांना किडनॅप करण्यात आलं आहे.

या घटनेमुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. सामूहिक अपहरणाची ही आतापर्यंतची सर्वात मोठी घटना माण्यात येत आहे. याबाबत द हैतियन न्यूजने दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री केन्सकॉफमध्ये शस्त्रधारी टोळक्याकडून मोठा हल्ला करण्यात आला, त्यांनी घटनास्थळी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. हा गोळीबार तब्बल 24 तास सुरू होता, या हल्ल्यामध्ये 47 हून अधिक लोकं मारले गेले आहेत, तर हल्लेखोरांनी 50 लोकांचं अपहरण केलं आहे. अजूनही काही शस्त्रधारी लोक या शहरात फिरत असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

ज्या ठिकाणी हल्ला झाला ते ठिकाण हैतीची राजधानी पोर्ट-ओ- प्रिंस पासून दक्षिणेला अवघ्या 15 किलोमीटर अतंरावर डोंगरात वसलेलं एक सुंदर शहर आहे. या शहरावर भीषण हल्ला करण्यात आला आहे. चर्चेमध्ये आश्रय घेतलेल्या लोकांवर या टोळीने हल्ला केला आहे. दरम्यान राजधानी पोर्ट-ओ प्रिंसचा देखील काही भाग या लोकांनी ताब्यात घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या टोळीकडून अपहरण केलेल्या लोकांना देखील आम्ही मारून टाकू अशी धमकी देण्यात आली आहे.

Follow Us