इराणने इस्त्राईलवर का केली चढाई; क्षेपणास्त्रांचा का पाडला पाऊस, कारण तर समजून घ्या

Iran-Israel Attack : मध्य-पूर्वेत पु्न्हा नवीन युद्धाचा भडका उडाला. जागतिक रंगमंचावर अजून एका युद्धाने एंट्री घेतली आहे. रशिया-युक्रेन युद्ध दोन वर्षांहून अधिक काळापासून सुरु आहे. तर गाझा पट्टीत हमास-इस्त्राईलमध्ये कुरघोडी सुरु आहे. त्यात आता इराणने पण युद्धाची खुमखुमी दाखवली आहे.

इराणने इस्त्राईलवर का केली चढाई; क्षेपणास्त्रांचा का पाडला पाऊस, कारण तर समजून घ्या
मध्यपूर्वेत युद्धज्वर
Follow us
| Updated on: Apr 14, 2024 | 4:24 PM

मध्य-पूर्वेत युद्धाचा भडका उडाला आहे. हमास-इस्त्राईलमध्ये गाझा पट्टीवरुन कुरघोडी सुरु होती. त्यात आता इराण या देशाने पण उडी घेतली आहे. शनिवारी इराणने इस्त्राईलवर शनिवारी क्षेपणास्त्रांचा मारा केला. 200 हून अधिक प्राणघातक क्षेपणास्त्रांचा वापर यावेळी करण्यात आला. क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडण्यात आला. इस्रायलचे रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी यांनी हा दावा केला आहे. इराणच्या या हल्याविरोधात आम्ही इस्त्राईलच्या पाठिशी असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी स्पष्ट केले.

हिजबुल्ला सक्रीय

मध्य-पूर्वेत चिंता वाढली आहे. हमास आणि इराणची हिजबुल्ला या दहशतवादी संघटना आहेत. हमासविरोधात इस्त्राईलने युद्ध छेडले आहे. हमासने इस्त्राईलवर केलेल्या हल्ल्यानंतर दोघांमध्ये युद्ध भडकले. इराण आणि लेबनॉनमध्ये हिजबुल्लाचे मोठे प्रस्थ आहे. या संघटनेची या भागात मजबूत पकड आहे. हमासला समर्थन देण्यासाठी हिजबुल्लाने यापूर्वीच इस्त्राईलवर हल्लाबोल केला आहे.

हे सुद्धा वाचा

इराणने का केला हल्ला

आता हिजबुल्लाचे तळी उचलणाऱ्या इराणने थेट इस्त्राईलवर हल्ला चढवला आहे. शनिवारी इराणने इस्त्राईलवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला. दमास्कस दूतावासात आमच्या काही अधिकाऱ्याचा इस्त्राईलने मृत्यू घडवून आणल्याचा दावा करत इराणने हा हल्ला केला आहे. इराणच्या दाव्यानुसार, दमास्कस दूतावासावर इस्त्राईलने हल्ला केला होता. 1 एप्रिल रोजी हा हल्ला झाला होता. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या परदेशातील कुड्स फोर्सच्या वरिष्ठ कमांडरसह अनेक अधिकारी या हल्ल्यात मारल्या गेल्याचा इराणाचा दावा आहे. इस्त्राईलने केलेल्या या हवाई हल्ल्याचा हा बदला असल्याचे इराणने स्पष्ट केले आहे.

आम्ही इस्त्राईलला धडा शिकवू

इराणचे सर्वात मोठे नेते अयातुल्ला अली खामेनीने यांनी इस्त्राईलवरील हल्ल्याचे समर्थन केले. आमच्या अधिकाऱ्यांना हवाई हल्ल्यात मारणाऱ्या इस्त्राईलला आम्ही धडा शिकवू असा इशारा त्यांनी दिला. हा एक प्रकारे आमच्या देशावर, सार्वभौमत्वावर हल्ला असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच त्याची किंमत इस्त्राईलला मोजावी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हे युद्ध अजून भडकण्याची दाट शक्यता आहे. त्यावर संयुक्त राष्ट्र संघाने पण चिंता व्यक्त केली आहे.

Non Stop LIVE Update
सगळे रक्तालाही चटावलेले,सरकारला आरोपी करा; पुणे अपघातावर सामनातून टीका
सगळे रक्तालाही चटावलेले,सरकारला आरोपी करा; पुणे अपघातावर सामनातून टीका.
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?.
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी.
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं.
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम.
पॅन-आधार लिंक केलंय? नसेल केलं तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची
पॅन-आधार लिंक केलंय? नसेल केलं तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची.
पुणे अपघात अन् आरोप थेट अजितदादांपर्यंत, नार्को टेस्टची होतेय मागणी
पुणे अपघात अन् आरोप थेट अजितदादांपर्यंत, नार्को टेस्टची होतेय मागणी.
लोकसभेत पाठिंबा पण त्याबदल्यात आता मदत नाही? या निवडणुकीत मनसे vs भाजप
लोकसभेत पाठिंबा पण त्याबदल्यात आता मदत नाही? या निवडणुकीत मनसे vs भाजप.
राज्यात 40 पार कोण? महायुती की मविआ? काय म्हणताय राजकीय विश्लेषक?
राज्यात 40 पार कोण? महायुती की मविआ? काय म्हणताय राजकीय विश्लेषक?.