AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रशांत महासागरात लालभडक प्रकाश, आकाशात पायलटला जे दिसले, त्याने जगाला बसला धक्का

प्रशांत महासागराच्या वरुन उड्डाण घेणाऱ्या एका पाटलटला खाली समुद्राच्या पाण्यात लाल - लाल रंगासारखा प्रकाश दिसल्याने खळबळ उडाली आहे. या लाईट्स कशामुळे दिसल्या, नेमके काय आहे त्यांचे रहस्य वाचूयात....

प्रशांत महासागरात लालभडक प्रकाश, आकाशात पायलटला जे दिसले, त्याने जगाला बसला धक्का
red lights
| Updated on: Dec 29, 2025 | 8:26 PM
Share

प्रशांत महासागराच्या वरुन उड्डाण घेणाऱ्या एका पायलटने काही असे फोटो टाकले आहेत. ज्यांना पाहून संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. दाट काळोखात समुद्राचा मधला मोठा हिस्सा रक्तासारखा लाल चमकत आहे. हा नजारा इतका भीतीदायक होता की याला पाहून कोणालाही धडकी भरेल. सुरुवातीला लोकांना हे काही नैसर्गिक संकट आहे का असा प्रश्न पडला. समुद्राच्या खाली एखादा ज्वालामुखी फुटला की काय असे लोकांना वाटले. हा लाल प्रकाश निर्सगाच्या चमत्कारामुळे नव्हता. तर त्यामागे चीनची कुरापत उघडकीस आली आहे.

चीन समुद्राचे पाणी का लाल करीत आहे ?

आकाशातून पायलटला दिसलेला लाल रंग हा चीनच्या शिकारीमुळे निर्माण झाला होता. चीनची जहाजे जायंट स्क्विड’ ची शिकार करत असतात. यासाठी ते एका खास तंत्राचा वापर करतात. त्यासाठी जहाजावर लाल एलईडी लाईट्सचे जाळे पसरवले जाते. स्क्विड या खास तरंगाकडे खेचले जातात. लाल लाईटची व्हेवलेंथ त्यांना शिकारीसाठी आकर्षित करते. अंधारात शिकार करण्याचा हा सर्वात अचूक मार्ग आहे. यामुळे जहाजांची पकडण्याची ताकद अनेक पटींनी वाढते. चीन आता माशांच्या ऐवजी स्क्विडना टार्गेट ककत आहे. कारण आता समुद्रात आता दुसरे मासे खूप कमी उरले आहेत. हा बदल संपूर्ण जगासाठी धोका आहे.

चीनी जहाजांचा ताफा इतका विशाल आहे की तो अंतराळातूनही दिसत आहे. नासाचे अंतराळवीर डॉन पेटिट यांनी याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात खुल्या पाण्यात प्रकाशाचे छोटे छोटे डॉट्स दिसत आहेत. हे काळी किरकोळ मासे पकडण्याचे काम नाही. ही एक संपूर्ण इंडस्ट्री आहे. जी समुद्राला ढवळून काढत आहे. चीनचा ताफा जगातला सर्वात मोठा आहे. ही जहाजे आपल्या देशातून हजारो मैल दूर जाऊन शिकार करतात. प्रशांत सागराशिवाय अटलांटीक आणि हिंद महासागरातही यांचा कब्जा आहे.

समुद्राचे इकोसिस्टम चीन नष्ट करणार ?

चीनच्या जहाजांवर अनैतिक शिकारीचे आरोप लावले जात आहेत. यास आईयूयू’ फिशिंगचे नाव दिले जात आहे, याचा अर्थ माहिती न देता नियम तोडून शिकार करणे. चीन या अवैध कामात जगात टॉपवर आहे. स्क्विड ( माकुल ) हे सुमद्रातील जैव साखळीचा मोठा महत्वाचा हिस्सा आहे. जर स्क्विड संपले तर अन्य जीवांवरही संकट येणार आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमी चिंता व्यक्त करत आहेत. चीन समुद्राचे आरोग्य बिघडवत आहे. या फोटोने आता जगाच्या नियामक एजन्सींना घाबरवले आहे.

कसे काम करतो आधुनिक शिकारी ताफा ?

चीनची जहाजे नेहमी एका मोठ्या ग्रुपमध्ये चालतात. ही परस्परांत नियोजन करुन समुद्रात घेराव टाकतात. याची रणनिती माशांच्या कमतरतेच्या हिशेबाने बदलत असते. जेव्हा माशांची कमरता असते तेव्हा या स्क्विडना टार्गेट केले. तंत्राचा वापर करुन हे रात्र भर काम करतात. त्यांच्याकडे अशा मशिनरी आहेत ज्या मोठ्या शिकारी करु शकतात. हे आधुनिक फिशिंगचे एक भयावह रुप आहे.

स्क्विड शिकारीसाठी लाल लाईट का वापरतात ?

संशोधनानुसार स्क्विड लाल रंगाच्या प्रति खूप संवेदनशील असतात. ते यांना भोजनाचा संकेत म्हणून जवळ आकर्षित होतात. एका मोठ्या जहाजावर १०० हून जास्त अशा लाईट्स लावलेल्या असतात. याचा प्रकाश इतका प्रखर असतो की १० किलोमीटरवरुन स्पष्ट दिसतो. यामुळे समुद्राचा नैसर्गिक लाईट्स बॅलन्स संपूर्णपणे बिघडतो.

शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.
शिंदेंनी कसलं बंड केल? घंटा...राऊतांच्या टीकेला शिरसाटांचं प्रत्युत्तर
शिंदेंनी कसलं बंड केल? घंटा...राऊतांच्या टीकेला शिरसाटांचं प्रत्युत्तर.
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?.
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.