भारत विरोधी नेता होणार बांगलादेशचे नवे पंतप्रधान, भारताला मोठा झटका?

बांगलादेशमध्ये लाखो लोकं रस्त्यावर उतरले आणि शेख हसीन यांना पंतप्रधानपद सोडून देश सोडून जावं लागलं. पण हे काही अचानक घडलेलं नाही. याला अनेक गोष्टी जबाबदार आहेत. बांगलादेशात आता नवीन काळजीवाहू सरकार स्थापन होणार आहे. या सरकारचे पंतप्रधान भारतविरोधी असल्याचं बोललं जात आहे.

भारत विरोधी नेता होणार बांगलादेशचे नवे पंतप्रधान, भारताला मोठा झटका?
Follow us
| Updated on: Aug 05, 2024 | 8:22 PM

शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर त्यांना देशही सोडावा लागला आहे. सध्या त्या भारतात आल्या असून काही दिवसांनी त्या लंडनमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर आता बांगलादेशमध्ये नव्या पंतप्रधानाचा शोध सुरू झालाय. बांगलादेश लष्कराने अंतरिम सरकार स्थापन करणार असल्याची घोषणा केलीये.  पण या सरकारमध्ये सत्ताधारी अवामी लीगच्या कोणत्याही नेत्याचा समावेश करणार नसल्याचं देखील स्पष्ट केलं आहे. अशा स्थितीत बांगलादेशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी)चे कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान देशाचे नवे पंतप्रधान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  ते माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र आहेत.

तारिक यांनी बांगलादेशी जनतेचे केले अभिनंदन

तारिक पुढे म्हणाले की, “समाजाच्या सर्व स्तरांतील विद्यार्थी आणि आंदोलकांचे अभिनंदन. या ऐतिहासिक दिवशी न्यायाची त्यांची निस्वार्थ भावना आणि आपल्या देशबांधवांवर प्रेम आहे. बांगलादेशला लोकशाही आणि विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊ या. “, जिथे सर्व लोकांचे हक्क आणि स्वातंत्र्य संरक्षित केले जाते.”

तारिक रहमान नवे पंतप्रधान होऊ शकतात

तारिक रहमान यांना बांगलादेशचे पुढील पंतप्रधान मानले जात आहे. बांगलादेश लष्कर नवीन काळजीवाहू सरकार स्थापन करणार आहे त्यात बीएनपी सर्वात मोठी भूमिका बजावेल. तारिक हे सध्या बीएनपीचे सर्वात मोठे नेते असल्याने त्यांना नव्या काळजीवाहू सरकारमध्ये सर्वात मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. बांगलादेश लष्कराने म्हटले आहे की, अवामी लीगचा एकही सदस्य त्यांनी बोलावलेल्या राजकीय पक्षांच्या बैठकीत सहभागी झाला नव्हता. अशा परिस्थितीत दुसरा सर्वात मोठा राजकीय पक्ष बीएनपी असेल.

तारिक रहमान हे भारतविरोधी राजकारण करतात

तारिक रहमान हे बांगलादेशातील भारतविरोधी राजकारणाचे प्रमुख मानले जातात. बांगलादेशातील इंडिया आऊट मोहिमेला ते अनेक वर्षांपासून संरक्षण देत आहेत. दहशतवाद पसरवल्याबद्दल दोषी आढळल्यानंतर तारिक रहमानला 2018 मध्ये 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. 21 ऑगस्ट 2004 रोजी अवामी लीगच्या रॅलीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ते दोषी आढळले होते.

प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.